रात्री शयनाचे वेळी दक्षिणेकडे पाय करू नयेत असे म्हणतात, यामागे हेतू कोणता ?*
*शास्त्र असे सांगते.
*🏵 रात्री शयनाचे वेळी दक्षिणेकडे पाय करू नयेत असे म्हणतात, यामागे हेतू कोणता ?*
*धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशेस पाय पसरून झोपणे निषिध्द मानले आहे. हे पूर्णतया वैज्ञानिक सत्य आहे. विश्वातील प्रत्येक अणुरेणुमध्ये चुंबकीय आकर्षण असून प्रत्येक कण कोणत्यातरी विशाल कणाकडे ओढला जातो, हे दिसून येते. याचा परिणाम म्हणून प्रत्येक सूक्ष्म कणास एकप्रकारची भ्रमण गती असते.*
*आपली पृथ्वी देखील सूर्याकडे चुंबकशक्तीने आकृष्ट होते. खूद्द सूर्यदेखील त्याहून मोठ्या सूर्याकडे चुंबकीय शक्तीने खेचला जातो. विश्वातील ध्रुव नामक ताऱ्याकडे हे विश्व सतत आकर्षिले जाते. ध्रुव तारा ज्या बाजूला असेल, तिकडे देहातील अणुरेणू कणांचे आकर्षक होत असते. अगदी पोटातील अन्नपदार्थ देखील त्याच दिशेने सूक्ष्मतया खेचले जातात. त्यामुळे उत्तरेकडे पाय करून नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षणाचा लाभ देहाला आपोआपच मिळतो. पण त्याउलट दक्षिणेकडे पाय केल्यास देहातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षक उलट दिशेस राहिल्यामुळे अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय ज्ञानतंतूंची उलट गतीने क्रिया चालू झाल्यामुळे मस्तकास शीण येतो. परिणामी निद्रावस्था पुरेसे समाधान देऊ शकत नाही. सतत वाईट स्वप्ने पडू लागतात. वरचेवर जाग येत राहते. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असे शास्त्र सांगते. पूर्व-पश्चिम, उत्तर या तिन्ही दिशांना हा अनर्थ ओढवत नाही.*
*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*
Comments
Post a Comment