पहाटेची मानसपूजा
*❤️पहाटेची मानसपूजा*❤️
~~~~~~~के~~~~~~
*महाराज म्हणतात "पहाटेची मानसपूजा ही एक श्रेष्ठ उपासना आहे."*
*भगवंताला मानसपूजा फार प्रिय आहे त्यानें मनातील दोष निघून चित्त शुद्ध होतें. प्रत्येक साधकाने रोज मानसपूजा करावी जेणेकरुन आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहे हि भावना निर्माण होते व अशा प्रकारचा आपल्या हृदयातील भगवंताचा रोज सहवास लाभणे हि मोठी प्रेमाची अवस्था आहे , मानसपूजेमध्ये आपल्या मनातल्या देवाच्या रूपाची पूजा आपल्याला करता येते. या पूजेचा लाभ म्हणजे स्थळ, पूजेचे साहित्य ,सोवळे ओवळे इत्यादी कर्मकांडांत न अडकता कोणत्याही ठिकाणी ती करता येते. दुसरा लाभ म्हणजे मानसपूजेद्वारे जगातील कोणतीही उत्तम वस्तू , फुले व नैवेद्य इत्यादी मनानेच देवाला अर्पण करता येते. याहूनही मोठा असा तिसरा फायदा म्हणजे जेवढा वेळ मानसपूजा चालू असेल, तेवढा वेळ आपल्याला मनाने देवाबरोबर राहता येते.*
*आपल्या उपास्यदेवतेची किंवा सद्गुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करणे.म्हणजे मानसपूजा,*
*मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनातल्या मनात आणि अत्यंत शुद्ध भावनेने अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर मूर्ति विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि.*
*'"तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही'" अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी. आपली उपास्य देवता आपल्या सतत सन्निध आहे, आपल्याशी बोलत आहे, आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, ही भावना* *मानसपूजेने वाढते.*
*मानसपूजा केवळ पहाटेच करावी असे नाही, तर जागृतावस्थेमध्यें मानसपूजा सतत करता येते.*
*उदा. मुलाला स्नान घालतांना मी सद्गुरूंना अभ्यंगस्नान घालत आहे, स्वयंपाक करतांना मी हा माझ्या सद्गुरूंसाठी करत आहे, घर स्वच्छ करतांना मी महाराजांचे घर स्वच्छ करत आहे, गाद्या टाकतांना मी महाराजांची शेज तयार करत आहे अशी भावना ठेवणे ही मानसपूजाच आहे.*
*सापेक्षतः दिवसभराच्या विषयी आणि विकारी वातावरणापेक्षा पहाटे वातावरण शुद्ध असते. त्यामुळें, रामप्रहरी मन तादात्म्य होणं सुलभ असते. म्हणून सकाळची वेळ मानसपुजेत गेली तर दिवसभर त्याचा प्रभाव जाणवेल, आपले प्रत्येक कर्म भगवद्सेवा मानून करणे, ही अखंड मानसपूजा होय. अशाप्रकारे आपण सतत नामांत राहून, प्रत्येक कर्माला अनुसंधानाची म्हणजे नामस्मरणाची जोड दिल्यास "'जेथे जातो तेथे तूं माझा सांगाती'" याची अनुभुती येईल...!!!*
*बघा पटतंय का...*
*🌞🕉️सुर्याय नम्:💖*
Comments
Post a Comment