भौम प्रदोष व्रत
🙏🌹🤝🦚🕉️☯️🛐🦚🤝🌹🙏
-------------------------
*भौम प्रदोष व्रत*
-------------------------
*मंगळवारी येणाऱ्या प्रदोषास भौम प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी व्रत केल्याने उत्तम आरोग्य प्राप्ती होऊन आजारपणातून मुक्ती होते व जीवनात समृद्धी प्राप्त होते.*
*प्रदोष व्रत कथा, विधी,*
*तिथी व त्याचे फायदे*
*प्रदोष काळी भगवान श्रीशंकराचे पूजन केल्याने होत असते मोठी फलप्राप्ती*
अनेकदा लोक विचारतात व समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात कि प्रदोष व्रत केव्हा आहे, म्हणून आम्ही आपणास हे सांगत आहोत कि प्रदोष व्रत हे त्रयोदशीस म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी करण्यात येते. ह्या दिवशी भगवान श्रीशंकराचे पूजन करण्यात येते. विशेष म्हणजे दिवस व रात्र ह्यांच्या संधीकाळी हे व्रत करणे अधिक चांगले असते असे समजण्यात येते. प्रदोष व्रताचे अत्यंत धार्मिक महत्व आहे व त्या दरम्यान केलेली भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा अत्यंत फलदायी होत असून त्यामुळे शुभ फलांची प्राप्ती होते. प्रदोष काळी व्रत किंवा पूजन केल्याने इच्छापूर्ती होते असा एक समज आहे.
*प्रदोष व्रत कथा*
स्कंद पुराणानुसार एका गावात एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या मुलासह राहून भिक्षा मागून आपला उदार निर्वाह करत होती. एके दिवशी ती भिक्षा घेऊन घरी परत येत असता नदी किनारी तिला एक बालक मिळाले. हे बालक विदर्भ देशातील राजकुमार धर्मगुप्त होते. शत्रूंनी त्याच्या पित्याचे राज्य बळकावून त्याची हत्त्या केली होती. धर्मगुप्ताच्या मातेचा मृत्यू आधीच झाला होता. ब्राह्मण स्त्रीने त्यास आपल्या घरी नेले. एके दिवशी शांडिल्य ऋषींनी त्या ब्राह्मण स्त्रीला प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला. प्रदोष व्रतामुळे राजकुमार धर्मगुप्त ह्याचा विवाह गंधर्व राज्याच्या कन्येशी झाला. ज्याच्या मदतीने त्याने आपले गेलेले राज्य प्राप्त केले.
*प्रदोष व्रत केल्याने होत असते शुभ फलांची प्राप्ती*
ज्या प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पुण्य फलदायी समजण्यात येते त्याच प्रमाणे प्रत्येक शुक्ल व कृष्ण त्रयोदशीस केलेले व्रत हे अत्यंत शुभ फलदायी ठरते. एकादशीस भगवान श्रीविष्णू ह्यांचे पूजन करण्यात येते तर त्रयोदशीस भगवान श्रीशंकराची आराधना करण्यात येते. प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते अशी एक मान्यता आहे. तसे पाहू गेल्यास प्रदोष व्रतास खूप महत्व आहे, परंतु जर दिवसा प्रमाणे हे व्रत व पूजन केले तर शुभ फलांची वाढ होते. त्यामुळे आठवड्याच्या दिवसानुसार म्हणजे ज्या दिवशी हि तिथी येते त्या दिवसानुसार प्रदोष व्रत कथेचे पूजन करावे, कारण दिवसानुसार कथा सुद्धा वेग - वेगळी आहे. प्रदोष व्रतासाठी दिवसाचे सुद्धा विशेष महत्व असून त्यानुसार व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होते.
*प्रदोष व्रताचा विधी*
प्रदोष असता सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य कर्म करून भगवान श्रीशंकर ह्यांची पूजा करावी. पूर्ण दिवस निराहारी राहून मनातल्या मनात
*“ऊँ नम: शिवाय”*
ह्या मंत्राचा जप करावा. त्रयोदशीस प्रदोष काळी म्हणजेच सूर्यास्ताच्या तीन घटी पूर्वी शंकराचे पूजन करावे.
सायंकाळी दुसऱ्यांदा स्नान करून स्वच्छ श्वेत वस्त्र धारण करून व पूजन करण्याच्या जागेचे शुद्धीकरण करून पूजा करावी. शंकराच्या मंदिरात सुद्धा पूजा करता येते.
*प्रदोष व्रतात करण्याचा आहार*
तसे पाहू गेल्यास प्रदोष व्रत हे पूर्ण दिवस निराहारी राहून करण्यात येते. ह्या व्यतिरिक्त आपण सकाळी नित्य कर्म आटोपून दूध घेऊ शकता. त्या नंतर दिवसभर काहीही खाऊ - पिऊ नये. प्रदोष काळी भगवान शंकराच्या पूजे नंतर फलाहार करू शकता, मात्र मीठ खाऊ नये.
*प्रदोष व्रताच्या उद्यापनाचे नियम*
प्रदोष व्रताचे उद्यापन हे त्रयोदशीसच करावे. मात्र, ह्याचे उद्यापन ११ किंवा २६ त्रयोदशी व्रत केल्या नंतरच करावे. व्रताचे उद्यापन करण्याच्या एक दिवस अगोदर श्रीगणेश पूजन करण्यात येते. त्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेची पूर्ण तयारी केल्यावर
*“ऊँ नम: शिवाय”*
ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करून हवन करावे. ह्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे अन्न प्राशन करू नये, कारण हे व्रत निर्जली राहून करावयाचे असते.
*प्रदोष व्रत सामग्री*
- धूप, दीप, तूप, पांढरे फुल, पांढऱ्या रंगाची मिठाई, चंदन, पांढरे वस्त्र, जानवे, पाण्याने भरलेला कलश, कापूर, बिल्व पत्र, अक्षता, गुलाल, धोत्रा, भांग, हवनाची सामग्री, आंब्याचे टाळे इत्यादी.
*प्रदोष व्रताचे फायदे*
- रविवारी येणाऱ्या प्रदोषास रवी प्रदोष किंवा भानू प्रदोष ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दिवशी हे व्रत केल्याने उत्तम आरोग्य व दीर्घायु प्राप्त होते.
- सोमवारी येणाऱ्या प्रदोषास सोम प्रदोष ह्या नावाने संबोधण्यात येते. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सकारात्मक विचारांची प्राप्ती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात.
*मंगळवारी येणाऱ्या प्रदोषास भौम प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी व्रत केल्याने उत्तम आरोग्य प्राप्ती होऊन आजारपणातून मुक्ती होते व जीवनात समृद्धी प्राप्त होते.*
- बुधवारी येणाऱ्या प्रदोषास बुध किंवा सौम्य वार प्रदोष असे म्हणतात. ह्या दिवशी हे व्रत केल्याने सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात.
- गुरुवारी गुरु प्रदोष होतो. ह्या दिवशी हे व्रत केल्याने शत्रूंवर मात करता येते व पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
- शुक्रवारी शुक्र किंवा भृगु प्रदोष होतो. ह्या दिवशी हे व्रत केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट पावते व वैवाहिक जीवन सुखद होते.
शनिवारी शनी प्रदोष होतो, जो खूपच महत्वाचा असल्याचे मानण्यात येते. हे व्रत केल्याने संतती प्राप्ती व जीवनात यश प्राप्ती होते.
*प्रदोष व्रत तिथीचे महत्त्व*
प्रदोष व्रत तिथीकडे विशेष लक्ष द्यावयास हवे, कारण ती सूर्यास्तावर आधारित असते. ज्या दिवशी सूर्यास्ता नंतर त्रयोदशी प्रबळ असते त्या दिवशीच हे व्रत करण्यात येते. त्यामुळेच काही वेळा प्रदोष व्रत हे त्रयोदशी पूर्वी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीस केले जाते.
----------------------------------------------
----------------------------------------------- ---------------------
*शिवपुराणात सांगण्यात आलेले*
*काही खास उपाय...*
-------------------------------------------
प्रत्येक मासातील दोन्ही पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि खास उपाय केले जातात.
या महिन्यात ५ मे, मंगळवारी मंगळ प्रदोष योग जुळून येत आहे.
ज्योतिष विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास भगवान शिव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
*शिवपुराणानुसार करा हे उपाय*
भोम-प्रदोष योगामध्ये काही खास उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे उपाय शिवपुराणात आहेत...
१. तल्लख बुद्धिसाठी साखर मिश्रित दुधाने महादेवाचा अभिषेक करावा.
२. सुगंधित तेलाने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास समृद्धीमध्ये वृद्धी होते.
३. लाल आणि पांढरे रुईचे फुल अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास सर्व सुख मिळू शकतात.
४. बेलाच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुंदर आणि सुशील पत्नी मिळण्याचे योग जुळून येऊ शकतात.
५. महादेवाला पारिजातकाचे फुल अर्पण केल्यास सुख-संपत्ती वाढते.
६. धोत्र्याच्या फुलाने महादेवाची पूजा केल्यास योग्य पुत्र प्राप्ती होते. हा पुत्र कुटुंबाचे नाव मोठे करतो.
७. महादेवाला दुर्वा अर्पण केल्यास वय वाढते.
८. महादेवाला जवस अर्पण केल्यास सुखांमध्ये वृद्धी होते"
------------------------------------------------
----------------------------------------------
-----------------------
*चाणक्य नीती*
------------------------
*उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम्।*
*तडागोदरसंस्थानां परीस्रव इवाम्भसाम्।।*
-चाणक्य नीती
या नीतीचा संपूर्ण अर्थ...
*अर्थ :*
आपण कमावलेल्या धनाचा उपभोग घेणे किंवा योग्य व्यय करणे हेच धनाचे रक्षण करण्यासमान आहे. ज्याप्रमाणे एखाद्या तलाव किंवा भांड्यातील पाण्याचा उपयोग न केल्यास ते खराब होते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कमावलेल्या पैशांचा सदुपयोग करावा. काही लोक पैसा साठवून ठेवतात त्याचा उपयोग करत नाहीत. आवश्यकतेपेक्षा जास्त धनाची बचत करणे अनुचित आहे. यामुळे जास्त झालेल्या धनाचे दान करावे. योग्य कार्यामध्ये धनाची गुंतवणूक करावी. हेच धनाचे रक्षण आहे.
एखादा व्यक्ती दिवस-रात्र कष्ट करून पैसा कमवत असेल परंतु त्याचा उपभोग घेत नसेल तर अशा पैशांचा काय लाभ आहे. ठीक अशाच प्रकारे एखाद्या तलावात भरपूर पाणी असूनही त्याचा योग्य वापर केला नाही तर ते खराब होऊन जाते.
अशा पाण्याचा योग्य कामासाठी उपयोग केला तरच ते कामी येईल. हीच गोष्ट पैशांच्या बाबतीत लागू होते.
पैसे कमवत असाल तर लक्षात ठेवा ही एक गोष्ट, अन्यथा असा पैसा काही कामाचा नाही
पैसे कमावणे एक कला आहे परंतु याचा उपयोग करणे त्यापेक्षाही मोठी कला आहे. जर तुम्ही पैसे कमवत असाल तर चाणक्यांची एक नीती नेहमी लक्षात ठेवा.
पैसा कमावण्यासोबतच त्यासंदर्भात कोणतीही योजना नसेल किंवा त्याचा उपयोग कसा करावा याचे काहीही कारण नसेल तर तो पैसा कोणत्याच कामाचा नाही.
धन म्हणजेच पैशांचे महत्त्व लक्षात घेऊन शास्त्रामध्ये विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला आयुष्यात सुख आणि शांती प्राप्त होते.
चाणक्य यांनी मगधमध्ये धनानंदचे साम्राज्य नष्ट करून चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवले होते. अनेक वर्ष भारताच्या महामंत्री पदावर राहिलेल्या आचार्य चाणक्यांनी अर्थशास्त्रची रचना केली होती. त्यांचे वडील आचार्य चणक अर्थशास्त्रचे शिक्षक होते. आचार्य चाणक्य यांनी पैशाशी संबंधित ही एक महत्त्वपूर्ण नीती सांगितली आहे
----------------------------------------------
----------------------------------------------
★★★★★★★★★★★★★★★
------------
*राग*
--------------
शरीर व मनाच्या आरोग्यासाठी संताप ही अत्यंत घातक बाब आहे. रागीट स्वभावाची परिणती हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.
जमदग्नी स्वभावामुळे हृदयविकाराची शक्यता तीन टक्क्यांनी वाढते, असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर ही शक्यता ६ टक्क्यांनी वाढू शकते.
हा स्वभाव आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम घडवतो. आपली सारासार विचारबुद्धी तो संपुष्टात आणतो. त्यामुळे कालांतराने आपली निर्णय क्षमता संपुष्टात येते.
क्रोध प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी घातक आहे. परंतु, युवावस्थेत ही प्रवृत्ती जास्त धोकादायक ठरू शकते. कारण या अवस्थेत ही प्रवृत्ती आपल्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम घडवते. अर्थातच त्याचा परिणाम करीयवरवरही होतो.
त्यामुळे रागावर नियंत्रण राखले पाहिजे.
*यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा*
संतापणे सोपे असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणे तितकेच कठीण असते. कारण संतापाने आपण आहे ती स्थिती बदलू शकत तर नाहीच, उलट हानी मात्र पोहोचवतो. म्हणूनच संतापल्यानंतर दीर्घश्वास घ्या व स्वत:ला रिलॅक्स करा. त्यामुळे राग नियंत्रणात येईल.
*राग शांत करण्याचा सगळ्यात सरळ उपाय म्हणजे आपल्या शरीराला रिलॅक्स करा. फक्त आपली मुठ घट्ट आवळून व दीर्घश्वास घेऊन स्वत:ला शांत करू शकता व चिंतामुक्त होऊ शकता.
*डोळे बंद करून दीर्घश्वास घ्या व असा विचार करा की तुम्ही तणावमुक्त होत आहात. अशाने तुम्ही लगेच शांत व्हाल.
*ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने राग येत असेल तर कारमध्ये विनोदी सीडी लावा किंवा मस्तपैकी गाणी ऐका म्हणजे तुमचे लक्ष दुसरीकडे वेधले जाईल. अन्यथा गाडी बाजूला घेऊन आपला वेळ आपल्या आवडत्या गोष्टीत घालवा. म्हणजे तुमचा राग जाईल. राग नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ड्रायव्हिंग करू नका.
*आपण दाबून ठेवलेला राग सुगंधाने नाहीसा होतो. म्हणून सुगंधित तेलांचा वापर करा. शुध्द तेल टिश्यू पेपरवर टाकून तो पेपर खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. आपण संतापलोय असे लक्षात आल्यानंतर तो बाहेर काढा. त्या सुगंधाने राग शांत होऊ शकतो.
*वारंवार संतापलात तर शरीरातील एडिनलीन नावाच्या रसायनाची संख्या वाढते. तज्ज्ञांच्या मते हे रसायन शरीराबाहेर काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम. यासाठी सायकल चालविणे, पोहणे, चालणे यासारखे व्यायाम करा.*
*घाई टाळा. कारण घाई संतापाला निमंत्रण देते.
*विरोध करायचा असेल तर शांतपणे करा. मोठ्याने बोलणे टाळा.
*संताप येऊ नये किंवा त्याला रोखण्यासाठी काय करावे?
* मनातल्या मनात १०० अंक मोजा. नंतर १० वेळा दीर्घश्वास घ्या.
* फिरण्यासाठी बाहेर निघून जा.
* चेहर्यावर थंड पाण्याचे फवारे मारा. एक ग्लास थंड पाणी प्या व आरशासमोर स्वत:ला न्याहाळा.
* शांतपणे संगीत ऐका व संताप निर्माण करणारे विषय टाळा.
* सुंगंधी तेलाचा वापर करा.
------------------------------------------------------
★★★★★★★★★★★★★★★
*रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी*
*ज्योतिष शास्त्रानुसार काही उपाय*
-----------------------------------------------
काहीही कारण नसताना बऱ्याचदा आपल्या वास्तूत आपला फार राग राग होतो किंवा घरातील एखाद्याला एवढा संताप येतो की तो पार तोडफोड करतो नाहीतर स्वतःला त्रास करून घेतो
*अशा वेळेस करायचे काही उपाय :*
१) अशा व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यात अमावस्येला ४ चिमूट मीठ टाकावे व पौर्णिमेला ४ चमचे दूध टाकावे.
2) घरातील फरशी देखील ह्याच पध्दतीने अमावास्येला मिठाने आणि पोर्णिमेला दुधाने धुवून किंवा पुसून काढावी.
३) देवापुढच्या शंखामध्ये पाणी भरून दुसऱ्या दिवशी राग येणाऱ्या व्यक्तीने ते प्यावे व थोडे अंघोळीच्या पाण्यात टाकावे.
४) घरात लाजाळू ह्या झाडाचे रोप कुंडीत लावावे.
५) पौर्णिमेला कादंबाचा झाडाची ७ पाने असलेली फांदी घरात ठेऊन तिची एकदाच पूजा करावी ही फांदी पौर्णिमेपर्यंत ठेवावी नंतर नवीन फांदी आणून घरात ठेवावी आणि जुनी पुन्हा झाडाजवळ सोडावी.
६) काळे हिरवे आणि लाल कपडे वापरणे टाळावे.
७) उजव्या हाताच्या करंगळीत मोती 3 ते ४ कॅरेट चा चांदीत वापरावा.
८) घरातील पूजेत अभिमंत्रित "समृद्ध वास्तूयंत्र" आणि "सौख्यकारी मंगल यंत्र" प्रस्थापित करावे.
-----------------------------------------------
------------------------------------------------
*दिनविशेष*
*आज श्री रांगोळी महाराजांची पुण्यतिथी आहे*
-----------------------------
*श्रीरांगोळी महाराज*
----------------------------
*‘रांगोळी’ या कलाप्रकाराने ज्यांना नावलौकिक मिळवून दिला त्या शिवराम बावडेकर ऊर्फ श्रीरांगोळी महाराज यांचा हा परिचय.*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मालडी गावात राहणाऱ्या बावडेकर या दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात श्रीरांगोळी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळचे नाव शिवराम बावडेकर होते. मालडी येथे सुवर्णालंकार तयार करण्याचा वंशपरंपरागत धंदा नीटसा चालत नसल्याकारणाने बावडेकर मंडळी गगनबावडा येथे आली. करवीर कोल्हापूरनगरीच्या श्रीछत्रपती घराण्याचे सुवर्णालंकार तयार करण्याचे काम बावडेकरांकडे आले. वडिलांपाठोपाठ पुढे शिवराम यांनीदेखील त्यांच्या तरुण वयात श्रीछत्रपतींच्या घराण्याची नोकरी केली.
शिवराम यांचे मातापिता सात्त्विक वृत्तीचे होते, मात्र दुर्दैवाने त्यांना अकाली मरण आले. शिवराम आणि वामनराव हे दोन बंधू आणि दोन भगिनी अशा चारही भावंडांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र बालवयात हरपल्यामुळे या मुलांचा सांभाळ चुलतीने केला. शिवराम यांची मोठी बहीण सात्त्विक वृत्तीची होती. शिवराम आठ वर्षांचे असताना चुलतीसोबत श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला गेले तेव्हा तिथे सगुणावतारात नांदत असलेल्या श्रीस्वामी समर्थांनी शिवरामकडे पाहत त्याच्या चुलतीस विचारले, ‘हा मुलगा आम्हांस देता का?’ आणि छोटय़ा शिवरामला आपल्या मांडीवर बसवून कोल्हापूरच्या कुंभारगल्लीतील श्रीकृष्णसरस्वती यांची सेवा करावी अशी आज्ञा केली.
श्रीसमर्थांच्या आज्ञेनुसार शिवराम कोल्हापुरास जाऊन कुंभारगल्लीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी वास्तव्यास असलेल्या श्रीकृष्णसरस्वती दत्तमहाराज यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सेवेत रुजू झाले. पुढे काही काळातच शिवराम यांनी घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आणि स्वतःस सद्गुरूसेवेकरिता वाहून घेतले. ‘सद्गुरूसेवा ही सर्व सुखांची व भाग्याची जननी आहे’ असे सांगणाऱया शिवराम यांच्यातील विरक्तीचा बहर वाढत गेला. ते संसारात फारसे रमले नाहीत. श्रीकृष्णसरस्वतींचे त्यांच्यावर अपार प्रेम होते. त्यांनी शिवरामांना अनुग्रह दिला. श्रीगुरूंच्या आज्ञेने शिवराम यांनी त्यांना श्रीस्वामीरायांनी दिलेली भगवी कफनी घालून तीर्थयात्रेस प्रारंभ केला. श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या प्रेमळ सान्निध्यात राहिल्याने शिवराम यांना अल्पावधीतच दिव्य सामर्थ्य प्राप्त झाले.
सद्गुरूंना अपेक्षित असलेला शिवराम बावडेकर यांच्या आध्यात्मिक साधनेचा प्रवास उत्तमरीत्या सुरू होता त्यासोबतच त्यांच्यामधील कलाकारही तितक्याच जोमाने कार्यरत होता. शिवराम उत्तमप्रकारे रांगोळ्या काढत असत. त्यांचे रांगोळी काढण्याचे कसब आणि प्रावीण्य इतके जबरदस्त होते की, रांगोळी काढण्यासाठी घरातील अंगणाचा भागही त्यांना पुरेनासा झाला. त्यांनी कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर रांगोळी काढण्यास सुरुवात केली. दोन्ही खांद्यावर रांगोळ्यांनी भरलेल्या मोठय़ा झोळ्या घेऊन शिवराम दोन्ही हातांच्या मुठीत रांगोळी घेऊन चालताचालता सहजच रस्त्यावर फेकत असत आणि त्यातूनच पाहणाऱयांच्या नजरेचे पारणे फेडणारी अतिशय आकर्षक चित्रकृती तयार होत असे. शिवरामांच्या उत्स्फूर्तपणे साकारलेल्या या अफलातून रांगोळीची बातमी कोल्हापूरच्या राजघराण्यापर्यंत पोहोचली नसती तर नवलच. त्यामुळे श्रीछत्रपतींच्या मिरवणुकीपुढे रांगोळी घालण्यासाठीही शिवराम यांना बोलावणे येऊ लागले. करवीरनिवासिनी आई महालक्ष्मीच्या रथापुढे, श्रीकृष्णसरस्वती महाराजांच्या पालखीसमोर, मोठमोठय़ा समारंभात, धार्मिक उत्सवात, सण-सोहळ्यात शिवराम यांनी साकारलेली रांगोळी हा त्या उत्सवाचा अविभाज्य भाग बनला. कोल्हापूरच्या राजघराण्यातील एका विवाहप्रसंगी वरातीच्या दीड मैल अंतरावर घातलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी शिवराम यांना राजदरबारातून ‘रांगोळी महाराज’ हा किताब मिळवून दिला.
गोवा येथे त्याकाळी काही कारणांवरून हिंदूधर्मीयांच्या मंदिरावर निर्बंध घातले होते. तेव्हा पणजी शहरातील मुख्य चौकात रांगोळी महाराजांनी आपल्या रांगोळीतून ‘क्रूसावर चढलेला येशू ख्रिस्त’ साकारला. त्यांची जिवंत भासणारी कलाकृती पाहून येणारी-जाणारी मंडळी थक्क झाली असली तरी चारही बाजूने येणारी वाहने थांबून राहिली. एकही वाहन येशू ख्रिस्ताच्या रांगोळीवरून पुढे गेले नाही कारण त्यातील बरेचजण ख्रिश्चन होते. हा वृत्तांत तेथील मुख्याधिकाऱयाच्या कानावर जाताच तो ताबडतोब घटनास्थळी आला. येशू ख्रिस्तांचे रांगोळीतून साकारलेले चित्र पाहून तोही थक्क झाला, मात्र वाहतुकीचा झालेला खोळंबा पाहून त्याने महाराजांपाशी रांगोळी पुसण्याची विनंती केली. तेव्हा महाराजांनी त्यांना ‘रांगोळीतील येशू ख्रिस्तावरून खुशाल वाहने न्यावी!’ असे उत्तर दिले. हा भलताच पेच उद्भवला तेव्हा मात्र रांगोळी महाराजांनी पुढे होत त्या मुख्याधिकाऱयाला ‘आम्हा हिंदूधर्मीयांच्या मंदिरावर घातलेले निर्बंध काढून टाका.’ असे सुनावले तेव्हा लागलीच त्याने महाराजांचे म्हणणे मान्य केले त्यानंतरच रांगोळी पुसण्यात आली. पुढे गोव्यातील हिंदूधर्मीय मंदिरांवरील निर्बंध उठविण्यात आले.
शिवराम बावडेकर तथा श्रीरांगोळी महाराज यांनी आपल्यातील निसर्गदत्त कलेचा उपयोग कधीही अर्थार्जनासाठी केला नाही. आपल्या हातून साकारलेली रांगोळी, पाहणाऱयाला आनंद देते आणि म्हणूनच ही ईश्वरसेवा आहे असे ते नेहमी सांगत असत. रांगोळी महाराजांचा उदरनिर्वाह जेमतेम चालत असे. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी अशा चारजणांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती, मात्र स्वतःच्या प्रपंचामध्ये फार काळ न रमलेल्या रांगोळी महाराजांनी ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना स्वीकारत जग व जनकल्याणाचा विचार केला. विश्वबंधुत्वाची कल्पना त्यांना अतिशय प्रिय होती. स्वतःविषयी बोलताना ते नेहमी ‘हे शरीर केवळ परोपकारासाठी आहे’ असे सांगत. लग्न आणि संसार करूनही त्यात मन न रमवता रांगोळी महाराजांनी संन्यस्तवृत्तीने राहून जगाचा संसार चालवण्याकडे प्राधान्य दिले.
श्रीरांगोळी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अतिशय भारदस्त होते. त्यांना अतिशय उंचापुरा आणि भव्य देह लाभला होता. श्रीस्वामी समर्थांकडून भगवी कफनी प्राप्त झाल्यानंतर ते कायम भगवी वस्त्रे परिधान करू लागले. त्यांच्या गोऱया देहावर भगवे वस्त्र आणि फेटा ही वेशभूषा शोभून दिसत असे. श्रीरांगोळी महाराजांचे डोळे पाणीदार होते आणि त्यांच्या चेहऱयावरील तेज इतके विलक्षण होते की, ते रस्त्याने चालत निघाले असता डौलदार चालीमुळे ते जाणाऱया-येणाऱयांचे लक्ष वेधून घेत असत. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर चांगलीच छाप उमटत असे. १९२४ साली श्रीरांगोळी महाराज शिरोडा येथे आले असताना तेथील स्थानिक रहिवाशांचा ते ‘गुप्तहेर’ असावेत असा समज झाला होता. गंमत म्हणजे, गोव्यातील पोलीसही त्यांना ब्रिटिशांचे ‘गुप्तहेर’ समजत असत.
Comments
Post a Comment