श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सोळावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सोळावा गुरुभक्तीचे माहात्म्य - धौम्य शिष्याची कथा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्धांना म्हणाला, "स्वामी, तुला श्रीगुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरुंच्याजवळ कोण राहिले ? पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला.

ते म्हणाले, "नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस. माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते. तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे.तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे. मला श्रीगुरुचरित्र आठवले. आज तूच मला सुधामृतसागरात लोटले आहेस. तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या घरी कधीही दुःख-दारिद्र्य येणार नाही. तुला सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतील.तुझ्या घरी अष्टैश्वर्ये नांदतील. श्रीगुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. श्रीगुरुच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरू वैजनाथक्षेत्री गुप्तपणे राहिले. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो. एक वर्षभर श्रीगुरुंचे तेथे वास्तव्य होते. एके दिवशी एक तपस्वी ब्राम्हण श्रीगुरूंच्याकडे आला व त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला, "स्वामी, मी अज्ञानासागरात बुडलो आहे. माझा उद्धार करा. माझे रक्षण करा. मी खूप दिवस तप केले; पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही. माझे मन एकाग्र होत नाही. ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे. आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीच या विश्वाचे तारक आहात. तुम्ही सद्गुरु आहात. म्हणून मला उपदेश करा म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल." तो ब्राम्हण असे म्हणाला असता, श्रीगुरु हसून म्हणाले.

"तू स्वतःला तपस्वी म्हणवितोस, तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे." श्रीगुरू असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राम्हण रडत रडत म्हणाला, "मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत. मला फार त्रास देतात. मला वाटेल ते टाकून बोलतात. जी कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात. मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काहीच शिकवीत नाहीत. 'तुझे अंतःकारण अद्याप स्थिर, शांत नाही.' असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात; पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानीत नसे.

त्यामुळे ते माझ्यावर खूप रागावत असत. या सर्व त्रासांतून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला." त्या ब्राम्हणाचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना हसू आले. ते त्याला म्हणाले, "तू मोठा आत्मघातकी आहेस. हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून,दुसऱ्याला अपशकून करण्यासारखे आहे. तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू गुरुद्रोही आहेस. मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार ? घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळविण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे ? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा? जो गुरुद्रोही असतो त्याचे इह-पर कल्याण कधीच होत नाही. त्या दिवांधकाला ज्ञान प्राप्त कसे होणार ? जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्वप्रकारचे ज्ञान होते.अष्टसिद्धी वश होतात. यासाठी गुरूला शरण जावे."

श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो ब्राम्हण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण जगद्गुरु आहात. मी केवळ अज्ञानी आहे. माझा उद्धार करा. मला गुरुची ओळख नाही. त्यामुळेच माझ्या हातातून प्रमाद घडला. मला आता त्याविषयी सविस्तर सांगा." त्या ब्राम्हणाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंना त्याची दया आली. ते त्याला म्हणाले, "गुरु हे मात्यापित्यासमान असतात. गुरु हा ब्रम्हा-विष्णू-महेशस्वरूप असतो. त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते, म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे. द्वापारयुगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे.

त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते. तयंचा एक आश्रम होता.त्या आश्रमात अनेक शिष्य होते. ते आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते. त्याच आश्रमात अरुणी, बैद (वेद) व उपमन्यू असे तीन शिष्य आपल्या गुरुंची सेवा करीत वेदाध्ययन करीत होते. पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करावयास लावत. ती कामे शिष्य किती चिकाटीने, कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत. मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या सिश्यावर तत्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत. धौम्यऋषी याच परंपरेतील होते. एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे काळे मेघ जमले होते. धौम्यऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवीत होते.त्याचवेळी मोठा वारा सुरु झाला, विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरु झाला. पाण्याचे लोट वाहू लागले. धौम्यऋषी मोठ्या काळजीत पडले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "इतका मोठा पाऊस पूर्वी कधी पडला नव्हता. आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सगळ पीक वाया जाईल."

हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार ! काय ही कटकट ! " असा विचार करून, काहीतरी कारण काढून एकेक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला. त्या शिष्यांत आरुणी नावाचा जो शिष्य होता, तो अत्यंत नम्र, कष्टाळू होता. गुरुंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे. आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे. आरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, "गुरुदेव, मला आज्ञा करा. मी जातो व बांध पक्का करून येतो." धौम्य म्हणाले, "जा बाळ, बांध घट्ट करून ये, कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस."

आरुणी धावत शेतात गेला. पाऊस पडताच होता. शेताचा बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. आरुणीने मोठेमोठे दगड आणून टाकले, माती घातली पण पाण्याला इतका ओघ होता, की आडवे सगळे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे ? आरुणीपुढे मोठा प्रश्नच उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा ? पाणी कस अडवायचं ? आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं. छे छे ! हे होणे नाही, प्राण गेला तरी चालेल. पण तसाच परत नाही जायचं. आरुणीने निश्चयपूर्वक ठरविले. विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली.शेताचा बांध जेथे फुटला होता तेथे तो आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी माती, दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली.त्यामुळे चांगला बांध तयार झाला. जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंबसुद्धा वाहून जात नव्हता. आरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता.

संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी आरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्यऋषी मोठ्या काळजीत पडले.ते उठले, मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले; पण आरुणी कुठे दिसत नव्हता, "अरे आरुणी बाळा , कुठे आहेस रे ?" अशा हाक मारू लागले; पण स्थिर उत्तर मिळेना. धौम्यऋषी व्याकूळ झाले. शेतात शोधू लागले. आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी आरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्ध गेली होती. शरीर पार गारठले होते. सारा प्रकार धौम्यऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी आरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले.गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने आरुणी सावध झाला. त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. तयची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. तय्च्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "बाळ आरुणी ! तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील.तुझे जीवन सुखी होईल." त्यांच्या आशीर्वादाने आरुणी तत्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धौम्यऋषी त्याला म्हणाले, "आरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. सेवेच्या कृपेने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा.विवाह करून सुखाने संसार कर." आपल्या गुरूंचा निरोप घेऊन आरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा आरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. गुरूंचा आशीर्वाद खरा झाला. संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी आरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्यऋषी मोठ्या काळजीत पडले.ते उठले, मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले; पण नामधारक सिद्धांना म्हणाला, "स्वामी, तुला श्रीगुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरुंच्याजवळ कोण राहिले ? पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा." नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला.

आरुणी निघून गेल्यावर धौम्यऋषींनी आपला दुसरा शिष्य बैद (वेद) याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. बैद हा आरुणीप्रमाणेच आपल्या गुरुंची अगदी मानुभावे सेवा करीत होता. एके दिवशी धौम्यऋषी त्याला म्हणाले, "तुला मी आता एक सागतो ते ऐक. तू आता आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भातशेतीची नित देखभाल कर. पीक तयार झाले की धन्य घरी आण." धौम्यऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्याप्रकारे देखभाल करू लागला. तो दिवस-रात्र शेतात काम करीत होता. भातेशेती तयार झाल्यवर त्याने कापणी केली, झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास केली, मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले, "धान्य तयार झाले आहे. आता काय करू ?"

धौम्य ऋषी म्हणाले ,"तू खूप कष्ट केले आहेस. आता तयार झालेले धान्य घेऊन ये." असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा जुंपलेला गाडा दिला. बैद गाडा घेऊन शेतात गेला. त्याने दोन खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे निघाला ; पण दो खंडी भात रेड्याला ओढवेना. आता काय करायचे असा बैदापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्याने जोखडात स्वतःची मान अडकविली व तो रेद्यासह गाडा ओढू लागला. वाटेत चिखलात रेडा रुतला. खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे ? असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला.

गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव कासावीस झाला; पण तो डगमगला नाही. थांबला नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला. बैदाची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली. त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. बैदाची भक्ती, श्रद्धा, कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्यऋषी प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. "तू सर्वशास्त्रसंपन्न होशील." त्याचक्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परत गेला. धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू. तोही आपल्या गुरुंची मनोभावे सेवा करीत असे. धौम्य ऋषी आपल्या शिष्याची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत. उपमन्यूची भूक मोठी होती. त्यामुळे तो खूप खात असे. अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड होती. त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे. यावर गुरुंनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गाई-गुरे चारण्याचे काम दिले. गुरूंच्या आज्ञेने तो दररोज गुरे- वासरे रानात घेऊन जात असे. उपन्यू दिवसभर गाई-गुरे रानात चरत असे व त्या संध्याकाळी परत आणीत असे. आता याची परीक्षा घ्यायची असे गुरुंनी ठरविले. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले, "बाळ उपमन्यू, मी तर तुला खायला काहीही देत नाही तरीसुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे ?"

उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, गुरे-वासरे रानात चरत असताना मी दुपारच्यावेळी जवळपासच्या चार घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो." गुरु धौम्य म्हणाले, "अरे, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही. ते पाप आहे. तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा." गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला, पण गुरु त्या भिक्षेतील एक कानही उपमन्यूला देत नसत.काही दिवसांनी गुरुंनी पुन्हा विचारले, "बाळ, आता तू काय खातोस ?" उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो." तेव्हा गुरु म्हणाले, "अरे ! दोन वेळा भिक्षा मागणे पाप आहे." उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले. तरीसुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट ! गुरुंनी विचारले, "आता काय खातोस ? " उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, आता मी गाईचे दुध पितो." गुरु म्हणाले, "अरे, हे तर सर्वात वाईट !" उपमन्यूने गुरंची आज्ञा मान्य केली.काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखा पुष्ट पाहून गुरुंनी, "बाळ, आता काय खातोस ?" उपमन्यू म्हणाला, "गुरुदेव, रानात गाईंना वासरे पिऊ लागली कि त्यांच्या तोंडातून दुध बाहेर गळते. गळणारे ते दुध मी द्रोणात धरून पितो." तेव्हा गुरु म्हणाले, "अरेरे, ही तर सर्वात वाईट गोष्ट. उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते." उपमन्यूने तेही सोडून दिले. आता त्याला उपवास घडू लागला. काय खावे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे. एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे उपन्यूने पाहिले.त्याला वाटले, ते दुध आहे 'हे उष्टे दुध नाही' असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला.दूध समजून तो प्याला पण पितापिता त्याच्या डोळ्यात चीक गेला. त्यामुळे त्याची दृष्टीच गेली. तो आंधळा झाला.त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले. आता गुरांना घरी कसे न्यायचे ? त्याच्यापुढे मोठाच प्रश्न पडला. आता आपणास गुरुदेव रागावणार ? त्यांना काय सांगायचे ? त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना.

संध्याकाळ झाली. गुरे आश्रमात परत गेली. अजून उपन्यू कसा आला नाही ? याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली. ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले. ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले.गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपन्यू मोठ्यांदा म्हणाला , "गुरुदेव, मी येथे विहिरीत पडलो आहे." तू विहिरीत कसा पडलास ? " असे त्यांनी विचारले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले. ते ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनात अपार कृपा आली. त्यांनी उपन्यूला अश्विनीकुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. त्याने अश्विनीकुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनीकुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले. उपन्यूचा भक्तिभाव, त्याची गुरुवरील अनन्यनिष्ठा पाहून धौम्यऋषींनी त्याला पोटाशी धरले, प्रसन्न झालेल्या धौम्यऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला. त्याचक्षणी उपन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्याने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. धौम्यऋषी त्याला म्हणाले, "तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर. तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुला अनेक शिष्य मिळतील. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जनमेजय राजाल सर्पसत्रात मदत करील. इंद्राला तक्षकासह शरण आणील." धौम्यऋषींनी असा आशीर्वाद दिला स्त उपमन्यू आनंदाने स्वगृही गेला.

सिध्द म्हणाले, "नामधारका, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे माहात्म्य या विषयी श्रीगुरूनृसिंहसरस्वतींनी त्या तापसी ब्राम्हणाला धौम्यऋषींच्या कथा सांगितल्या. त्या कथा सांगून श्रीनृसिंहसरस्वती ब्राम्हणाला म्हणाले, "तू गुरु कडक बोलतात, वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरुंची निंदा केलीस हे महापाप आहे." श्रीगुरूनृसिंहसरस्वती असे बोलले असता तो तापसी ब्रम्हान पश्चातापाने पोळून निघाला. मोठ्यांदा रडू लागला. स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे बोलू लागला, 'पश्चातापेन शुध्यति' या वचनानुसार त्या ब्राम्हणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले. श्रीगुरुंनृसिंहसरस्वतींच्या कृपेने त्या ब्राम्हणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग श्रीगुरु त्याला म्हणाले, "आता तू तुझ्या गुरुच्याकडे परत जा. ते तुझा स्वीकार करतील. तू त्यांची सेवा कर यातच तुझे कल्याण आहे." त्या तपस्वी ब्राम्हणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला." सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "तो ब्राम्हण निघून गेल्यावर श्रीनृसिंहसरस्वती कृष्णानदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले. तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला.त्या विषयीची कथा नंतर सांगतो."

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गुरुभक्तीचे माहात्म्य - धौम्य शिष्याची कथा' नावाचा अध्याय सोळावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments