सर्व आईंना समर्पित


*इंद्राच्या दरबारात*
*एक पत्र आलं*
*देवराया आईला सांगा*
*डोळ्यात पाणी आलं* 

*आज Mothers day म्हणून*
*आठवण जास्त झाली* 
*लहान वयातच आई*
*दूर निघून गेली* 

*असणाऱ्याला मोल नसतं*
*गेल्यावर येतं रडू*
*चंदनाच्या खोडा सोबत* 
*संबध नका तोडू* 

*ती स्वर्गात गेल्यावर* 
*उपयोग नाही रडून* 
*जिवंतपणी थोडे तरी* 
*ऋण टाका फेडून*

*काळी सावळी आहे म्हणून*
*तिरस्कार नको*  
*एक दिवस तरी डीपीत*
*का स्थान नको ?*

*सुरुकुतलेल्या देहाचा* 
*अपमान नका करू* 
*दुःखाने तिची ओटी*
*कधीच नका भरू* 

*दोन शब्द गोड बोला*
*बाकी अपेक्षा नाही* 
*चंदनाचा हार घालून*
*पुन्हा उपयोग नाही* 

*ती कुठे म्हणत असते*
*सदैव सेवा करा*
*थरथरत्या हाताला*
*क्षणभर तरी धरा* 

*कशी आहेस ? काळजी घे* 
*एवढं तरी बोला* 
*शब्द नाही फुटणार पण*
*पदर होईल ओला* 

*भावना जर कळाल्या* 
*तरच अर्थ असतो* 
*MS , MD , M tech*
*कागद व्यर्थ असतो* 

*जन्मभर साजरा केला* 
*तरी उपकार फिटतील का ?*
*" Day " आहे म्हणून तरी* 
*मुलं आईला भेटतील का ?*

*आईसाठी ज्यांच्याकडे*
*कधीच वेळ नसतो* 
*कोण म्हणतं असा मुलगा* 
*खूप महान असतो ?*

*आई तर आईच असते*
*मूल होता येईल का ?*
*स्वर्ग रथात निघणाऱ्याला* 
*वेळ देता येईल का ?*


*आईने मोजलेच नाही...* 

आयुष्याच्या तव्यावरती 
संसाराची पोळी
भाजता भाजता 
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...
नवर्‍यासह लेकराबाळांचे 
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले , 
आईने मोजलेच नाही...
बाळाला किती झोके 
दिले आईने मोजले च नाही
बाळा साठी किती रात्री
जागले आईने रात्री मोजल्याच नाही
जरा चुकले की 
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली , आईने मोजलेच नाही...
याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी 
किती जगले ,आईने
मोजलेच नाही...
पाखरे गेली फारच दूर 
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर ,आईने
मोजलेच नाही...🦋
🏵 *सर्व आईंना समर्पित...*🙏🏻🙏🏻🙏💐💐💐

Comments