भोजनोत्तर पोटावरून हात फिरविण्याची प्रथा आहे. त्यामागे शास्त्र आहे, की तो सवयीचा भाग असतो ?
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
*🏵 भोजनोत्तर पोटावरून हात फिरविण्याची प्रथा आहे. त्यामागे शास्त्र आहे, की तो सवयीचा भाग असतो ?*
*भोजनानंतर पोटावरून हात फिरविण्याची प्रथा आहे, त्यामागे शास्त्रही आहे. हात फिरविताना खालील श्लोक म्हणण्याचा संकेत आहे-*
*अगस्त्यं कुम्भकर्णं च शनिं च वडवानलम् ।। आहारपरिपाकाय, स्मरेद् भीमं च पञ्चमम् ।।*
*केवळ तीन आचमनात अख्खा समुद्र प्राशन करणारा अगस्त्य मुनी, महाप्रचंड आहार घेऊन तो उत्तम प्रकारे पचविणारा कुंभकर्ण, सर्वभक्षक शनी, सर्व अरण्य भस्मसात करणारा वडवानल, अतिप्रचंड भुकाळू भीमदेव यांचे स्मरण होताच पोटातील अन्न उत्तम पचते.*
*अन्न भक्षण करीत असताना वरील श्लोक म्हटल्यास आहाराचे प्रमाण वाढते, अत्यधिक आहार, अनिष्ट असतो; पण भोजन झाल्यावर मात्र हा श्लोक म्हटल्यास तो शुभफलदायी ठरतो.*
*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*
Comments
Post a Comment