श्री नृसिंह जयंती



--------------------------
*श्री नृसिंह जयंती*
-------------------------

वैशाख शु.१४
६ मे २०२०

*आज नृसिंह जयंती.* 
आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला.
----------------------------------------------
*नरसिंह जयंती कथा अशी आहे*
----------------------------------------------- 
हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. 'देवांपेक्षा मीच मोठा', असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. 'नारायण नारायण' असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. त्याप्रमाणे प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकण्यात आले, उकळत्या तेलात टाकण्यात आले, आगीमध्ये पेटवण्यात आले. पण सर्व परिस्थितीत प्रल्हाद "नारायण नारायण" असा जप करतच राहिला आणि प्रत्येक संकटातून भगवान (विष्णू ) नारायणाने प्रल्हादाला वाचवले. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ''बोल, कुठे आहे तुझा देव ?'' प्रल्हादाने सांगितले, ''सगळीकडे.'' राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ''दाखव तुझा देव या खांबात.'' तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला;
 कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल हा विश्वास ठेवा.
----------------------------------------
*नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य* 
----------------------------------------
हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.
-----------------------------------------------

-----------------------------------------------
 ------------------------------
*नृसिंह जयंती विशेष :*
------------------------------

 *या दिवशी काय करावे जाणून घ्या*

वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. या दिवशी प्रभू श्री नृसिंह यांनी खांब चिरून भक्त प्रह्लादाची रक्षा करण्यासाठी अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
 
*या प्रकारे करा नृसिंह जयंती व्रत*
 
१. या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठावे.
 
२. संपूर्ण घराची स्वच्छता करावी. 
 
३. नंतर गंगा जल किंवा गोमूत्र शिंपडावे आणि घर पवित्र करावे. 
 
४. तत्पश्चात निम्न मंत्र उच्चारण करावे :-
 
भगवान नृसिंह पूजन मंत्र -

*नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे।*
*उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितः॥*
 
५. या मंत्रासह दुपारी क्रमशः तीळ, गोमूत्र, मृत्तिका आणि आवळा मिसळून पृथक-पृथक चारवेळा स्नान करावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे.
 
६. पूजा स्थळी शेणाने सारवून कळश्यात तांबा व इतर वस्तू घाउून त्यात अष्टदल कमळ तयार करावे. 
 
७. अष्टदल कमळावर सिंह, भगवान नृसिंह आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. तत्पश्चात वेदमंत्रांनी प्राण-प्रतिष्ठा करुन षोडशोपचार पूजन करावे.
 
८. रात्री गायन, वादन, पुराण श्रवण किंवा हरि संकीर्तनने जागरण करावे. दुसर्‍या दिवशी पुन्हा पूजन करुन ब्राह्मणांना भोजन घालावे.
 
९. या दिवशी व्रत करावा.
 
१०. सामर्थ्यनुसार भू, गौ, तीळ, स्वर्ण व वस्त्रादि दान करावे.
 
११. क्रोध, लोभ, मोह, झूठ, कुसंग आणि पापाचाराचा त्याग करावा.
-----------------------------------------------

-----------------------------------------------
--------------------
*नृसिंह जयंती*
--------------------

 *आज करा हे उपाय*

नृसिंह जयंती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशीला साजरी केली जाते. भगवान नृसिंहाच्या जन्माचे हे सण आहे. ज्या वेळी विष्णूंना राग आला होता त्यावेळी त्याने हे रुद्रावतार घेतले होते. हे रुद्रावतार त्यांनी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी घेतले होते. या रुद्रावताराने नृसिंहाच्या अंगाची लाही लाही झाली होती. त्यासाठी त्यांना थंड वस्तू अर्पण केल्या जातात. 
 
वेगवेगळ्या वस्तूंना अर्पण करून भाविकांना वेगवेगळी फळ प्राप्ती होते. तसेच नृसिंह जयंतीला हे उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात. या दिवशी सकाळी अंघोळ करून नृसिंहाच्या देऊळात जाऊन त्यांची पूजा करण्याचा नियम असे. चंदन आणि फुलांनी नृसिंहाची पूजा करून नैवेद्य अर्पण करावा.
 
*नृसिंह जयंतीसाठी उपाय -*

१) आपल्या पैशांना वाचविण्यासाठी नृसिंहाला नागकेशर अर्पण केले जाते. त्यामधील नागकेशराला आपल्या बरोबर घेऊन जावे. आणि घरातल्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये जेथे आपण पैसे आणि दागिने ठेवतो तेथे ठेवावे.
 
२)  आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास आपल्याला त्याची काही विधी विधान पूजा करता येत नसल्यास या दिवशी नृसिंहाच्या देवळात जाऊन एक मोरपीस अर्पण केल्यास आपल्याला त्वरित आराम मिळेल. 
 
३)  कायदाच्या कचाट्यात सापडले असल्यास कोर्टाच्या पायऱ्या चढून दमछाक झाली असल्यास नृसिंह जयंतीला नृसिंहाला दह्याचा नैवेद्य दाखवावा.
 
४)  प्रतिस्पर्धेच्या त्रासाने त्रस्त असल्यास तसेच अज्ञात शत्रूंचे भय होत असल्यास बर्फाचे पाणी नृसिंहाला अर्पण करावे आपल्याला सर्व दृष्टीने यशःप्राप्ती होईल. 
 
५)  आपल्या पासून कोणी दुरावलेले असल्यास किंवा आपल्या नात्यात दुरावा आल्या असल्यास नृसिंहाचा देऊळात मक्याचे पीठ दान करावे.
 
६)  आपण कर्जबाजारी झाले असल्यास किंवा आपले पैसे कुठे अडकलेले असल्यास नृसिंहाला चांदी किंवा मोती अर्पित करावे.
 
७)  दीर्घ काळापर्यंत आजारी असल्यास किंवा तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नसल्यास नृसिंहाला चंदनाचा लेप अर्पण करावा.
 
विशेष: मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरात मनोभावे पूजा करून या वस्तू अर्पित कराव्या.
----------------------------------------------

----------------------------------------------------------------------------
*धोमचे नृसिंह मंदिर*
----------------------------

सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, की तेथे आले, की पाय निघण्याचे नाव घेत नाहीत.

वाईमधील सर्व लोक त्या भागाला महाभारतात फार महत्त्व होते असे सांगतात 'विराट राजाची' 'विराट नगरी' म्हणून 'वाई' अशी आणि अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. वाळकी आणि कृष्णा या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर धोम नावाचे टुमदार निसर्गरम्य गाव आहे. ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले आहे. एका बाजूला पांडवगड, एका बाजूला केंजळगड, तर धरणाच्या जवळ परंतु पलीकडील बाजूला हाकेच्या अंतरावर उभा ठाकलेला 'कमळगड'... ह्या सर्व किल्यांच्या कुशीमध्ये हे धोम गाव लपलेले आहे. 'कमळगडा'च्या पोटामध्ये कावेची विहीर हे वैशिष्ट्यपूर्ण पाषाणशिल्प आहे. मुळातच धोम आणि परिसर यांवर निसर्गाची एवढी कृपा आहे, की साऱ्या बाजूंनी डोंगररांगा आणि हिरवागार परिसर. पर्यटकाचे गावाच्या बाजूने वाहणारी कृष्णा नदी- त्यावर बांधलेले धरण हे सारे काही पाहूनच मन भरते.

*पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात.*
 त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. त्याचे आवार बंदिस्त आहे. ते शिवालय म्हणजे शिवपंचायतन आहे. मंदिर पाषाणामध्ये उभारलेले आहे. ते पाहत असताना प्रवाशाची नजर खेचून घेतो तो समोरचा नंदी. तो नंदी पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा आहे. नंदीची रचना फार कल्पना करून उभारलेली आहे. हा नंदी शिवपंचायतन आणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे. त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. त्यामध्ये अजून एक संकल्पना मांडलेली जाणवते; ती अशी, की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!

निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेल्या त्या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. शिवपंचायतनावर केलेले रेखीव नक्षीकाम मनाला भुरळ पाडते.

पुढे जाताना एका उंच अष्टकोनी जोत्यावर  'श्री नरहर-नृसिंह' मंदिर उभारलेले आहे. मंदिरात जाण्यास पायऱ्या खोदलेल्या आहेत. मंदिराच्या आत गेल्यावर पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन स्थापन केलेल्या रेखीव मूर्ती आहेत. त्यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.

*नृसिंह मंदिरामध्ये*
 प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.

मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.
*- शंतनू परांजपे*
----------------------------------------------

---------------------------------------------- -------------------------------------------
*सूर्यास्तानंतर या गोष्टी करू नका,*
-------------------------------------------
*हिंदू शास्त्रानुसार या गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत.*

पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात अशा बर्‍याच गोष्टींचा उल्लेख आहे ज्यावर लोक अजूनही विश्वास ठेवतात. ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे की ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही किंवा रात्री निषिद्ध काम करतात त्यांच्यावर लक्ष्मी रागावू शकते. येथे आम्ही आपल्याला काही नियमांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तसेच बर्‍याच गोष्टी तार्किक आणि वैज्ञानिकही वाटतात. तथापि, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवता की नाही हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. 
*तर जाणून घेऊ अशा गोष्टींविषयी जे सूर्यास्तानंतर नाही करायला पाहिजे.*  
 
*१- संध्याकाळी अंघोळ केल्यावर कपाळावर चंदन लावू नका-*
असा विश्वास आहे की जर आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर अंघोळ केली तर कपाळावर चंदन लावू नये. कारण असे आहे की जर आपण रात्री चंदन लावून झोपले तर चंदनाचे कवच आपल्या डोळ्यांत पडतील जे डोळ्यांच्या दृष्टीस हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आपल्याला काही लावायचे असेल तर भभूति लावू शकता.
 
*२)- रात्री केशर किंवा हळदीशिवाय दूध पिऊ नका-*
दुसरी मान्यता अशी आहे की रात्री दुधात थोडी हळद किंवा केशर मिसळला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर थोडासा गूळ मिसळा. यामागील कारण म्हणजे दुधाचे स्वरूप थंड आहे आणि साधा दूध रात्री अधिक थंड होईल ज्यामुळे आपल्याला सर्दी आणि खोकलाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही आजारी असाल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्यापासून दूर राहील.
 
*३) - रात्री कपडे धुऊ नका-*
असे मानले जाते की रात्री कपडे धुऊ नयेत. असे म्हणतात की रात्री कपडे धुऊन ते वाळवल्याने नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते. अशा कपड्यांचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होतो.जर संध्याकाळपर्यंत कपडे वाळले नाही तर रात्रीच्या वेळी ते छताखाली पसरवा.
 
*४)-  रात्री दूध किंवा अन्न झाकून ठेवा-*
असेही मानले जाते की रात्री दूध किंवा इतर अन्न नेहमी झाकून ठेवा. जरी आपण या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तरी त्यांना झाकून ठेवा. असे म्हणतात की जेवण उघडे ठेवले तर रात्रीची नकारात्मक ऊर्जा त्यात प्रवेश होतो. दुसरा तर्क असा आहे की रात्रीच्या वेळी बर्‍याच प्रकारचे लहान कीटक बाहेर पडतात जे तुमच्या दुधात पडतात आणि तुम्ही आजारी होऊ शकता.
 
*५) - सूर्यास्तानंतर दाढी करू नका-*
असेही म्हटले जाते की रात्री केस कापू नये किंवा शेविंग देखील करू नये. कारण असे केल्याने तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि लक्ष्मी रागावू शकते.
---------------------------------------------

----------------------------------------------------------------------
*चाणक्य नीती*
-----------------------


१). मेहनत केल्याने दारिद्र्य दूर होतं, धर्म पाळल्याने पाप टिकत नाही, मौन राहिल्याने कलह होन नाही आणि जागृत राहिल्याने भय वाटत नाही. 
 
२). संसार एक कडू वृक्ष आहे ज्याचे दोन फळंच गोड असतात- एक मधुर वाणी आणि दुसरं सज्जनांची सुसंगतता.
 
३). ज्या व्यक्तीचा पुत्र त्यांच्या सांगण्यात असतो, ज्याची पत्नी आज्ञानुसार आचरण करते आणि जी व्यक्ती स्वत: कमावलेल्या धनाने पूर्णपणे संतुष्ट असते अशा लोकांसाठी संसारच स्वर्गासमान आहे. 
 
४). सुखी गृहस्थाची ओळख, ज्याची संतान आज्ञाधारक असेल. वडिलांचे देखील कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन व्यवस्थित रित्या करावे तसेच विश्वास करता येणार नाही अश्यांना मित्र म्हणणे चुकीचे ठरेल आणि जिच्याकडून सुख प्राप्ती होत नसेल ती पत्नी व्यर्थ आहे. 
 
५) . जे मित्र समोर गोड बोलतात पण पाठ वळताच आपल्या कार्यात अडथळे निर्माण करतात त्यांचा त्याग करणेच योग्य आहे. चाणक्य म्हणतात की असा मित्र त्या भांड्यासारखा आहे ज्यातील वरील भागात तर दूध दिसतं परंतू आता विष भरलेलं आहे.
----------------------------------------------

----------------------------------------------

 --------------------------
*रुक्मिणीचे माहेर* 
 *कौंडिण्यपूर*
--------------------------

रुक्मिणीला लग्न करायचे होते फक्त कृष्णाशीच. आई-वडिलांनी तर स्वयंवराचा घाट घातलेला. काय होणार या चिंतेने ग्रासलेली रुक्मिणी रिवाजाप्रमाणे जगदंबेची ओटी भरायला निघालेली आणि कृष्णाने रुक्मिणीला चक्क त्या जगदंबेच्या साक्षीनेच पळवून नेले. रुक्मीणीचे हे जे माहेर आहे ते म्हणजे कौंडिण्यपूर.

अमरावतीपासून ४१ किमी अंतरावर हे एक छोटेसे गाव आहे. या माहेरी भेट देतांना गंमत वाटते. जहांगिरपुरच्या मारुतीपासून एक रस्ता आत वळलेला आहे. दोन्ही बाजूला हिरवी डोलणारी शेतं आणि नजर जाईल तिथपर्यंत असणारी झाडं यांच्या मधून जाणारा हा रस्ता प्रवासाचा शिण येऊ देत नाही. या सार्‍यामध्ये रस्ता कधी संपतो हे ही कळत नाही.

आणि आपण पोहचतो एका छोट्याशा गावात. कौलारू घरांची दाटी असलेलं नदीच्या काठावरचं टूमदार गाव. या गावाच्या बाजूने वर्धा नदी वाहते. खूप मोठे विस्तीर्ण आणि काहीसे उथळ पात्र नदीचे आहे. या नदीच्या काठावर एका उंच टेकडावर आहे रुक्मिणीचे मंदिर. या टेकडावर जायला दगडी पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून वर पोहचले की काहीशा ठेंगण्या दरवाज्यातून आपण आत मंदिरात प्रवेश करतो. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अगदी पारंपरिक मंदिराप्रमाणेच आहे. मंदिरात गाभार्‍याच्या आधी मोठे ऐसपैस चौकोनी सभागृह आहे. या सभागृहात कार्तिक महिन्यात भरणार्‍या यात्रेच्या काळात आणि देवीच्या नवरात्रामध्ये किर्तन होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अच्युत महाराज यांच्यासारख्यांची समाजजागृती करणारी प्रवचने या सभागृहात झाली आहेत. 

सभागृहापुढे एक अरुंद असा गाभारा आहे. या गाभार्‍यात जगदंबेची काळ्या पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात, हे मंदिर आणि अमरावतीचे देवीचे मंदिर हे भुयारी मार्गांनी जोडलेले आहे. या मंदिरानंतर आणखी एक छोटे मंदिर लागते. ते आहे विठ्ठल रुखमाईचे. अंबिका ही इथली कुलदेवता असल्यामुळे आधी तिचे दर्शन घ्यायचे आणि मग विठ्ठल रुखमाईचे दर्शन घ्यायचे अशी प्रथा येथे आहे. या मंदिराभोवती फरश्यांनी बनवलेला ऐसपैस प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपसूकच गावाचं चारही बाजूने दर्शन होतं. 

इथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले तेव्हा पूर्वीच्या संपन्न गावाच्या खाणाखुणा दाखविणारे काही अवशेष सापडले. त्यावरून येथे पूर्वी शहर वसले असावे, असा निष्कर्ष काढता येतो. इथे प्रचलित असलेली एक दंतकथा अशी - 

*रुक्मिणीचा भाऊ रुक्मीने त्याचा मित्र शिशुपालला रुक्मिणी देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, ' तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप दिला आणि कौंडिण्यपूर शहरचे शहर पालथे होऊन गाडले गेले. याचा पुरावा देतांना गावकरी असेही सांगतात, जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्याच उपड्या घालून ठेवल्यासारख्या होत्या.* 

असं हे कौंडिण्यपूर!
आपण अतिप्राचीन इतिहासापासून क्रमाने जावू या....
रामाची आजी.. दशरथाची आई आणि अज राजाची राणी इंदुमती कौंडीण्यपूरची राजकन्या, आगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा इथलीच , कंसाची आणि देवकीची आई म्हणजे कृष्णाची मातुल आजी राजा उग्रसेनची पत्नी पद्ममावती जी कौंडिण्यपूरच्या राजा सत्यकेतुची कन्या (अर्थात कृष्णाच नाते पुर्वी पासूनच कौंडिण्यपूरशी होते.) पुढे कालिदासानी अमर केलेले पात्र नल आणि दमयंती यातील दमयंती कौडिण्यपूरची. ज्याच्या भगिरथ प्रयत्नातून गंगा नदीला पात्र मिळाले त्या राजा भगिरथाची आई केशनी कौडिण्यपूरची. अशी स्त्रीयांच्या सौंदर्याची खान असलेल्या कौंडिण्यनगरीतून श्रीकृष्णानी रुक्मीनी चे तिच्या प्रेम आलापाच्या मागणीतून आणि शिशूपालाच्या तावडीतून हरण केले होते. अस हे स्थान आहे..
 संपूर्ण भारतावर ज्यांच्या जीवनकथांचा प्रभाव आहे, त्या राम आणि कृष्ण ह्या दोन महापुरुषांशी संबंध सांगणारे. हे कृष्णाचे सासर तर आहेच पण रामाचे वडिल दशरथ यांच्या आईचे माहेरही हेच. म्हणजे दशरथाचे आजोळ. असे हे दंतकथांनी गाजलेले टूमदार गाव, आणि रुक्मिणीचे माहेर एकदा तरी जावे असेच आहे.
------------------------------------
-----------------------------------------------
🙏🌹🤝🦚🌸🌼🌸🦚🤝🌹🙏

Comments