डोळा फडफडणे*

🌹 *डोळा फडफडणे* 🌹


शास्त्रामध्ये या विषयी अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे. भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत, मग त्या घटना शुभ असतील किंवा अशुभ असतील याचे पूर्व संकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ठ प्रकारचे डोळे फडफडणे ती क्रिया देत असते. 
 सामुद्रिक शास्त्र असे मानते की,पुरुषांमध्ये जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर हे अत्यंत शुभ समजलं जातं.आणि भविष्यामध्ये अश्या पुरुषा ना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांची अडलेली कामे होऊ शकतात, प्रमोशन होऊ शकतात, मोठ्या प्रमाणात पैसा त्यांच्याकडे येऊ शकतो. परंतु हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल, की महिलांचा उजवा डोळा जर फडफडत असेल , पापणी फडफडत असेल, तर महिलांसाठी ही अतिशय अशुभ अशी अशी घटना असते. भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ अशी घटना घडेल याच्या कडे ही गोष्ट संकेत करते.
 पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत असेल तर त्या मुळे या पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. ग्रहण लागण्याची शक्यता असते. शत्रुत्व वाढू शकते. म्हणून आपल्या वागण्यात बदल करायला हवा. जर हीच गोष्ट आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली, तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावी पापणी फडफडत असेल तर याचा अर्थ असा की नजीकच्या जीवनामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना कोणता ना कोणता फायदा नक्की होणार आहे. 
जर अशुभ पापणी फडफडत असेल तर पापणी वरुन सोन्याची  आंगठी फिरवा.
विवाहित स्त्रीया मंगळ सुत्राच्या वाट्या उलट्या करुन फिरवतात.
काहि दोष असेल तर दुर होईल.
पुरुषांची डावी पापणी व स्रियांची उजवी पापणी नाकाच्या बाजूस फडफडत असेल तर मोठे आजारपण , जिवावरचे संकट येण्याचे संकेत असतात .

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

Comments