शनी जयंती
🙏🌹🤝🦚🛐🐃🛐🦚🤝🌹🙏
*🙏🌹यालेखात काय वाचाल*
*१)शनी जयंती*
*२)शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी*
*३)शनी देवतेचे विषेश*
*४)विदर्भ दर्शन*
*५)शनीयंत्र*
*६)शनीशिंगणापूर माहिती*
--------------------
*शनी जयंती*
---------------------
*आज वैशाख मासातील अमावस्या असून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते.*
ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे.
यंदा शनि जयंती येत्या २२ मे रोजी साजरी करण्यात येणार आहे.
शनिदेव सर्व ग्रहांमध्ये निपक्ष न्याकारी होण्यासोबत सर्वात जास्त खतरनाक ग्रहांमधील एक ग्रह मानला जातो.
*साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिजयंती चा दिवस अतिशय उत्तम योग आहे. यादिवशी शनि महाराजांना प्रसन्न करण्यासाठी केलेल्या उपायांचे फळ नक्कीच मिळते.*
_ज्योतिषशास्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला आनंदी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी त्याला आयुष्यातून तीन वेळा शनि दशेच्या मार्गाचा सामना करावा लागतो._
१) पहिल्या वेळेस शनि व्यक्तीच्या आयुष्यासोबत खेळतो,
२) दुसऱ्या वेळेस आयुष्यात खुप व्यथा पाठी लावतो आणि शेवटच्या
३) तिसऱ्या वेळेस त्या व्यक्तीचा सर्व धनपैसा संपण्याचा प्रयत्न करतो.
---------------------------------------------
*या दिवशी शनी देवतेला प्रसन्न*
*करण्यासाठी करा हे काम* ----------------------------------------
शनी जयंतीचा लाभ घेण्यासाठी सर्वातआधी स्नान इत्यादीहून शुद्ध होऊन
१) एका लाकडाच्या पाटावर काळं कापड पसरून त्यावर शनीची प्रतिमा किंवा फोटो किंवा एक सुपारी ठेवून त्याच्या दोन्हीकडे शुद्ध तूप आणि तेलाचे दिवे प्रज्वलित करावे.
२) या प्रतीकाला जल, दूध, पंचामृत, तूप, अत्तर याने स्नान करवून इमरती किंवा तेलात तळलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा.
३) नैवेद्य दाखविण्यापूर्वी त्यावर अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू आणि काजळ लावून निळे किंवा काळे फूल अर्पण करावे.
४) नैवेद्य अर्पण केल्यावर फळ आणि श्रीफळ अर्पित करावे.
५)या पूजेनंतर या मंत्राची किमान एक माळ जपावी.
*'ॐ प्रां प्रीं प्रौ स. शनये नमः'*
६) माळ पूर्ण झाल्यावर आरती करून शनीदेवाची आराधना करावी.
*शनी जयंतीला या कामांवर लक्ष द्या:*
* सूर्योदय पूर्वी शरीरावर तेल मालीश करून स्नान करावे.
* मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यावे.
* ब्रह्मचर्य पालन करावे.
* वृक्षारोपण करावे.
* यात्रा करणे टाळावे.
* तेलात तळलेल्या खाद्य पदार्थांचे दान गाय, कुत्र्या किंवा भिकार्याला करू नये.
* अपंग आणि वृद्ध लोकांची सेवा करावी.
* शनीचा जन्म दुपारी किंवा सायंकाळी असल्यावर मतभेद आहे. म्हणून या दोन्ही काळात मौन धारण करावे.
* या दिवशी सूर्य व मंगळाची पूजा करू नये.
* शनीची आराधना करताना त्यांच्या डोळ्यात बघू नये.
*या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते.*
----------------------------------------------
----------------------------------------
-------------------------------
*शनी देवतेची विशेषतः*
-------------------------------
शनी देवाच्या सन्मानार्थ शनी जयंती ही साजरी करण्यात येते. शनिदेवाची पूजा करण्यासाठी ती वैशाख महिन्याच्या अमावास्येस साजरी करण्यात येते.
*शनी विषयी काही उपयुक्त माहिती.*
राज्यकर्ता - ब्रह्मदेव
रंग - काळा
चव - तुरट
शनीचा शरीराच्या
अवयवांवरील अंमल - स्नायू
क्रमांक - ८
धातू - लोखंड तसेच शिसे व कथिल
*शनी हा अवकाशातील मंदगतीचा ग्रह म्हणून ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रात ह्यास खूपच महत्व आहे.*
शनी हा मुख्यत्वे नकारात्मक ग्रह म्हणून ओळखला जातो - त्यामुळे अनेक जण त्याला व त्याच्या परिणामांना घाबरतात. मात्र, ही मान्यता संपूर्णपणे खरी नाही - शनी हा शिस्तीचा असून नकारात्मक परिणाम देणारा ग्रह नाहीच - तो मंदगती ग्रह असल्याने सतत परिश्रम, नित्य शिस्त, नियमित कठोर श्रम व अनेकदा अडथळे व झगडल्या नंतरच त्याचे यश मिळते.
शनी एखाद्या व्यक्तीस चांगले किंवा वाईट फळ त्याच्या पूर्वीच्या व सध्याच्या कर्मानुसार देतो. शनी हा एक प्रभावी असा ग्रह आहे. विशेषतः शनी त्याचा प्रभाव साडेसाती दरम्यान व्यक्तीस दाखवतो.
दुसर्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, शनी हा आपल्या आयुष्यात शिक्षक किंवा न्यायाधीशाची भूमिका बजावतो. एखाद्याच्या कुंडलीत जर शनी प्रतिकूल अवस्थेत स्थित असला तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते व संघर्षमय व तणावयुक्त जीवन जगावे लागते. विशेषतः कुंडलीत विशिष्ट स्थानी अशुभ अवस्थेत तो असताना ह्याची प्रचिती येते.
वैदिक ज्योतिषशास्त्रा नुसार कुंडलीत शनी हा द्वितीयात, सप्तमात, तृतीयात, दशमात व लाभात असता शुभ समजला जातो, ह्या उलट जर तो चतुर्थात, पंचमात व अष्टमात असता अशुभ समजला जातो. शनी हा पश्चिमेचा राजा असून, मंद, यम, छायासुनू, कृष्णग, कपिलाक्ष, नील व सौरी ह्या नावाने सुद्धा ओळखला जातो. कुंडलीत शनी हा सप्तमात असता अतिशय शक्तिशाली असा मानला जातो. ह्या व्यतिरिक्त, वैदिक ज्योतिषशास्त्र प्रत्येक व्यक्ती आयुष्यात साडेसाती व पनोतीच्या प्रभावातून जात असल्याचे सांगते, व त्या दरम्यान व्यक्तीस कठीण परिस्थिती, संघर्ष किंवा प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. मात्र, वैदिक ज्योतिषशास्त्राने हे शोधून सिद्ध केले आहे कि शनी व्यक्तीस नेहमीच जीवनात दुःख देतो असे नाही. ज्यांच्यावर शनीची कृपा होते त्यांना आयुष्यात आव्हानांस सामोरे जावे लागत नाही, इतकेच नव्हे तर त्यांचे यश हे योग्य मार्गाने मिळविलेले असल्याने ते त्यांच्या जवळ कायमी स्वरूपात राहाते. ह्या व्यतिरिक्त, शनी महाराज, अशा व्यक्तींना अकल्पित प्राप्ती व उत्तम संधी प्राप्त करून देतात. शनी हा जसा हानिकारक आहे तसाच तो मदत करणारा सुद्धा आहे. आपल्या जीवनातील विविध गोष्टींवर ज्यात कारकीर्द समाविष्ट आहे, त्याचा प्रभाव असतो.
आयुष्य, मृत्यू, संपत्ती, घर, संतती, कायदेशीर लढाईचे परिणाम, चोरी, आतड्यांशी संबधित आजार इत्यादींवर शनीचे वर्चस्व असते. थोडक्यात, जर शनी एखाद्याच्या कुंडलीत अनुकूल स्थानी स्थित असला तर आश्चर्यकारक परिणाम मिळवून देतो, मात्र नकारात्मक ग्रहांच्या सान्निध्यात स्थित किंवा अशुभ स्थानी स्थित असला तर खूपच त्रासदायी ठरतो.
*आख्यायिका काय सांगते:*
शनी हा सूर्य व छाया ह्यांचा पुत्र आहे. शनी हा एक असा ग्रह आहे कि ज्यास त्याच्या पत्नीने व माता पार्वतीने शाप दिला आहे. आपली चूक समजताच माता पार्वतीने शनीला उ:शाप दिला कि जोवर शनी कोणास दैवी शक्तीची मदत करीत नाही तोवर व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची कार्ये मग ती त्याच्या भ्रमणा शिवाय किंवा विशिष्ठ स्थानावरील दृष्टी शिवाय होणार नाहीत.
*आख्यायिका अशी हि आहे कि*
शनी हा यमा (मृत्यू देवता) चा मोठा भाऊ आहे व त्यामुळे काहीवेळा यमाची भूमिका बजावतो व एखाद्याच्या आयुष्याचा शेवटही करतो. त्यामुळे, जर प्रतिकूल दशा असेल व त्यात शनीचे भ्रमण सुद्धा प्रतिकूल असेल तर व आयुष्याचा शेवट जवळ आला असेल तर शनी अवश्य मृत्यू देतो. त्याच प्रमाणे, ह्याच पद्धतीनुसार शनी विभक्तपणा किंवा शेवट ह्यांचे प्रतिनिधित्व करतो. शनीला आध्यात्म व त्याचे शिक्षण ह्यांची जोड सुद्धा आहे. कुंडलीत बलवान व योग्य भावात शनी स्थित असल्या शिवाय संत जन्मास येत नाहीत.
*ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे महत्व:*
उत्तर कलामृतानुसार शनीचे महत्व हे खालील प्रमाणे आहे. -
(१)प्रकृती अस्वास्थ्य (२)अडथळे (३)रोग (४)शत्रुत्व (५)दुःख (६)मृत्यू (७)नोकर / चाकर (८)मालमत्ता (९)जाती भिन्नता
(१०)आयुष्यमान (११)षंढपणा (१२)वारा (१३)वृद्धत्व (१४)मलीन कपडे (१५)काळा रंग (१६)रात्री जन्म झालेल्यांच्या वडिलांचे कारकत्व (१७)शूद्रत्व (१८)तामसी वृत्तीचे ब्राह्मण (१९)वेडे वाकडे केस (२०)यमाची आराधना (२१)खाली पहाणे (२२)खोटे बोलणे (२३)चोरी व निष्ठुरता (२४)प्रवाही तेल (२५)शिकारी (२६)पंगुत्व.
वर निर्देशन केल्या प्रमाणे कुंडलीतील बलवान किंवा अनुकूल शनी असता चांगले परिणाम मिळतात, मात्र तो जर बलहीन असला तर त्यात कमतरता किंवा त्रास होऊ शकतो, जे खाली दर्शविल्या प्रमाणे असते.
*ज्योतिषशात्रानुसार इतर विचार:*
वैदिक ज्योतिषशात्राच्या प्राचीन मतानुसार मकर व कुंभ ह्या दोन राशींचे स्वामित्व हे शनी कडे जाते. तो तुळेत २० अंशावर उच्चीचा तर मेषेत २० अंशावर निचीचा होतो. त्याची मुलत्रिकोण राशी हि कुंभ आहे. शनी हा दुःखाचा कारक ग्रह आहे.
ग्रहांच्या मंत्री मंडळात, शनी नोकराचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा रंग काळा आहे. त्याचे लिंग नपुसंक आहे. पंच महाभूतात तो वायूचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा वर्ण शूद्र मानला जात असून त्यात तामसी वृत्तीचे प्राबल्य असते. शनी शरीराने कृश व उंच, त्याचे डोळे मधाळ, तुफानी प्रवृत्तीचा, मोठाल्या दातांचा, सुस्तावलेला, पांगळा व ओबड घोबड केसांचा असतो असे मानले जाते. तो नेहेमी लंगडा, गंभीर व कठोर असा असतो. अशी प्रवृत्ती आपणास शनीच्या प्रभावाखालील व्यक्तीमध्ये दिसून येते. शनी एक वर्ष निर्देशित करतो. तो पश्चिमेकडे प्रबळ असतो. तो बुध व शुक्र ह्यांचा मित्र , तर रवी, चंद्र व मंगळ ह्यांचा शत्रू आहे. गुरु हा त्यास तटस्थ असून, राहू व केतू हे छाया ग्रह त्याचे मित्र असल्याचे मानले जाते.
*शनीचे परिणाम*
शनी बाबत खाली महत्वाचे काही मुद्दे दिले आहेत ते आपण जाणून घ्यावेत -
शनीचे अनुकूल परिणाम मिळण्यासाठी त्याचे २३,००० जप करणे आवश्यक आहे.
शनी हा एक प्रबळ ग्रह असल्याची नोंद घेणे आवश्यक असून त्याचा सर्व साधारण मानवी जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो. शनी हा मंदगतीचा ग्रह असून त्याचे एका राशीतील भ्रमण हे अडीच वर्षांचे असते, व त्यामुळे संपूर्ण कालचक्र फिरण्यास त्याला तीस वर्षे लागतात.
जन्म पत्रिकेत शनी ज्या स्थानी असेल त्याहून तो तिसर्या, सातव्या व दहाव्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. जेव्हां तो कुंडलीतील चंद्राच्या व्ययातून भ्रमण करतो तेव्हां जातकाची मोठी पनोती म्हणजेच साडेसाती सुरु होते. जेव्हां शनी, चंद्राच्या चतुर्थातून भ्रमण करतो तेव्हां छोटी पनोती सुरु होते जी अडीच वर्षाची असते. तसेच जेव्हा शनी, चंद्राच्या अष्टमातून भ्रमण करतो तेव्हा सुद्धा छोटी पनोती सुरु होते. हि सुद्धा अडीच वर्षाची असते.
शनी संघर्षाचा कारक ग्रह आहे. त्याच्या प्रभावाखाली व्यक्तीस अवघड अश्या आव्हानास सामोरे जावे लागते किंवा आयुष्यात बदल घडतात, जे सर्वतोपरी त्या व्यक्तीच्या अंतर्मनाच्या शक्तीवर व तो किंवा ती आव्हानास कसे सामोरे जातात त्यावर अवलंबून असते. ह्याची उज्ज्वल बाजू म्हणजे व्यक्ती आध्यात्माकडे झुकते, त्यास परिपकवता येते व आयुष्यातील कोणत्याही आव्हानास सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते. बलवान शनी कुंडलीत असता व्यक्ती शांत, दृढनिश्चयी, स्वस्थ, नम्र, काळजीवाहू, हुशार, कौशल्यवान, व्यवस्थापक व उत्तम अंमल बजावणी करणारी अशी असते. तो जातकास आध्यात्माकडे जाण्यास प्रवृत्त करतो. शनी हा गहन व गूढ विद्येचा कारक ग्रह आहे.
शनी हा शोक, मंदपणा, आळस, गंभीरता, रुढमार्गी, निष्ठूरपणा, दारिद्र्य, आयुष्यमान, आत्मा, श्वासोस्च्छवास, वृद्धापकाळ, नोकर, मंत्र, तांत्रिक ज्ञान, खोली, दुष्टता, उशीर, नोकरी, जगातील आनंदा पासून स्वातंत्र्य, त्याग, संशय, युक्तिवाद, लोखंड, चामडे, लोखंडी सामान, खनिज, रसायन, कोळसा, गवत, वस्तू, खाण, बांधकाम साहित्य, जमीन, व्यापारी बातमी, राख, काळी धान्ये, खडतर नशीब, रखरखीतपणा, धान्याची शेती, किराणा माल व त्याची साठवणूक ह्या सर्वांचा कारक ग्रह आहे.
जरी अशुभ स्थितीत असलेल्या शनीचा व्यक्तीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असला तरी त्याचा अर्थ असा नाही कि व्यक्तीला जीवनभर सतत कठीण वेळ येत असते. जर शनी हा कुंडलीत स्वराशीस किंवा उच्चीचा असेल तर तो व्यक्तीस आयुष्यात वरिष्ठ पद, संपत्ती सुख, प्रगती व शक्ती प्रदान करतो. जर शनी बलवान असेल तर पनोती मग ती छोटी किंवा मोठी असली तरी व्यक्तीच्या जीवनात एक विशेष असे स्थान मिळवून देतो.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
-----------------------------------------------
-------------------------------------------------
*!! विदर्भ दर्शन !!*
---------------------------------
*शनी मंदिर, टाकरखेड*
---------------------------------
बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात मोताळा-नांदुरा मार्गावरील शनी टाकरखेड येथे आकर्षक शनि मंदिर उभारण्यात आल्याने शनिभक्तांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
शनी अमावस्या ला या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळत असते.
टाकरखेडपासून पूर्वेस दीड किलोमीटर अंतरावर शनि मंदिर आहे. ८ ते १० एकराचा शनि मंदिरचा परिसर विविध फुलझाडांनी सुंदर दिसत आहे. भव्यदिव्य शनिमूर्ती व महालक्ष्मी मूर्ती विशेष आकर्षक ठरत आहे.
राजस्थानी कलाकारांच्या कलाकुसरीतून तेथीलच राजस्थानी कोटय़ातून बनवलेली सुरेख विशाल मंदिरे व महाराजाद्वार पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात व गुलाबांच्या फुलांनी या संपूर्ण परिसराला वेगळे रूप दिले आहे.
ज्यांना शनी दोष आहे, साडेसाती चा त्रास असे लोक शनिवारी येथे येऊन पूजा-अर्चना करतात.
*पुराणामध्ये असे सांगितले आहे की महादेव शंकर यांनी शनी ला वरदान देउन शनी ला नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिले. आणि सांगितले “तू पृथ्वीवर न्यायाधीश आणि दंडाधिकारी राहशील. सामान्य माणूसच नाही तर देवता, असूर, सिद्ध, विद्याधर आणि नाग सुद्धा तुझ्या नावाला घाबरतील.*
येथे येणार्या भाविकांना शनिदेव कधीही निराश करत नाही, त्यांच्या सगळ्या मनोकामना पुर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
----------------------------------------
-------------------------------------- ------------------------------
*शनी यंत्र*
------------------------------
दैवी यंत्राला भारतीय तांत्रिक परंपरांकडून येत असलेली गूढ आकृती म्हणून परिभाषित केले जाते.
एखादे यंत्राचे कार्य म्हणजे गुप्त दैवी ऊर्जा आणि दैवी सामर्थ्याला आवाहीत करणे आणि यंत्र वापरणाऱ्या व्यक्तीचे नशीब सुधारणे हे होय.
यंत्राने नक्कीच आपल्या जीवनात आनंद आणि दैवी अनुग्रह येईल. आपले नशीब बदलण्यासाठी आणि समस्या सोडवण्याकरिता आपण या शक्तिशाली अदभुत साधनांचा वापर करू शकता.
*यंत्र कसे काम करते?*
ज्या यंत्रावर मंत्रोच्चार केले जातात त्या यंत्रामधील ऊर्जा वातावरण अशा प्रकारे पोषक बनविते कि त्या वातावरणामधील लोक प्रभावित होतात.
यंत्र म्हणजे दैवी चिन्हे किंवा कौशल्य, आणि त्यांच्या आधारावर वैज्ञानिक आहेत.
ते सहसा भूमितीय नमुन्यांची निर्मिती करतात, जे आपल्या उद्देशास मदत करणारा सकारात्मक उर्जा क्षेत्र तयार करतात / निर्माण करतात.
---------------
*शनि यंत्र*
---------------
या यंत्राची बेरीज कुठुनही केली तरी ३३ इतकीच येते. हे यंत्र कोणत्याही महिन्यातील शुक्लपक्षात येणार्या पहिल्या शनिवारी सूर्यास्ताच्या एक तास आधी डाळिंबाची काडी किंवा काळ्या घोड्याच्या नालेपासून बनवलेली लेखणी अष्टगंधाच्या शाईत बुडवून भुर्जपत्रावर लिहावे. नंतर त्या यंत्राला धूप, दीप, काळी फुले वाहून
*ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः ।*
या मंत्राचा जप करावा आणि ते यंत्र लोखंडाच्या ताईतामध्ये किंवा काळ्या किंवा निळ्या वस्त्रात घालून धारण करावे.
१२ ७ १४
१३ ११ ९
८ १५ १०
*शनी जयंतीच्या दिवशी घरामध्ये शनि यंत्राची स्थापना करून पूजा करा.*
कायम स्वरुपाच्या फलश्रुतीसाठी हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर बनवून घ्यावे.
त्यानंतर दररोज नियमितपणे या यंत्राची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात.
दररोज या यंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. निळे किंवा काळे फुल अर्पण केल्यास लाभ होईल."
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------- ----------------------------
*शनि शिंगणापूर*
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकर्याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकर्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. असे मानतात की,शनी देवाचे दर्शन झाले की मामाने भाच्याच्या पाया पडायचे म्हणजे अधिक फलदायी ठरते. म्हणून शक्यतो मामा भाच्यानी दर्शनाला जावे.
विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापार्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.
शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाखी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
------------------------------------------------
------------------------------------------------
🙏🌹🤝🦚🛐🐃🛐🦚🤝🌹🙏
Comments
Post a Comment