आज कूर्मजयंती त्या निमित्त हा लेख*कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत.

🙏🌹🤝💥💧💦💧💥🤝🌹🙏
*आज कूर्मजयंती त्या निमित्त हा लेख*

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत.

----------------------------------------
*मंदिराच्या बाहेर कासव*
 *असण्याचे महत्त्व*
----------------------------------------
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. 
 कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

   *कासवाचे गुण*

1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात 

*काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर* 
कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे 

2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे. 

3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

आपणास माहिती आहे का कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते

 त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते,
----------------------------------------

----------------------------------------
*दि. ७ मे २०२०*

----------------------------------
*पुष्टीपती विनायक जयंती'* 
------------------------------------
गणेशाच्या अनेक अवतारांपैकी एक महत्वाचा अवतार म्हणजे 'पुष्टीपती विनायक'.

श्री गणेशाचे विविध अवतार भाविकांना पुराणात पाहायला मिळतात, त्यापैकीच एक म्हणजे ‘श्री पुष्टीपती विनायक’!

 हा अवतार शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी, 'दुर्मति' या राक्षसाच्या वधार्थ अवतरला. या अवतारातील 'पुष्टी' ही भगवान विष्णूंच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेते तर श्री गणेश 'विनायक' या नावाने अवतार घेतात. 

दुर्मती राक्षसाने सृष्टीमध्ये हाहाकार माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांनी मिळून मंगलमूर्ती गजाननाची प्रार्थना केली. माता पार्वतीला दिलेल्या वरदानानुसार त्यांच्या घरी म्हणजेच कैलासावर श्रींनी अवतार घेतला व व दुर्मती राक्षसाचा वध केला. भगवान श्री हरी विष्णू व श्री महालक्ष्मी मातेची कन्या ‘पुष्टी’ हिच्याशी मंगलमूर्तींचा विवाह झाला आणि भगवंत पुष्टीपती झाले.

दुर्मतिने पृथ्वी, पाताळ व स्वर्गलोक जिंकून घेतलेले असताना, त्याचा विध्वंस थोपवण्यासाठी, माता पार्वतीला दिलेल्या वचनानुसार विनायक अवतारातील श्री गणेश त्याचा वध करतात.

*वैशाख शुध्द पौर्णिमेच्या दिवशी अवतार घेतल्याने या दिवशी ‘श्री पुष्टीपती विनायक जयंती’ साजरी केली जाते.*

 *म्हणून वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा 'पुष्टीपती विनायक जयंती' म्हणून साजरा करतात.*

*आज " पुष्टीपती विनायक जयंती " निमित्त पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शहाळे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते*

----------------------------------------

------------------------------------- ----------------------------------------
*सकाळी-सकाळी करू नयेत हे ५ काम,*
----------------------------------------
स्त्री असो किंवा पुरुष, दोघांसाठी सकाळची सुरुवात चांगली असेल तर दिवस सुखात आणि शांततेत पार पडतो. 
यामुळे सकाळी-सकाळी दिवसाची सुरवात खराब होईल असे कोणतेही काम करू नये. जर असे काही घडले तर दिवसभर आपल्या स्वभाव आणि कामावर याचा वाईट प्रभाव राहील. 

*येथे जाणून घ्या, सकाळी-सकाळी कोणकोणते पाच कार्य करू नये...*

*१)उशिरापर्यंत झोपू नये -*
सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. शास्त्रानुसार सकाळी लवकर झोपेतून उठणार्‍या व्यक्तीवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते, तेच आरोग्यासाठीसुद्धा हे वरदान आहे. जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते आळशी बनतात. यामुळे दिवसभर काम करण्यात उत्साह राहत नाही. सकाळी उशिरापर्यंत झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे सकाळी-सकाळी लवकर झोपेतून उठावे.
*२)खोटं बोलू नये -*
ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की, कधीही खोटं बोलू नये, परंतु बहुतांश लोक खोटं बोलतत. कमीतकमी सकाळी-सकाळी तरी खोटं बोलू नये. जर दिवस्ची सुरुवात खोट्या गोष्टीने झाली तर दिवसभर खोटे बोलत राहवे लागते. खोटं बोलणे पाप मानण्यात आले आहे. यापासून दूर रहावे. दिवसाची सुरुवात सत्याचे आचरण करत व्हावी. सत्याचे आचरण म्हणजे नेहमी खरे बोलावे.
*३)क्रोध करू नका -*
क्रोधाला मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आले आहे. या अवस्थेत करण्यात आलेल्या कामामुळे फक्त अडचणींच निर्माण होतात. जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला राग आला तर दिवसभर स्वभात चिडचिड राहते. रागामध्ये व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टींमधील फरक समजू शकत नाही, वाणीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. कधीकधी तोंडातून असे शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी-सकळी थोडा वेळ योग-प्राणायाम करावा.
*४)वाद-विवाद करू नये*
सकाळी झोपेतून उठताच जोडीदारासोबत किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्यासोबत वाद घालू नका. कुटुंबाशी प्रसन्न मनाने भेटा. जर सकाळपासूनच घरात कलहाचे वातावरण असेल तर दिवसभर याचा तणाव शरीर आणि मनावर राहतो. आपण स्वतः दुःखी राहतो आणि कुटुंबातील सदस्यही.
*५)कोणाचाही अपमान करू नका*
सकाळच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांशी आदराने वागावे. विशेषतः आई-वडिलांच्या संदर्भात ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी. कुटुंबात कधी-कधी अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये कोणाचाही अपमान करू नये. कुटुंबात दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन्ही व्यक्तींना खूप त्रास होतो. सकाळी-सकाळी असे घडले तर दिवस खराब जातो.
----------------------------------------

----------------------------------------
 ----------------------------------------
*पूजेसाठी सकाळची वेळच का*
*सर्वश्रेष्ठ असते?*
----------------------------------------
आपण देवाची पुजा कधीही करू शकतो पण उपासणा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते. ब्रह्म मुहूर्तात पुजा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. 
*जाणून घ्या सकाळी पुजा करणे का मानले जाते शुभ...*

*१)धार्मिक महत्व*
ब्रह्म मुहूर्ताला देवतांचा मुहूर्त मानले जाते. सकाळी उठून उपासणा केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. पहाटे सर्योदयाच्यावेळी सर्व दैवी शक्ती जागृत होतात. जसे सुर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते. अगदी तसेच सकाळी सकाळी सर्याची किरणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. दुपारी १२ ते ४ ही वेळ पित्रांच्या पुजेसाठी शूभ मानली जाते.
*२)मानसशासत्रीय महत्व*
देवाची उपासणा करताना आपले शांत ठेवावे. शांत मनाने आपण पुजेत ध्यान देऊ शकतो. एकाग्रताशिवाय केलेली पुजा कधीच यशस्वी होत नाही. सकाळची वेळ पुजा करण्यासाठी श्रेष्ठ असते, कारण झोपेतून जागल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते. डोक्यात कोणतेही विचार नसतात. देवाच्या भक्तिसाठी मन एकाग्र असणे आवश्यक आहे. म्हणून सकाळी पुजा करणे अधिक शुभ मानले जाते.
*३) आरोग्यासाठी फायदेशीर*
सकाळी केलेल्या पुजेने आपल्या एवढे बळ मिळते की, आपण दिवसभर सहज तणावमुक्त राहतो. सकाळी लवकर उठल्याने आपल्या आरोग्याला फायदा होतो. त्वचेची चमक वाढते, पोटासंबंधी आजारापासून आपला बचाव होतो. सकाळी पुजेमध्ये केलेल्या ध्यानामुळे डोके चांगले चालते.
----------------------------------------

----------------------------------------
 ----------------------------------------
*आपण जसा कुटुंबाला वेळ दिला पाहिजे ,* 
*तसा भावंडांनाही  वेळ दिला पाहिजे_,*
----------------------------------------
*स्वतःला प्रश्न विचारून पहा*

☑कोणतेही काम नसताना आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे सहज भेटायला किती वर्षे गेलो नाही 
मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही
खाऊच्या एका घासासाठी पाठीत धपाटा मारणारी मोठी बहीण 
चिमटा काढून पळून जाणारी धाकटी बहीण 
आपण बाहेरून आलो तर काहीतरी आणले असेल म्हणून खिशाकडे, हाताकडे पाहणारा धाकटा भाऊ 
आजही तसेच आहेत
फक्त आपला 
*भाव आणि स्वभाव बदलला*

वय कितीही होऊ द्यात
☑थोरल्याने अधिकार गाजवलाच पाहिजे 
☑आणि धाकट्याने हट्ट केलाच पाहिजे . 
☑आपण जेथे असू तेथे आपली भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे . हे शक्य आहे त्यासाठी
वर्षातून किमान एकवेळ पूर्ण एक दिवस सर्व भावंडांनी एकमेकासाठी द्या .
 त्यादिवसी आपले आईवडील आणि आपली भावंडे मिळून एक दिवस एकत्र येऊन , एक दिवसाची सहल आयोजित करा , 
कुवत असेल त्याने सर्व खर्च करा , 
कुवत नसेल तर तो एक दिवस सुट्टी घेऊन फक्त सर्व भावंडे आईवडीलांसोबत रहा आणि अनुभव घेऊन पहा .
हा अनुभव आणि आईवडील व भावंडांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही.

*मी स्वतः हा प्रयोग नुकताच करून पाहिला आम्हा सर्वांना आपले आयुष्य वाढल्याचा भास झाला*. 

आई गेल्यानंतर कितीतरी दिवसांनी वडीलांना एवढे खुष आणि समाधानी होताना पाहिले , 
कितीतरी दिवसांनी सर्वांनी मनमुराद आनंद लुटला . 

*सर्व बाजूने काट्यासारखे टोचणारे जीवन , त्यावर त्या एका दिवसाने अलगद फुलांचा अल्हाददायक वर्षाव केला*. 

कुटुंब व्यवस्थेची किंमत कळाली आणि 
रक्ताच्या नात्याची गाठ नव्याने उमगली 
माझे कोणीतरी आहे 
याची जाणीव झाली आणि 
वडीलांना काय पाहिजे 
हे त्यांनी व्यक्त न करता समजले . 
या गोष्टी पैसे देऊन हिस्सा घेऊन वाटणी करून कोणालाही मिळविता येणार नाहीत . 

*शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही वेगळे राहाणार नाही* 
ही प्रतिज्ञा भावांनी केली आणि प्रत्येक्षात अमलात आणली तर
 *त्यांना जन्म देणाऱ्या आईवडीलांइतके भाग्यवान जगात कोणीही नाही*_. 
हे अवघड आहे , पण
अशक्य मात्र निश्चित नाही , 
हेच रामराज्य आहे आणि
असे घर आजही अयोध्या आहे.
----------------------------------------

----------------------------------------
 🌹🙏🌹
*शास्त्रामध्ये उल्लेख आहे की -*

*वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।*
*ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥*
 
*अर्थ-*
 ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला 
१. सुंदरता, २. लक्ष्मी, ३. बुद्धी,
४. स्वास्थ्य, ५. आयु इ. गोष्टींची प्राप्ती होते. यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते.

----------------------------------------
*कोणत्या वेळेला म्हणतात ब्रह्म मुहूर्त?*
----------------------------------------
उत्तम स्वास्थ्य आणि देव-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर अंथरुणाचा त्याग करावा. ही फार प्राचीन मान्यता आहे.
*ब्रह्मचा अर्थ परम तत्व किंवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ.*
 सामान्यतः रात्रीचा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे ४ ते ५.३० पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्त मानला जातो.

आपली दिनचर्या सकाळी उठताच सुरु होते. यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात. 
*येथे जाणून घ्या, सकाळी लवकर उठल्याने कोणकोणते लाभ प्राप्त होतात.*

*१) निरोगी आरोग्य*
धर्म ग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायुमंडळामध्ये म्हणजे आपल्या  चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो. वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन ४१ टक्के, जवळपास ५५ टक्के नायट्रोजन आणि ४ टक्के कार्बनडाय ऑक्साइड वायू राहतो. सूर्योदयानंतर वायुमंडळामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी तर कार्बनडायऑक्साइडचे वाढते. ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे. शास्त्रामध्ये याला प्राणवायू म्हटले जाते. जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास आपले शरीर स्वस्थ राहते.
*२)यामुळे प्राप्त होते सुख-समृद्धी*
ब्रह्म मुहूर्तावर उठणारा व्यक्ती यशस्वी, सुखी, समृद्ध होतो. कारण लवकर झोपेतून उठल्याने दिवसभरात कोणकोणती कामे करावयाची आहेत, याची मांडणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे जीवन केवळ यशस्वी होत नाही तर शारीरिक आणि मानसिक स्वरुपात स्वस्थ राहणारा व्यक्ती सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. कारण तो जे काम करतो त्यामध्ये त्याची प्रगती होते. विद्यार्थी परीक्षेत यश प्राप्त करतो. जॉब (नोकरी) करणाऱ्या व्यक्तीवर बॉस खुश राहतो. व्यापारी चांगली कमाई करू शकतो. आजारी व्यक्तीचे उत्पन्न तर कमी होते, त्याउलट खर्च वाढू लागतो. यश अशाच व्यक्तीच्या पदरात पडते जे वेळचा सदुपयोग करतात. यामुळे जीवनात स्वस्थ आणि यशस्वी राहण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठावे.
----------------------------------------

---------------------------------------
 *दिनविशेष*
----------------------------------------
*जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ,*
*साहित्यिक अशा रवींद्रनाथ टागोर यांची आज*
*जयंती निमित्त विनम्र अभिवादन.*
----------------------------------------
 रवींद्रनाथांना आपण ओळखतो ते तीन गोष्टींमुळे. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आणि एकमेव भारतीय कवी म्हणून, नवीन शिक्षण पद्धतीचा पुरस्कार आणि अवलंब करणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून आणि आपल्या राष्ट्रगीताचे जनक आणि संगीतकार म्हणून! ‘गीतांजली’ला मिळालेल्या नोबेल पारितोषिकामुळे ते ‘विश्ववंद्य कवी’ ठरले, तर त्यांच्या ‘जन गण मन’ला राष्ट्रगीताचा मान मिळाल्याने ते राष्ट्रकवी झाले.

 सन १८८१ मध्ये ‘वाल्मिकी प्रतिभा’ हे आपले पहिले संगीत नाटक लिहिणा-या रवींद्रनाथांचे बंगाली आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होते. बंगाली साहित्यक्षेत्रात कवी, कादंबरीकार, नाटककार म्हणून त्यांनी भरीव कार्य केले आहे. ‘साधना’, ‘भारती’, ‘वंगदर्शन’ या मासिकांचे संपादन करणा-या रवींद्रनाथांचा स्वातंत्र्य चळवळीशीही निकटचा संबंध होता. ‘शांतिनिकेतन’ व ‘विश्वभारती’ या त्यांनी स्थापन केलेल्या जगप्रसिद्ध संस्था. या शिक्षण संस्थांमुळे भारतीय शिक्षण क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. मानवतेचे पुरस्कर्ते असणा-या रवींद्रनाथांची समग्र साहित्यसंपदा ४० खंडांत पसरली आहे. साहित्यिक, चित्रकार, संगीताचा प्रणेता, प्रतिभावंत कवी, शिक्षणतज्ज्ञ असे हे नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर!

 दि. ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचे निधन झाले.
-------------------------------------------------

---------------------------------------- ---------------------------------
*रवींद्रनाथ टागोर सुविचार*
------------------------------------

१) आपण धोक्यांपासून सुरक्षित राहावे अशी प्रार्थना करू नये. परंतु त्यांना तोंड देत असताना निर्भय होण्यासाठी प्रार्थना करूया.
२) मी झोपलेलो आणि स्वप्न पडले की जीवन आनंदी होते. मी उठलो आणि पाहिले कि जीवन सेवा होती. मी काम केले आणि पहा, सेवा आनंद होता.
३) असे म्हणू नका कि ‘हि सकाळ आहे’ आणि त्यास कालच्या एका नावाने नाकारू नका. नवजात मुलाला जसं नाव नसतं तसं त्याला पहिल्यांदा पहा.
४) एक मन सर्व तर्कशास्त्र हे एक चाकू सर्व पाते यासारखे आहे. ते जे हात वापरते ते रक्तस्राव करते.
५) मी एका आशावादी ची माझी स्वतःची आवृत्ती बनलो आहे. मी एका दरवाजाच्या माध्यमातून ते बनवू शकत नसल्यास, मी दुसर्या दरवाजातून जाईन – किंवा मी एक दार बनवेल. काहीतरी भयानक येईल काही हरकत नाही किती अंधार उपस्थित होतो.
६) तथ्ये बरेच आहेत, परंतु सत्य एक आहे.
७) उभे राहून आणि पाण्याकडे एकटक पाहून आपण केवळ समुद्र ओलांडू शकत नाही.
८) फुलपाखरू महिने मोजत नाही पण क्षण मोजतो, आणि त्याला पुरेसा वेळ आहे.
९) मैत्रीची खोली परिचयाच्या लांबीवर अवलंबून नाही.
१०) तिच्या पाकळ्या तोडून, आपण फुलाचे सौंदर्य गोळा करत नाहीत.
११) प्रेम मालकी हक्क सांगत नाही, पण स्वातंत्र्य देते.
१२) मी स्वत:वर हसण्यासोबत स्वत:चं ओझं हलकं झालय.
१३) प्रेम हे एक असीम गूढ आहे, त्यास ते आणखी स्पष्ट करण्यासारखं काहीही नाही.
१४) वय विचारात घेतात; युवक धाडस करतात.
१५) ऐकणाऱ्या स्वर्गाशी बोलण्याकरता झाडं हे पृथ्वीचे अनंत प्रयत्न आहेत.
१६) प्रत्येक मुल संदेशासह येते कि देव अद्याप मनुष्यामुळे निराश झालेला नाही.
१७) जेव्हा आपण पूर्ण किंमत दिली असते तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होते.
१८) तो जो चांगलं काम करण्यात खूप व्यस्त आहे त्यास चांगलं होण्यासाठी वेळ नाही लागत.
१९) जीवन आपल्याला दिले आहे, आपण ते देऊन कमावतो. 
२०) जेव्हा आपण नम्रतेत महान होतो तेव्हा आपण महानतम जवळ येतो.
२१) ढग माझ्या आयुष्यात तरंगत येतात, यापुढे वादळ किंवा पाउस वाहून नेण्यासाठी नाही, पण माझ्या सुर्यास्त आकाशात रंग जोडण्यासाठी.मृत्यू प्रकाशास विझवत नाहीये; तो फक्त दिव्याच्या बाहेर काढतोय कारण पहाट आली आहे.
२२) जर धर्म, एक आध्यात्मिक आदर्शाचे प्रकटीकरणच्या ऐवजी ग्रंथ आणि बाह्य संस्कारांना प्राधान्य देते, मग काय हे शांतीस इतर कशापेक्षाही अधिक अडथळा आणतो?
२३) पानाच्या टोकावर असलेल्या दवासारखे आपल्या जीवनाला वेळेच्या कडावर हलकेच करू द्या.
२४) सौंदर्य म्हणजे सत्याची स्मित जेव्हा ती स्वत:चा चेहरा एका परिपूर्ण आरशात पाहते.
२५) विश्वास हा पक्षी आहे जो काळोखी पहाट असतानांही प्रकाश अनुभवतो.
२६) जेव्हा आपल्याला जग आवडते तेव्हा आपण जगात राहतो.
२७) आपल्या स्वत: च्या शिक्षणापर्यंत एखाद्या मुलास मर्यादित करू नका, कारण तो एका वेगळ्या वेळी जन्मला होता.
२८) सर्व काही आपल्याकडे येते जे आपल्या संबंधित आहे जर आपण ती प्राप्त करण्याची क्षमता तयार केली तर.
२९) फुल जे एकटं आहे त्याला असंख्य असण्याऱ्या काट्यांचा मत्सर करण्याची गरज नसते.
३०) सर्वोच्च शिक्षण असे आहे जे केवळ आपल्याला माहिती देत नाही परंतु आपल्या जीवनास सर्व अस्तित्त्वाशी सुसंवादी बनवते.
३१) जर आपण सर्व त्रुटींचे दरवाजे बंद केले तर, सत्य बंद होईल.
३२) जमिनीच्या बंधनातून मुक्ती झाडासाठी मुक्तता नाही.
कला मध्ये, मनुष्य स्वत: ला प्रगट करतो त्याच्या वस्तूंना नव्हे.
३३) मंदिरातील गंभीर उदासापासून मुले धुळीत बसण्यासाठी बाहेर धावतात, देव त्यांना खेळतांना पाहतो आणि पुजारी विसरतो.
३४) प्रेम केवळ आवेगच नाही, त्यात सत्य असणे आवश्यक आहे, जो कायदा आहे.
संगीत दोन आत्म्यांच्या दरम्यान असीम भरते.
३५) कला काय आहे? हि वास्तविकतेच्या पुकारण्याला मनुष्याच्या सर्जनशील आत्म्याचा प्रतिसाद आहे.
३६) पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना  अज्ञातवासात जावे लागेल.
-------------------------------------------------

------------------------------------------------
🙏🌹🤝💥💧💦💧💥🤝🌹🙏

Comments