जागतिक मातृदिन
🙏🌹🤝💥👩🏻🦱👩🦰👩💥🤝🌹🙏
*दिनविशेष*
*मदर्स डे*
-------------------------------
*जागतिक मातृदिन*
--------------------------------
आईचा सन्मान करण्यासाठी 'मातृदिन' साजरा केला जातो. हा दिवस जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो. सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा मदर्स डे साजरा केला जातो. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मदर्स डेच्या दिवशी मुले आपल्या आईला भेटवस्तू देतात.
*भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.*
यंदा १० मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
*" स्वामी तिन्ही जगाचा*
*आई वीना भिकारी "*
या उक्तितच आईचा महिमा किती अगाध आहे हे समजते
*मातृ दिनाचा इतिहास*
मे महिन्याचा दुसरा रविवार हा पाश्चिमात्य देशात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.
मातृ दिनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. १६ व्या शतकापासून इंग्लडमध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशूची आई मदर मेरीचा सन्मान करत असे.
अमेरिकेचे राष्ट्रपती वूडरो विल्सन यांनी १९१४ मध्ये मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून अमेरिकेत मातृ दिन साजरा केला जात आहे. अमेरिकेत साजरा करणारा मदर्स डे हल्ली सर्वत्र साजरा केला जात आहे.
*मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाचा हा दिवस.* मात्र,आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा आहे का?
भारतीय संस्कृतीत आई ही संकल्पनाच अशी आहे की, तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकताच ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे की, ती आपण मोजमाप करता येत नाही.
भारतीय संस्कृतीत आईला ईश्वराचे रूप मानले आहे. कोणतेही कार्य करण्याच्या आधी सर्वप्रथम आईचा आशीर्वाद घेतला जातो.
आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे.तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षिता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय आई होय. रडणारे बाळ आईकडे दिले की लगेच शांत होते.
बाळाला हाताला धरून चालायला शिकवणारी आईच जन्म घेणार्या प्रत्येकाची पहिली गुरू असते.
तीच मुलांना लहानाचे मोठे करून त्यांच्यावर संस्कार करते. मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत अललेलं एक नातं म्हणजे आई.
एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही;
मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत असलेलं एक नातं म्हणजे आई.
आई सकाळी उठल्यापासून आपल्या पिलांसाठी राबत असते. एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही;
आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं.
*माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.*
आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही, हे माहीत असूनही आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात मातृ दिन साजरा केला जातो
------------------------------------------------
------------------------------------------------
🙏🌹🤝💥👩🏻🦱👩🦰👩💥🤝🌹🙏
🤝🦚🕉️☯️🛐🦚🤝🌹🙏
-------------------------------------
*जागतिक मातृदिनाच्या*
*निमित्ताने*
---------------------------------------
*माझा प्रथम गुरू*
*माझी आई*
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते.
*असे म्हटल्या जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवनहे खर्या अर्थाने जीवनच नाही.*
सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक सक्षात देवता आहे. "आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई.
इतक्यात कुठेतरी ऐकण्यात आले कि.....
आणि खरंही आहे ते अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणारा तो एक्टा काय पाहणार?
यावर उपाय म्हणून त्याने सर्वप्रथम आई बनविली असे वाटते, यात त्याचादेखिल स्वार्थ असावा, कारण ब्रम्हांडातून एक व्यक्ती पृथ्वीवर पाठवायला त्याला फारसे कष्टही पडत नाही अणि त्याच्या जबाबदार्याही झटकल्या जाऊ शकतात. याशिवाय त्याच्या मुख्य स्वार्थ म्हणजे व्यक्ती एक भूमिका अनेक याचाही साकार होतो.
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. अगदी आईपासून ते आईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.
तुमच्या आमच्या जीवनात आईच्या सहवासात राहताना कधी आईच रहस्य आपण जाणूनच घेतले नाही. खरच तिच्याकडे एकदा शांतचित्ताने डोकावून पाहाल तर तिच्या स्मित हास्यात नक्कीच ईश्वराची प्रतीमा तुम्हाला दिसेल. हा माझा ठाम विश्र्वास आहे.
आईच्या सहृदयतेबाबातची कथा सर्वानाच ठाऊक आहे,
ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते.
*पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही.*
म्हणूनच म्हटल्या जाते की आईसारखी आईच....!
-----------------------------------------------
----------------------------------------
-------------------
*मातृभक्ती*
-----------------------
सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले.
आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे.
त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे.
त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही.
जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका !
हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे.
*त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.*
-----------------------------------------------
-----------------------------------------------
🙏🌹🤝🦚🕉️☯️🛐🦚🤝🙏🙏
Comments
Post a Comment