चंचल चित्त स्थिर करणारे दत्तात्रेय स्तोत्र.
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*चंचल चित्त स्थिर करणारे दत्तात्रेय स्तोत्र.*
*संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.*
*श्री दत्तस्तवस्तोत्र ।*
*अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते ।*
*सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।*
*शरणागतदीनार्थतारकाsखिलकारक ।*
*सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।*
*सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज ।*
*सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।*
*स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।*
*भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।*
*सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।*
*योsभिष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।*
*य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः ।*
*स्थिरचितः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ।।*
*।। इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् ।।*
*विवरण.*
*कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवायचे तर आपले मन एकाग्र व शांत असणे अत्यंत गरजेचे आहे. मनात येणारे नानाविध विचार नियंत्रणात आणणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अनावश्यक विचार मनात येऊच नयेत असे वाटते. त्यासाठी काही प्रयत्न करावा तर तेच विचार पुन्हा पुन्हा मनावर दुप्पट जोराने आक्रमण करतात. मग मात्र साधकाची दयनीय अवस्था होते. आपण प्रयत्न जरूर करतो, परंतु मानवी प्रयत्नांना देखील मर्यादा आहेतच. शेवटी मन आनंदी आणी शांत व्हायला दैवी कृपा देखील असायला लागते. दैवी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प.प.स्वामी महाराजांनी साधकांना हा स्तोत्ररूपी उपाय दिला आहे. ब्रम्हा, विष्णू आणी महेश या विश्वाची उत्पत्ती (निर्मिती), स्थिती (संरक्षण) आणी लय सांभाळणाऱ्या त्रिदेवतांचे एकरूप असलेल्या प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचीच या आर्त स्तोत्रातून प्रार्थना केली आहे. "हे भगवान दत्तात्रेया, माझे अत्यंत चंचल असणारे चित्त स्थिर करावे" अशी ही प्रार्थना आहे. साधकांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये ह्या प्रार्थनेचा अवश्य समावेश करावा व स्वामी महाराजांनी रचलेल्या ह्या अदभूत रचनेचा आनंद घ्यावा व आपले आयुष्य सुखी करावे.*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
Comments
Post a Comment