श्रीसमर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर : अनुग्रह व उपासना
"श्री राम समर्थ'
!!!श्रीसमर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रसन्न !!!
:परमार्थ साधन, सद्गुरू व अनुग्रह:
अनुग्रह व उपासना
श्री महाराजांचा अनुग्रह घेण्याच्या पद्धती सबंधी तपशीलवार माहिती गोंदवले येथे मिळेल.अनुग्रह घेताना श्री सद्गुरू प्रत्येक्ष स्वतः आपल्याला मंत्रोपदेश करीत आहेत अशी दृढ भावना धरावी.अनुग्रह घेतल्या नंतर नित्यनेम म्हणून दोन गोष्टी कराव्यात;एक सद्गुरुंच्या प्रतिमेचे रोज यथाशक्ती षोडशोपचार किव्हा पंचोपचार पूजा करावी,निदान तुळशीपत्र वाहावे;आणि दुसरे ,आपल्या संकल्पनुसार किमान एक माळ (शक्य तर तीन ,सहा ,किव्हा तेरा माळा),दिक्षा मंत्राचा जप करावा.
स्नान झाल्यानन्तर या दोन गोष्टी केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये.याखेरीज इतर वेळी माळेवर किव्हा माळशिवाय जमेल तेव्हा व शक्य तितका जास्तीत जास्त जप करावा.आसनावर जमेल तर चांगलेच पण त्या साठी अडून बसण्याचे कारण नाही .शरीराला अवास्तव ताण न पडेल अशी कोणतीही अवस्था चालेल .नामस्मरण मनापासून अखंड पणे व्हावे हे ध्येय ठेवावे.श्वासोश्वास असतो तो पर्यंत नाम सुटू नये.नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकण्याचा सराव करावा .नामाचे सतत अनुसंधान राखण्याचा अभ्यास करावा.नामाचे सतत अनुसंधान राखण्याचा अभ्यास करावा.माळे वर जप करताना मंत्राचा एकदा उच्चार झाला की एक मणी आपल्याकडे ओढावा, मात्र अंगठ्यालगतचे बोट मनी ओढण्यास वापरू नये;उजव्या हाताचा अंगठा ,मधले बोट आणि त्या पलीकडचे बोट (अनामिका)एवढ्यांचा उपयोग करावा.करंगळी आधार म्हणून वापरण्यास हरकत नाही.मणी ओढीत मेरू मण्यापर्यंत आल्यावर मेरू मणी ओलांडू नये,शेवटचा मणी हा पहिला समजून पुनःसुरुवात करावी.त्यासाठी माळ फिरवून उलटून घ्यावी.मंत्र वैखरीने म्हणजे ओठ व जीभ यांच्या हालचालीने व प्रकट उच्चार करून किव्हा प्रकट उच्चार न करता जपावा;अथवा पूर्णपणे मनातल्या मनात जपावा.नामस्मरण सर्व थैव निष्काम,अहेतुक असावे;म्हणजे,नाम घेऊन दुसरे अमुक काही मिळवायचं आहे असा समज वा हेतू नसावा.नामासाठीच नाम घ्यावे."मी नाम घेतो "याचा सुद्धा साधकाला अहंकार होऊ शकतो.आणि अहंकार केव्हाही घातकच;म्हणून नाम मी घेत आहे अशी कर्तेपणाची भावना न ठेवता ,श्री सद्गुरुच ते मजकडून करून घेत आहेत,अशी कृतिज्ञेची,अनन्य शरणागतीची भावना ठेवावी ;किंबहुना सद्गुरुच माझ्या हृदयात राहून नामस्मरण करीत आहेत व मी ते साक्षीत्वाने ऐकतो आहे "राम हमारा जप करे ,हम बैठे आराम "अशी धारणा धरून नाम घ्यावे.सद्गुरू ,राम व नाम तिन्ही एकरूपच आहेत ,एकच आहेत ,अशी निःसंशय श्रद्धा राखावी.
रोज श्यक्यतो ठराविक स्थळी व ठराविक वेळेवर (सकाळी,किव्हा झोपण्यापूर्वी किव्हा अन्य सोयीस्कर वेळी )श्री सद्गुरूंची मानसपूजा करण्यापासून फार लाभ होतो."श्री सद्गुरू प्रत्येक्ष देहाने व प्रसन्न चित्ताने आपली मानसपूजा घेण्यास आले आहेत अशी कल्पना करून,त्यांची षोडशोपचार वा पंचोपचार पूजा मनानेच करावी.सर्व उपचार अत्यंत उत्कृष्ट कल्पावेत व प्रेमादराने मन्नपूर्वक अर्पण करावेत.शेवटी,त्यांना आपली सर्व सुख दुःखे निवेदन करून प्रार्थना करावी.त्यांचा शेषप्रसाद ग्रहण करावा व ते आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत व आपल्या मस्तकावर त्यांनी आपला वरद हस्त ठेविला आहे,अश्या आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत पूजा संपवावी.
"अनुग्रहित व्यक्तीने वर्षातून निदान एकवार तरी श्री सद्गुरू स्थानाचे दर्शन घेण्याचा प्रघात ठेवावा!"
:श्री राम जय राम जय जय राम:
श्री राम जय राम जय जय राम.. श्री राम.समर्थ.
...
Comments
Post a Comment