going to tours

🧳 *पर्यटनाला जाताय? मग नक्की वाचा!*

 Travel*

📍 रोजची दगदग आणि त्यातून येणारा थकवा यामुळे कोणालाही कंटाळा येणारच! अशातच जर पावसाळी ऋतूने आगमन केलेले असेल तर पर्यटनाचाही आनंद मनसोक्त लुटता येतो. तुमचंही सगळं प्लॅनिंग झालंच असेल कुठे फिरायला जायचं याचं! मग आज जाणून घ्या पर्यटनाला जाताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे:

☔ तुम्ही पावसाळी वातावरणात फिरायला जात आहात म्हणून काही विशेष गोष्टी तुम्हाला सोबत बाळगाव्या लागतील. छत्री, रेनकोट, टिशू पेपर, एक्स्ट्रा कपडे, आणि काही औषधं.कारण प्रवासातील अरबट चरबट खाण्यामुळे तब्येत बिघडू शकते आणि त्यामुळे औषधे बाळगणे कधीही शहाणपणाचे ठरते.

🤷‍♀ ब्रश, एक्स्ट्रा नॅपकिन, सॅनिटायजर, आणि मोबाईल चार्जर \ पॉवर बँक या गोष्टी न विसरता बागेत टाका.

❌ लक्षात ठेवा प्रवासाला निघताना कोणत्याही महागड्या वस्तू, दाग-दागिने सोबत नेऊ नका. अशा वस्तू सोबत घेतल्या तर आपले लक्ष त्याच गोष्टींकडे जाईल आणि तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकणार नाही.

🧐 आपण जिथल्या हॉटेलमध्ये राहणार आहोत त्या हॉटेलची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आजकाल ऑनलाइन बुकिंग करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना नियम व अटी सविस्तर वाचून घ्या त्यात काही शंका असल्यास वेळीच त्याच्या हेल्पलाइनला फोन करून शंकांचे निरसन करून घ्या.

🤔 प्रवासादरम्यान झोप घेताना सावध रहा. आपल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे नीट लक्षात ठेवा.

✅ प्रवासाचे तपशील आपल्या सोबत असलेल्यांना समजावून ठेवणे आवश्यक आहे आणि त्याच बरोबर आपल्या सोबत नसलेल्या जवळच्या लोकांना देखील आपल्या प्रवासाचे तपशील देऊन ठेवा.

💰 पैसे बाळगणे आजकाल गरजेचे राहिलेले नाही. जेव्हा तुम्हाला गरज नसेल तेव्हा पैसे रोख रकमी बाळगणे टाळा. कॅशलेस व्यवहार करणे जास्त सोयीस्कर असते.

👗 तुम्ही ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असाल तेच कपडे प्रवासात घाला. त्यामुळे प्रवासात होणारी दगदग सुसह्य होईल.

📌 या साध्या गोष्टी वाटत असल्या तरी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रवासाला निघताना नक्की या गोष्टींची काळजी घ्या.

🎯 

Comments