जेवणाचे ताट

*जेवणाचे ताट कसे वाढावे..!!*
     सुरुवात झाली ती मिठापासून. मीठ कुठे वाढायचे आणि किती वाढायचे?
*भारतीय संस्कृतीतील रीतिरिवाजांना शास्त्रीय आधार आहे परंतु काळाच्या प्रवाहात शास्त्राचा विसर पडत गेला*.
     *सणासुदीला वाढलेले ताट म्हणजे एक सुंदर कलाकृतीच असते एक सुंदर रांगोळी!*
    तर ताट वाढण्याचे नियम ठरवण्यामागचा विचार तरी काय होता जरा बघू या!
 *सर्वप्रथम तर ताटाचे दोन भाग करण्यात आले डावीकडचा व उजवीकडचा.*
आपल्याकडे उजवी बाजू महत्वाची व त्यामानाने डावी बाजू कमी महत्वाची असे मानले जाते. त्यानुसार वाढतानाही पदार्थ तसेच वाढले जातात.
*डावीकडे प्रथम मीठ. ते पण चिमूटभर. जर कशात कमी झाले* *असेल तर अन्नपूर्णेला न दुखवता टाकतां यावे यासाठी. मग लिंबू. ती पण १/८ फोड.* *चव यावी यासाठी आणि कशात मीठ जास्त झाले तर त्यात लिंबू पिळले की* *खारटपणा कमी करण्यासाठी.*
*खारट व आंबट पदार्थ शरीराला* *आवश्यक तर असतात पण अति खाल्ल्यास त्रासदायक ठरतात म्हणून प्रमाण थोडेच.* *यामुळे हाडे, केस व दात यांवर वाईट परिणाम होतो.*
नंतर नंबर लागतो कोरडी व ओली चटणी. ती पण छोट्या चमच्यानेच वाढली जाते. *चटणी व मीठामध्ये लिंबाची फोड असल्याने मीठ चटण्यांमध्ये जाऊ शकत नाही.*
मग तोंडाला पाणी येईल असे लोणचे १ चमचा, चव वाढवणारे व भाजी नावडती असल्यास तिची जागा घेणारे. पण तेपण थोडेच खायचे हं! बाजू विसरू नका. डाव्या बाजूचे पदार्थ कमी खायचे असतात. मग येते कोशिंबीर . हिचा वाढायचा चमचा लोणचे आणि चटणीपेक्षा मोठा असतो. कारण ती त्यांच्यापेक्षा जास्त खायची असते.
आता उजवी बाजू.
प्रथम फळभाजी मोठ्या वाढणीने नंतर पातळभाजी डाव किंवा पळीने. यावर नेहमीचा वाद हाच क्रम का? तर पातळभाजी प्रवाही असते ती फळभाजीत मिसळू नये म्हणून थोडे अंतर ठेवून खाली वाढली जाते. तसेच बरेचदा वरण व पातळभाजी वाढताना पसरट डाव घेतला जातो. आपल्याकडे वेगवेगळ्या आकाराचे खोलगट, पसरट असे डाव , पळ्या, झारे अशी स्वयंपाकाची आयुधे असतात ती करमणुकीसाठी नव्हे तर काम सुलभरित्या व्हावे म्हणून.
*डावी बाजू व उजवी बाजू याच्यामधील वरच्या बाजूस वाट्या ठेवल्या जातात त्यात कढी, वरण, गोड पदार्थ वाढला जातो.*
उरली मधली जागा. ती भात व पोळीसाठी राखीव असते. पोळी पदर आवरून बसलेल्या स्त्रीसारखी घडी करून वाढली जाते जेणेकरुन ती बाकी पदार्थांमध्ये भिजून ओली होऊ नये. भातावर थोडेसे वरण वाढून त्यांवर लोणकढे तूपाची धार असते. आता धार पडण्यासाठी म्हणून तर तूपाचा डाव वेगळा असतो ना! काहीजण तूप चहाच्या पसरट चमच्याने वाढतात. समजून घ्यावे तूप कमीआहे किंवा वाढण्याची इच्छा नाही.
असे हे ताट वाढले जाते. काही वेळा यात कडधान्यांच्या उसळीही असतात. घट्ट किंवा पातळ यानुसार ताटात किंवा वाटीत किंवा पसरट डिशमध्ये वाढल्या जातात.
आता प्रश्न असा की *उजवीकडील पदार्थ कमी पण प्रमाण जास्त व डावीकडील पदार्थ संख्येत जास्त पण प्रमाणात कमी* असे का?
तर *डावीकडील पदार्थ हे उजव्या बाजूच्या पदार्थांना पूरक असतात. शरीराला त्यांची आवश्यकता असते पण ते कमी प्रमाणातच हवे* असतात मात्र *उजवीकडील जास्त प्रमाणात खाणे अपेक्षित असतात म्हणून जास्त प्रमाणात वाढतात. खाताना उजवीकडचे पदार्थ खाणे सोपे जाते कारण हात cross होत नाही पण *डावीकडचे खाताना हात cross होतो त्यामुळे ते आपसूकच कमी खाल्ले जातात.*
कोणी लोणचे चटणी जास्त खात असेल तर लगेच दटावले जाते अरे ते लोणचे आहे भाजी नाही!
*प्रमाणाचे म्हणाल तर उजव्या बाजूचे पदार्थाचे खाण्याचे प्रमाण हे डाव्या बाजूच्या सर्व पदार्थांच्या प्रमाणाएवढे असावे.*
माझी आजी(आईची काकी) पान नीट वाढलं नाही तर ते परतपरत वाढायला लावे...चूक होता कामा नये असा तिचा कटाक्ष असे.
आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीत शास्त्रीय आधार घेऊन आखणी केली आहे...
ती परंपरा म्हणून पाळण्यापेक्षा विज्ञाननिष्ठ दृष्टी म्हणून आचरणात आणावी..सध्या इतकच....  

Comments