डकवर्थ लुइस नियम
💁♂ *जाणून घ्या हे ‘डकवर्थ-लुइस’ बद्दल सर्व काही!*
Special*
विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि पुन्हा ‘डकवर्थ-लुइस’ प्रणाली बद्दलची चर्चा सुरु झाली आहे. नेमका हा नियम काय आहे? याचे जनक कोण? याबद्दल आज जाणून घेऊयात...
फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन गणितज्ञांनी क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास आकडेमोडीसंदर्भात काय तडजोड करता येईल? यासंदर्भात काढलेला गणितीय तोडगा म्हणजे डकवर्थ-लुईस प्रणाली होय.
1997 साली झिम्बाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. तेव्हापासून आयसीसीने ही प्रणाली वनडे आणि टी-20 सामन्यांदरम्यान पाऊस झाल्यास वापरण्यास सुरुवात केली.
🧐 *‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ केव्हा वापरली जाते?* : जेव्हा क्रिकेट सामन्यादरम्यान पाऊस येतो. अशावेळी नियोजित वेळेत खेळ पूर्ण करण्याच्या उद्देशाने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी विशिष्ट षटकांमध्ये धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठेवले जाते. यावेळी त्यांनी नक्की किती धावा कराव्यात यासाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली वापरली जाते.
🤔 *डवर्थ-लुईस-स्टर्न प्रणालीचे जनक* :
▪ स्टीफन स्टर्न हे क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ म्हणून काम करायचे.
▪ ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्यांना क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या अभ्यासाला सुरुवात केली.
▪ त्यानंतर स्टर्न यांनी 2014 मध्ये डकवर्थ-लुईस पद्धतीची आकडेमोड अधिक सुरळीत व्हावी यासाठी काही बदल सुचवले.
▪ स्टर्न यांनी केलेल्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून डकवर्थ-लुईस पद्धतीमधील आकडेमोड अधिक सोप्या पद्धतीने करत सुधारित लक्ष्य ठेवण्या संदर्भातील नियम तयार केले.
▪ अखेर त्यांनी 2014 साली या प्रणालीमधील बदल आयसीसीला सुचवले. त्या बदलांना आयसीसीने मान्यता दिली.
▪ स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन 2015 च्या विश्वचषकापासून ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.
🎯🏏🏏🌦

Comments
Post a Comment