केसांच्यासाठी कढीपत्ता

🌿 *केसांसाठी आरोग्यदायी कढीपत्ता*

 Health*

दह्याची कढी, विविध प्रकारची चटणी, तसेच इतर भारतीय पदार्थांमध्ये आवर्जून वापरण्यात येणार्‍या कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म चकीत करणारेच आहेत. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी 1, बी 3, बी 9 आणि सी असतात.

याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळते. गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. कढीपत्त्यात अशी सर्व पोषकतत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. त्याबाबत जाणून घेऊयात...

1) *कढीपत्त्याचा चहा* : कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची समस्याही दूर होईल.

2) *केसांसाठी मास्क* : कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे दही घालून केसांना लावा. आता केस 20-25 मिनिटे तसेच ठेवा, नंतर शॅम्पूने केस धुवा. असे नेहमी केल्याने केस काळे आणि घनदाट होतात.

3) *कढीपत्त्याचे तेल* : कढीपत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांची पावडर तयार करून घ्यावी. आता 200 मिमी खोबरेल तेलात जवळपास 4 ते 5 चमचे कढीपत्त्याची पावडर मिक्स करून उकळून घ्यावी.

चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावे. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावे. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावे. जर तेल थोडे कोमट करून लावले तर अधिक फायदेशीर ठरते. दुसर्‍या दिवशी केस धुवावेत.

🎯 

Comments