विठ्ठल मंदिर -पंढरपुर
-------------------------------
*विठ्ठल मंदिर, पंढरपूर*
-----------------------------
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.
इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा ' लहान माडू ' ( देऊळ) उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषत: बाराव्या शतकात सापडलेल्या ' ८४ वा लेख ' हा शीलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर ८४ वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात. यामुळे हा शीलालेख झिजल्याने त्यास आता तारेचं कुंपण बसवलं आहे.
गाभारा , अंतराळ आणि सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या १६ खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरूडस्तंभ म्हणून प्रसिद्ध आहे.
स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीणोर्द्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे १६ , १७ आणि १८ व्या शतकातलं बांधकाम असावं , असा जाणकारांचा अंदाज आहे. असं असलं तरीही मूळ मंदिराचे १२ व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा , व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळंही आहेत.
*“अवघे गरजे पंढरपुर . . .*
*अवघे गरजे पंढरपुर . . .*
चालला नामाचा गजर” आणि “माझे माहेर पंढरी . . .
आहे भिवरेच्या तिरी”
हे अभंग ऐकले नाहीत असा मराठी माणुस सापडणं तसं कठीण!
महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत पंढरपुरी वसले असुन या विठोबा रूख्माईच्या दर्शनाकरता महाराष्ट्रातुन आणि कर्नाटकातुन भाविक मोठया संख्येने पंढरपुरी दाखल होतात आषाढी वारीत गर्दी होते ती महाराष्ट्रातील भाविकांची!
आणि कार्तिकी एकादशीला कर्नाटकातील भाविक पंढरीत दाखल होतात! असा हा विठुराया दोन राज्यांनी आपापसात जणु वाटुन घेतलाय . . . . .
“आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधुजन येती
चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती
दिंडया पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा . . .
व्दारकेचा महिमा वर्णावा किती”
पंढरी . . . पंढरपुर . . . पंडरिकपुर . . . पौंड्रीकपूर . . .पंडरिगे . . . पंडरगे अशी कितीतरी नांवं या पंढरपुर ला पुर्वी दिल्या गेली आहेत.
पुर्वीच्या म्हणजे मुळ मंदिरातील १२ व्या शतकातले अवशेष आजदेखील या ठिकाणी आपल्याला दिसुन येतात. त्यावरून मंदिर फार पुरातन असल्याची खात्री पटते.
या मंदिराला एकुण ८ प्रवेशव्दार आहेत. पुर्व दिशेला असलेल्या प्रवेशव्दाराला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे.
वारकऱ्यांचे तिर्थस्थान अशी या पांडुरंगाची आणि पंढरपुरची ओळख आहे. आषाढी वारीचा अनुपम सोहळा पाहाण्याकरता आणि अनुभवण्याकरता लाखोंच्या संख्येने भाविक या पंढरपुरात दाखल होतात.
संपुर्ण जगात ही वारी अश्याप्रकारे फक्त आणि फक्त भाविक या पंढरपुरच्या विठ्ठलाकरताच पायी पायी करतात.
म्हणुन केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातुन देखील विदेशी पर्यटक हा सोहळा पाहाण्याकरता महाराष्ट्रात त्या काळात दाखल होतात आणि या पांडुरंगाप्रती भाविकांची भक्ती पाहुन आश्चर्य व्यक्त करतात.
*धार्मिक महत्व*
चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक या महिन्यांमधे चार एकादशींना येथे यात्रा भरते त्यात आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत जवळपास १५ ते २० लाख भाविक या पंढरीत दाखल होतात.
येथील क्षेत्रमहात्म्य असल्याने पंढरपुर ला दक्षीण काशी देखील संबोधतात व विठ्ठलाला कुलदैवत मानल्या जाते.
चंद्रभागा नदी –
चंद्रभागेतीरी मुर्ती सावळी साजिरी . . . .
पांडुरंगाच्या मंदिराजवळुन खाली उतरल्यानंतर चंद्रभागेचे वाळवंट आणि नदिकाठ आपल्या नजरेस पडतो.
संत जनाबाईंनी आपल्या अभंगात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा उल्लेख केलेला आपल्याला सापडतो
मुळ भीमा नावाची असलेली ही नदी पंढरपुरला येतांना मात्र चंद्रभागा होते . . .
पंढरपुरात या नदिचा आकार चंद्राच्या कोरीप्रमाणे असल्याने या ठिकाणी तीला चंद्रभागा असे नाव पडले असावे.
*पंढरपुर कोठे आहे?*
पंढरपुर सोलापुर जिल्हयात असुन सोलापुर पासुन साधारण ५०.५५ कि.मी. अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासुन साडे चारशे मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण भीमा नदीच्या उजव्या तिरावर आहे.
*पंढरपुर ला कसे जाल? –*
पंढरपुर रेल्वे, बस सेवा, खाजगी वाहने यांने चांगल्या रितीने जोडले गेले असल्याने येण्या जाण्याची काहीही अडचण नाही. शिवाय सोलापुर मोठे जंक्शन असुन सर्वदुर रेल्वेचे जाळे पसरले आहे.
जवळचे विमानतळ पुणे असुन साधारण 250 कि.मी. अंतरावर आहे.
------------------------------------------------

Comments
Post a Comment