पावसाळ्यातील प्रवास

🌧 *पावसाळी पिकनिकमध्ये या 5 चुका टाळा*

। Travel*

💁‍♂ सर्वाना हवाहवासा वाटणारा ऋतू म्हणजेच पावसाळा सुरु झाला आहे. फॅमिली तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या चुका नक्की टाळा.

*1.* *हवामानाचा अंदाज न घेणं* : पावसाळ्यात फिरायला जाण्याआधी हवामानाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा उत्साहाच्या भरात तुम्ही अशा ठिकांणांना भेट देतो, ज्या ठिकाणची माहिती तुम्हाला नसते. बहुतांश ठिकाणी डोंगरांचे खोदकाम, मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आदी गोष्टी घडतात.

*2.* *सेल्फी घेण्याचा मोह न आवरणं* : आजकाल सेल्फीचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येकाला सगळीकडे सेल्फी घेण्याचा मोह होतो. मात्र पावसाळी पिकनिकमध्ये अनेक जण डोंगरकड्यांवर, धबधब्यांमध्ये सेल्फी घेतात. मात्र पाण्याचा अथवा हवामानाचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल जाण्याचा अथवा पाण्यात वाहत जाण्याचा धोका निर्माण होतो.

*3.* *भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणं* : पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राला उधाळ आलेलं असतं. यावेळी लाटांचा अंदाज घेणं शक्य नसतं. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरण्याचा कितीही मोह झाला तरी भरतीच्या वेळी समुद्रकिनारी मुळीच जाऊ नका.

*4.* *मेडीकल किट सोबत न ठेवणं* : पावसाळ्यात एखाद्या डोंगरमाथ्यावर अथवा जंगलात फिरण्याचा बेत आखला तर मेडीकल किट सोबत ठेवा. कारण पावसाळ्यात अशा ठिकाणच्या पाऊलवाटा निसरड्या आणि गवतामुळे पाय सटकून पडण्याचा धोका वाढतो. यासाठी मेडिकल किट तुम्ही सोबत बाळगा.

*5.* *मद्यपान करणं धोकादायक* : अनेकजण पावसाळी पिकनिक दरम्यान मद्यपान करतात. डोंगरमाथ्यावर मद्यपान केल्यामुळे तोल जाणे, पोहण्याची क्षमता कमी होणे अशा गोष्टींमुळे जीव गमावतात. यामुळे पिकनिकला जाताना मद्यपान तसेच व्यसन टाळावे.

🎯 

Comments