goggles

🤓 *चेहरेपट्टीनुसार सनग्लासेस निवड करा!*

 Lifestyle*

चेहरेपट्टी वेगळी आणि निवडलेले सनग्लासेस वेगळे असे अनेकांचं होतं. यामुळेच सनग्लासेस घेताना काय काळजी घ्यावी? कोणत्या चेहऱ्यांना कोणत्या प्रकारचे सनग्लासेस चांगल्या दिसतात? याबद्दलची माहिती जाणून घेऊयात...

1) आपली लाईफ स्टाईल, आपण वापरत असलेले आउटफिट्स या सगळ्याचा विचार करून तुमच्या आवडीनुसार साधे किंवा ब्रॅण्डेड सनग्लासेस खरेदी करायला हवे.

2) स्वस्तात मिळत आहे म्हणून रस्त्यावरून गॉगल खरेदी करताना त्याची शेड, ग्लास तपासून बघितली पाहिजे. वाईट दर्जाच्या गॉगलमुळे दृष्टीला हानी पोहोचू शकते.

3) आपल्या गरजेनुसार गॉगलची शेड निवडावी. उन्हाळ्यासाठी सनग्लासेसची निवड करताना शक्यतो ब्राउन, ब्लॅक, वाइन अशा डार्क शेड्स निवडाव्यात.

4) अंडाकृती चेहरेपट्टी असणाऱ्यांनी ब्रॉड, ओव्हर साइज फ्रेम्स वापराव्यात. त्यांना वाइड फ्रेम्स असलेले गॉगल सूट होतात.

5) राउंड चेहरेपट्टी असणाऱ्यांनी स्क्वेअर शेप, चेहऱ्याला सूट होईल एवढीच राउंड किंवा सेमी राऊंड शेप ग्लासेस वापरायला हरकत नाही.

6) लक्षात घ्या, ब्लॅक शेड प्रत्येकालाच सूट होते असे नाही. त्यामुळे कधी-कधी ब्लाइंड लुक येऊ शकतो.

उत्साहाच्या भरात आपल्याला आवडला म्हणून आपण गॉगल खरेदी करून मोकळे होतो. पण कधी-कधी तो आपल्या चेहऱ्याला सूट होतोच असे नाही. त्यामुळे शक्यतो सनग्लासेस लावून बघितल्याशिवाय खरेदी करू नका.

🎯 

Comments