योजना

🤰🏻 *गरोदर मातांना शासकीय योजनांचे कवच*

 Government Scheme*

नवी पिढी सुदृढ असावी म्हणून आरोग्य विभागाने गरोदर मातांवर लक्ष केंद्रित करून अंगणवाडीताईवर जबाबदारी सोपविली आहे. गर्भवतींना विशेष आहार, लसीकरण आणि वजनाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या बाळंतपणात मातांना पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. काय आहेत या योजना जाणून घेऊ:

🎯 *भाग्यश्री योजनेमधून ५० हजार*

एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना माझी कन्या भाग्यश्री योजनेतून महिला बालकल्याण विभागामार्फत ५० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया पालकांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जाणार आहे. हा निधी मुलींच्या नावाने भविष्यासाठी गुंतविला जाणार आहे.

💫 *मातृत्व वंदन योजनेतून सहा कोटी*

केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेतून गरोदर मातांना पहिल्या बाळंतपणासाठी पाच हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यातील २० हजार गरोदर मातांना आतापर्यंत सहा कोटी रूपयांचा निधी आरोग्य विभागाने तीन हप्त्यात वितरित केला आहे. यासोबत अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी जननी सुरक्षा योजनेतून ७०० रूपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. याकरिता गरोदर मातांना अंगणवाडीत नोंदणी करणे आवश्यक आहे.

💊 *लसीकरण, कॅल्शिअमच्या गोळ्या, आहारात कडधान्य*

गरोदर मातांना अंगणवाडीमधून तीन महिन्यांपासून ते बाळंतपणापर्यंत आणि बाळ जन्माला आल्यानंतर सहा महिन्यापर्यंत सकस आहार पुरविला जाणार आहे. याकरिता अंगणवाडी केंद्रांना गहू, मसूर, मूगडाळ, चवळी, मटकी, मूग, हळद, मीठ, मिरची आणि तेलाचे वितरण करण्यात येणार आहे. यासोबत टी.टी. लस आणि कॅल्शिअम गोळ्या देणे, तसेच बाळाचे लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

🎯 

Comments