चहर्यावरील डाग

💆‍♀ *चेहऱ्यावर डाग आहेत? मग 'हे' करा!*

* Tips & Tricks*

अनेक लोक बटाटा खाणं टाळतात. कारण त्यांचा असा समज असतो की, बटाटा खाल्याने वजन आणि शुगर दोन्ही वाढते. परंतु असं अजिबात नाही. बटाट्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो.

बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे फेसपॅक कसे तयार करावे याबाबत सांगणार आहोत...

जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल आणि काळपटपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक ट्राय करा. बटाटा आणि लिंबू यामध्ये अशी तत्व असतात जी त्वचेची रोमछिद्र खुली करून त्यातील घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करते, ज्यामुळे ऑईली स्किनची समस्या दूर होते. तसेच मुलतानी मातीमधील मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठीही मदत करतात.

💁‍♂ *असा तयार करा फेस पॅक* :

▪ एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून बारिक करून घ्या.
▪ त्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती आणि एक लिंबू पिळून घ्या.
▪ तयार पॅक व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा.
▪ एक तासापर्यंत ठेवा आणि त्यानंतर हाताने मसाज करून थंड पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून टाका.

🎯 

Comments