संधीवात
💁♀ *संधी वात: काय खावे, काय खाऊ नये?*
* Health*
सामान्यत: संधिवात म्हटला जातो तो सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे.
👀 *काय खाऊ नये?*
सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. त्यामुळे सुपारीचे व्यसन असणाऱ्यांनी संधिवात असल्यास व्यसन सोडणे आवश्यक आहे. काही स्त्रिया भाजकी माती खातात. ही माती भाजकी असली तरी संधिवात वाढवते. मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. विशेष करून डबाबंद पदार्थ वज्र्य करावेत. वेफर्स, आकर्षक पाकिटातील कुरकुरीत पदार्थ यांच्यासह डब्यातील द्रव पदार्थ, शीतपेय, ‘रेडी टू इट’ तयार पिठे, तयार भाज्या यांचे सेवन संधिवाताची लक्षणे वाढवताना दिसून येतात. फळांमध्ये जांभळासारखी फळे, तसेच ताडगोळे संधिवात वाढवतात. रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाटय़ाचे, मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवतात.
👍 *काय खावे?*
संधिवातामध्ये सगळ्या पालेभाज्या तशा त्रासदायक आहेत, परंतु लसून आणि आले, कोथिंबीर किंवा लसणाची पात घालून केलेली भाजी (मेथी, पालक सोडून) सेवन करायला हरकत नाही. संधिवातामध्ये फळभाज्या अधिक फायदेशीर आहेत. त्यात शेवगा, सुरण,पडवळ (चणे किंवा तूर डाळ यात नसावी) तांदुळका, लालमाठ, वांगी या भाज्या खाव्यात. यात शेंगदाण्याऐवजी तीळ कूट वापरावे. लसूण आणि खोबरं जास्त घातल्यास चांगला फायदा होतो. खुरासणीची भाजी, चटणी, सरसू हे संधिवातात आरोग्यदायी आहे. पुनर्नवा या वनस्पतीची भाजी, केळफूल उत्तम कार्य करते. बीट, गाजर, जुना कांदा, ओव्याची पाने, ओवा यांपैकी एखादा पदार्थ रोजच्या आहारात घ्यावा. संधिवातात तांदूळ खावा हा गैरसमज आहे. तांदळाने वात वाढतो.
🎯

Comments
Post a Comment