Forests in India

🧐 *जाणून घ्या भारतातील जंगलाविषयी*

 Education*

भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे. भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून हि बाब समोर आली आहे.

भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.

📍 *जंगलाचे प्रमाण व राज्ये असे* :

1. *आकारमानानुसार सर्वाधिक जंगल* : भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

2. *क्षेत्रफळानुसार मोठे राज्य* : क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

3. *सर्वात कमी जंगल असलेले राज्य* : हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

👍 *भारतातील प्रमुख जिवारण्ये* :

1. निलगिरी : तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळून
2. नंदादेवी : उत्तराखंड
3. मानस : आसाम
4. सुंदरबन : पश्चिम बंगाल
5. मन्यार खाडी : तामीळनाडू
6. पंचमढी : मध्यप्रदेश
7. कच्छ : गुजरात
8. ग्रेट निकोबार : अंदमान व निकोबर

🎯 

Comments