पावसाळ्यातील केसाची काळजी

🧐 *पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची काळजी घेताना!*

* Health*

पावसाळा ऋतू सुरु झालाय. या काळामध्ये झालेल्या हवामान बदलाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. खासकरुन केस आणि त्वचेसंबंधित समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे? हे पाहुयात...

*1.* *जास्तीच पाणी प्या* : पावसाळ्यामध्ये अनेक वेळा वातावरणातील बदलाचा परिणाम त्वचेवर होत असतो. अशात शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण मुबलक असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि चेहऱ्यावर विशेष ग्लो येतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

*2*. *मेकअप टाळा* : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात. ही बंद झाल्यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुटकळ्या येता. त्यातच जर मेकअप केला असेल तर त्वचेरील रोमछिद्रे बंद होतात.

परिणामी त्वचेला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. यामुळे अनेक वेळा त्वचेसंदर्भातील आजार उद्भवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये कमीत कमी किंवा शक्यतो मेकअप करणे टाळावे.

*3.* *तेलकट पदार्थ नकोच* : पावसाळ्यात विशेषतः तेलकट-तुपकट खाण्याचा मोह टाळला पाहिजे. शरीरामध्ये स्निग्धतेचे प्रमाण वाढले तर अनेक वेळा स्थूलतेसारख्या समस्या निर्माण होतात. त्यासोबतच तेलयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. त्यामुळे ते टाळाच.

*4.* *केसांची काळजी* : पावसाळ्यात अनेकदा डोक्यात खाज येणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यापासून सुटका करायची असेल तर केस शक्यतो कोरडे ठेवावेत. त्यासोबतच केसांना केवळ नारळाचेच तेल वापरा.

Comments