आज मी दत्तगुरु पाहिले.
*!! श्री गुरुदेव दत्त!!*
माझे पुण्य फळा आले..
आज मी दत्तगुरु पाहिले !! धृ !!
शंख चक्र करि विराजित ते ..
पद्म कमंडलू हाती शोभते ..
भस्माकीत तनु गोजिरवाणी..
यातीवेशे सजले !! १ !!
गळा माळ ती हाती झोळी ..
मुखकमलाची दिव्य झळाळी..!
स्वर्गसुखाची भेट आज ही..
धन्य जीवन झाले !! २ !!
दिनांचा गुरुराज दयाळु..
भक्तासाठी होत कृपाळू..!
जटाधारी परब्रम्ह सावळे..
पाहुनी मन धाले!! ३ !!
माझे पुण्य फळा आले..
आज मी दत्तगुरु पाहिले..
Comments
Post a Comment