!!श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दुसरा !!

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दुसरा !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

"हे त्रैमुर्ती दत्तात्रेया, तूच माझा गुरु आहेस. तू कृष्णानदीच्या तीरावर वास्तव्य करतोस. तेथे तुझे भक्त नांदत असतात. ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते. " असे श्रीगुरुंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला स्वप्न पडले. त्या स्वप्नात जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पितांबर नेसलेले श्रीगुरू दिसले. त्यांने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडेतिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला. काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले. त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला. तो त्या योग्याला म्हणाला, " हे कृपासागर, तुझा जयजयकार असो ! आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कोठून आला आहात ? आपले नाव काय ? आपण कोठे राहता ? "

नामधारकाने असे विचारले असता, ते सिद्धयोगी म्हणाले, "मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे. माझे गुरु श्रीनृसिंहसरस्वती भीमा-अमरजा नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापुर येथे असतात. ते त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत .त्यांच्या भक्तांना दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो, त्यांचे घर धन,धान्यांनी, गोधनादी अष्टैश्वर्याने भरलेले असते ." सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला, "मी सुद्धा त्या श्रीगुरुंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती-उपसना परंपरेने चालत आली आहे. असे असताना माझ्याच नशिबी हि कष्टदशा का बरे ? माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात. तुम्हीच माझे तारक आहत. आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा. " नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "अरे, श्रीगुरू भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान-मोठ्यांवर सारखीच असते. ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दु:ख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. सर्व देवदेवता त्याला वश होतत. अशा श्रीगुरुची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिनदु:खी आहोत असे सांगतोस. याचा अर्थ हाच कि, तुझी त्यांच्यावर दृढभक्ती नाही, श्रद्धा नाही, म्हणूनच तुला नानाप्रकारची दु:खे भोगावी लागत आहेत. श्रीगुरुदत्तात्रेय ब्रम्ह-विष्णू-महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात, म्हणून तू त्यांच्यावर द्रुढश्रद्धा ठेव. आणखी के लक्षात ठेव, जर हरीहारांचा कोप झाला तर श्रीगुरू आपल्या भक्तांचे रक्षण करतात, पण श्रीगुरूच जर कोपले तर हरीहरसुद्धा रक्षण करू शकत नाही."

सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले. मग तो हात जोडून म्हणाला," स्वामी, आपण सांगता त्या विषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्री गुरुदत्तात्रेय हे ब्रम्ह-विष्णू-महेश स्वरूप आहेत. ते त्रिमुर्ती आहेत. ते त्रिमुर्ती अवतार आहेत हे कसे काय ? आपण असेही सांगितले की , हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरूच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही. हे कसे काय ? हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे ? कृपा करून माझी हि शंका दूर करा." सिद्ध म्हणाले, "नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद-रचनेच्या साक्षीने देतो, ते लक्षपूर्वक ऐक. ब्रम्हदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण शलॆ. त्या अठरा पुराणांत 'ब्रह्मवैवर्त' नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापारयुगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नित व्यवस्था केली. त्या व्यासंने ऋषीमुनींना जी कातः सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्रचित्ताने श्रावण कर. ब्र्म्हदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सविस्तर सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला ,"गुरुदेव, तुम्ही मला भेटलात . ब्रम्हदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले ? ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते सविस्तर सांगा. "

नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्ध्योग्यांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले," ऐक तर. जेव्हा प्रलयझाला तेव्हा आदिमुर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरुपात वात्पात्रावर पहुडले होते. त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली.

जागृत झालेल्या त्यांने आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. त्या कमळातून ब्रम्हदेव प्रकट शले. तय्न्ने चारी दिशांना पहिले ते चतुर्मुख शले. ते स्वत:शीच म्हणले," मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही. " त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले. ते गंभीर स्वरात म्हणाले. "मी महाविष्णू आहे. तू माझी भक्ती कर."

हे ऐकताच ब्रम्हदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णुंनी ब्रम्हदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली. त्यावर ब्रम्हदेव म्हणाले, " हे महाप्रभू, मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही. मग मी काय करू ?" विष्णुंनी त्यांना चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले.

भगवान विष्णुंनी अशी आज्ञा केली असता, ब्रम्ह्देवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम्विश्व निर्माण केले. त्यांत स्वेदज (घामातून उत्पन्न होणारे ),अंडज (अंड्यातून उत्पन्न होणारे ), जारज (वार्यातून उत्पन्न होणारे ) व उद्भिज (उगवणारे वृक्ष ) अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली. भवन विष्णूंच्या आदेशानुसार ब्रम्हदेवाने त्रैलोक्याची रचना केली. मग त्यांने सनकादिक मानसपुत्र, मरीची इत्यदी सप्तर्षी, देव आणि दैत्य उत्पन्न केले.

मग ब्रम्ह्देवांनी कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली. हि चार युगे ब्रम्हदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतत. ब्रम्ह्देवांनी सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठविले. कृतयुग म्हणजे सत्ययुग. त्याची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक. ते सत्ययुग सत्यवचनी, वैराग्यसंपन्न, ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते. त्याने शुभ्रवस्त्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत, गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येउन लोकांना सत्वगुणी, सत्प्रवृत्त केले. त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला.

सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रम्ह्देवांनी त्याला परत बोलविले. मग त्यांने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले. त्याची लक्षणे सांगतो ती ऐक, त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होत. त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती. त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत. त्याने कर्ममार्गाची स्थापना केलॆ. वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते. टायने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले.

मग ब्रम्ह्देवांनी द्वापारयुगाला पृथ्वीवर पाठविले. त्याच्या हातात खट्वांग व धनुष्यबाण हि शस्त्रे होतॆ. ते उग्र, शांत, निष्ठुर व दयावान होते. त्या युगात पाप-पुण्यासमान होते, असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रम्हदेवांकडे परत गेले. द्वापारयुग परत आल्यावर ब्रम्ह्देवांनी कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. ते कलियुग अविचारी होते. पिशाचाप्रमाणे मुख असलेले ते नग्न्स्वरुपात ब्रम्हदेवांसमोर प्रकट शले. कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिश्न म्हणजे लिंग धरले होते. ते रडत, हसत, शिव्या देत, नाचत-नाचता ब्राम्हदेवापुढे तोंड खाली घालून उभे रहिले. त्याला पाहताच ब्रम्हदेवांना हसू आले,"त्य लिंग आणि जीभ का धरली आहेस ?" असे विचारले असता कलियुग म्हणाले, " मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी, रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही." ब्रम्ह्देवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले, मला पृथ्वीवर पाठवत आहात, पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणांस माहित आहे का ? मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन. मी स्वच्छंदी आहे. मी लोकांच्यात निद्र आणि कलह माजवीन. परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखे आहेत. ढोंगी संन्यासी कपटकारस्थान करून आपले पोट भरणारे, माझे प्राणसखे आहेत. परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू, वैरी होत." कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रम्हदेव म्हणाले, "पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते, त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत. त्यांना मृत्यू नवता, त्यामुळे त्यानं पृथ्वीवर प्रदीर्घकाळ कष्ट सोसावे लागत असत. पण आता तसे नहि. तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य, फार तर शंभर वर्षे आयुष्य असेल. त्याच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल. त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थप्राप्ती करून घेतील. जे लोक ब्रम्हज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस." ब्रम्ह्देवांनी असे सांगितले असता कलियुग म्हणाले, "आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत . असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ? मला त्यांची भीती वाटते. त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही. भरतखंडात पुण्या खूप आहे. अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मर्तॆल. मग मी तिकडे कसा जाऊ? " ब्रम्हदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस. तू भूलोकावर गेलास कि सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील. एखादाच मनुष्य पुण्यशील असेल, त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही, त्याला तू साहाय्य कर. बाकी सगळेच तुला वश होतील. " कलियुग म्हणाले, "मी दृष्ट स्वभावाचा आहे. मग मी धर्मशील, पुण्यशील मनुष्यांना साहाय्य कसे करणार ?"

ब्रम्हदेव म्हणाले," जे लोक देहाने व मानाने पवित्र असतील, जे निर्लोभी असतील, जे हरिहरांची सेवा करणारे असतील, जे सदैव आपल्या गुरुंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या, ब्राम्हण, गायत्री व कपिलाधेनु यांची सेवा करणाऱ्या, सदैब तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस. आपल्या गुरुंची सेवा करणारे, अभेद भक्ती करणारे, नित्य पुरण श्रावण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस. हि माझी आज्ञा आहे."

कलियुगाने ब्रम्हदेवांना विचारले "गुरु, या शब्दाचा अर्थ कात ? त्याचे स्वरूप कसे असते ? गुरुचे महात्म्य कोणते ?" ब्रम्हदेव म्हणाले " 'ग् +उ व र् + उ मिळून 'गुरु' शब्द होतो. यातील गकार म्हणजे 'ग् ' हे अक्षर गणेशवाचक आहे, 'उ' हा विष्णूवाचक व 'र' हे अग्निवाचक आहे. दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे. शिव शंकर कोपला तर गुरु रक्षण करील, पण गुरु कोपला तर शिव्सुद्धा रक्षण करू शकणार नाही. गुरु हाच ब्रम्ह-विष्णू-महेश आहे. गुरु हाच साक्षात परब्रम्ह आहे. म्हणून सदैव गुरूची-सद्गुरूची सेवा करवॆ. वैष्णवजन 'गुरुभक्ती अखंड राहो !' अशी प्रार्थना कर्त. गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केल्याने तीर्थे, तपे, योग, ताप इत्यादी धर्म कळतात. त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचारधर्म, वर्णाश्रमधर्म, ज्ञान, भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरूचीच सेवा करवॆ. त्याचेच भजन-पूजन करवे. गुरूच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे."

अशाप्रकारे ब्रह्मदेवांनी गुरुमाहात्म्य सांगितले असता कलीने विचारले, "गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय ? याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे."

ब्रम्हदेव कलीला म्हणाले, "तुला सगळे काही सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने श्रवण कर.गुरुशिवाय तरणोपाय नाही . शास्त्रश्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रावण केले तरच ज्ञानप्राप्ती होते. गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिस्वरुप आहे. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐक. " असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला.

खूप वर्षापुर्वीची कथा. गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होत. त्या आश्रमात पैलऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रादींचा अभ्यास करीत असत. त्यांत संदीपक नावाचा एक शिष्य होता. तो मोठा विद्वान होता. त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती. तो आपल्या गुरुंची अगदी मनापासून सेवा करीत असे.

एकदा वेदधर्म आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवितात. त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले ते शिष्यांना म्हणाले, "तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका." शिष्य म्हणाले, "गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेद्प्रमाण. आपण काय ते सांगा."

वेदधर्म म्हणाले, "पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले. त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे. अद्याप थोडे शिल्लक आहे. ते भोगल्याशिवाय संपणार नहि. त्यासाठी कशीक्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरविले आहे. ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे. त्यावेळी तुमाच्यापैकी कोण माझ्याबरोबर येउन माझी सेवा करील ते सांगा. तुमच्यापैकी एकजण जरी माझ्याबरोबर येउन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होइन."

वेदधर्माचे हे शब्द ऐकताच सर्व एकमेकांकडे पाहू लगले. त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला, "गुरुदेव. जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावं लागणार. आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही. भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे. "

मी आपली सेवा करण्यास तयार आहे. मी आपणास काशीला घेऊन जतो." संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेद्धार्मांना खूप बरे वाटले. ते म्हणाले, " अरे बाळ संदीपका, जर नित विचार कर. अरे, भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन. अंगहीन होइन. मी पांगळा होइन. अंध होइन. तुला माझा एकवीस वर्षे सांभाळ करावा लागेल. तुझी तयारी आहे का ? "

संदीपक म्हणाला,"गुरुदेव, मी तयार आहे. तुम्ही माझे काशीविश्वनाथच आहात." मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला. तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते रहिले.तेथे मनकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता. असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता. त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले. त्यांची दृष्टी गेली. सगळे अवयव विद्रूप दिसू लागले. त्यांना धड चालताही येईना. पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे. तो त्यांचे कपडे धूत असे. त्यांना स्नान घालीत असे. त्यांचा बिछाना घालीत असे. पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदिपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते.

संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत, चिडत, सारखी कसली तरी तक्रार करीत असत; पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही. गुरुसेवा हेच त्यचे जीव झाले होते. संदीपक भिक्षा मागून आणीत असे; पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत; पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत; पण संदीपक कधीही कष्टी होत नसे. गुरुंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे.

संदीपकच्या या गुरुसेवेची कीर्ती देवानन समजली. हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पाहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले. संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न शले. ते संदिपकाला म्हणाले,मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग." परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते. तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, "गुरुदेव, भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत, तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का ? "

वेदधर्म रागावून म्हणाले "मुळीच नको. माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस." संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला ,"मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको. माझ्या गुरुंनाही नको."

आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले. त्यांने सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला. काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरुशिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले. संदिपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले, "बाळा, या पृथ्वीवर तुझ्याइतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पहिला नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तू काहीतरी वर मागच." तेव्हा संदीपक म्हणाला, "परमेश्वर, मला काहीही नको. तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत. माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान, ऐश्वर्ये आहेत. प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही. म्हणून मला काहीही नको. आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या. कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो " प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले, "खरे आहे. जो कोणी माता-पिता व गुरु यांची सेवा करतो तो एकार्थाने आमचीच भक्ती करतो. आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे. तीच तुझ्या ठिकाणी दृढ होईल असा मी तुला वर देतो." असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले.

मग वेदधर्मांनी संदिपकाला विचारले, "काय रे, विष्णुंनी काय दिले ?" तेव्हा संदीपक म्हणाला, "मी विष्णूकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला !" संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले, "संदीपका, धन्य आहे तुझी ! तू काशीत चिरकाल निवास करशील. जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्वप्रकारच्या वैभवाने संपन्न होतील. तुला माझे आशीर्वाद आहेत." असे ते म्हणाले, तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या. त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले. त्यांना दृष्टी आली. त्यांनी संदिपकला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, "बाळा , मी तुझी परीक्षा पहिली. अरे, जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही. एकवीस वर्षे तू माझी सेवा केलीस, तुला सर्व विद्या प्राप्त होतील. " सूत म्हणाले , "ब्रम्हदेवाने कलियुगाला गुरुमाहात्म्य सांगताना ही कथा सांगितली. संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पुर्नश्रद्धेने, भक्तीभावाने सेवा केली तर भगवान शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'कलियुग वर्णन - गुरुमाहात्म्य ' नावाचा अध्याय दुसरा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments