श्रीपरशुरामांची जयंती

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱



*‼आज वैशाख शुद्ध तृतीया‼* 

*🔱भगवान महाविष्णूंचे सहावे अवतार - भगवान श्रीपरशुरामांची जयंती🔱*

        *त्याकाळातील निर्दय व प्रजाहिताचा विचार न करणा-या, सत्तेमुळे माजलेल्या, अनाचारी अशा क्षत्रियांच्या विनाशासाठी हा अवतार झाला होता. साक्षात् शिवावतार जमदग्नी ऋषी व जगदंबा रेणुकामातेच्या पोटी भगवंतांनी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी अवतार धारण केला.*
 
*श्रीदत्तप्रभूंचे शिष्योत्तम कार्तवीर्य सहस्रार्जुन यांनी देवांकडे वर मागितला होता की, माझा मृत्यू तुमच्या सारख्याच कोणा महान वीराकरवीच व्हावा. पुढे जेव्हा त्यांचा मृत्यू समय जवळ आला तेव्हा त्यांना जमदग्नी ऋषींची कामधेनू बळजबरीने नेण्याची दुर्बुद्धी झाली. त्याचे फळ म्हणून भगवान परशुरामांनी त्यांचा वध केला. पण कार्तवीर्यांच्या मुलांना हे सहन झाले नाही व त्यांनी परशुराम आश्रमात नसताना जमदग्नींची हत्या केली. यावर भगवान परशुरामांनी आपल्या जन्माचे जे कार्य होते, ते स्मरून संपूर्ण पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली.*
 
*याठिकाणी लोक खूप मोठी गल्लत करतात. परशुरामांनी हे अयोग्य केले, संपूर्ण पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले तर मग पुढे निर्माण कसे झाले, वगैरे अनभ्यस्त प्रश्न निर्माण करतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे की, भगवान श्रीपरशुराम हे साक्षात् भगवंतांचे अवतार होते, ते कधीच चुकीचे वागणार नाहीत. त्यांनी केवळ जे अनाचारी व दुष्ट राजे होते, त्यांचाच वध केला. तोही सलग २१ वेळा. त्यांनी चांगल्या वागणा-या राजांना मारलेले नाही.*

*पुढे मारलेल्या राजांच्या रक्ताचे पाच डोह भरल्यावर तेथे त्यांनी आपल्या वडलांचे क्रियाकर्म केले व त्या रक्ताने तर्पण केले. रेणुकामाता सती गेल्या. हा सगळा भाग माहूर येथे घडला. तेथे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच त्या क्रियाकर्माचे पौरोहित्य केले होते. नंतर श्रीदत्तप्रभूंनी परशुरामांना रेणुकामातेचे दर्शन करविले व जमदग्नी-रेणुका हे साक्षात् शिव-पार्वती असल्याची जाणीव करवून दिली. त्यावेळी जमिनीतून रेणुकामातेचे मुख बाहेर आले, ज्याची आजही माहूर येथे पूजा केली जाते.*

*भगवान परशुरामांनी नंतर मोठा यज्ञ करून हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले व महर्षी कश्यपांना सर्व पृथ्वीचे दान दिले. आता राहायचे कोठे? या विचाराने त्यांनी पश्चिम सागराला काही जागा मागितली, तीच आजची कोकण भूमी होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा सर्व भाग भगवान परशुरामांनी वसवलेला असून त्यांनीच तेथील जनतेला शिक्षण दिले, ज्ञानी केले. परशुराम हे धनुर्विद्येचे महान आचार्य मानले जातात. त्यांनी पुढे भीष्माचार्य, कर्ण आदी महावीरांना धनुर्विद्या शिकवली. ते आजही कोकण प्रांतात वास्तव्य करून आहेत. चिपळूण जवळील परशुराम क्षेत्री त्यांचे मोठे स्थान आहे. ते चिरंजीव अवतार आहेत. भगवान परशुरामांना स्वत: भगवान श्रीशिवांनी धनुर्विद्या शिकवली होती. भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्यांना श्रीविद्येचा उपदेश केला. त्यांच्या त्या संवादाचा " त्रिपुरा रहस्य " हा ग्रंथ आजही उपलब्ध आहे.*

*अधर्माचा संपूर्ण नि:पात करणा-या, परम तेजस्वी व वेदवेदांगे तसेच धनुर्विद्येचे महान आचार्य असणाऱ्या.*

*भगवान श्रीपरशुरामांच्या श्रीचरणीं, सादर साष्टांग दंडवत प्रणाम*
 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments