श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेरावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेरावा श्रीगुरूंचे कारंजानगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन म्हणाला, "गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसारसागर तारक आहात. तुम्ही दाखविलेल्या ज्ञानप्रकाशाप्रमाने शांत, स्थिर झाले आहे. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले श्रीगुरुचरीत्रामृत सेवन करूनही माझी श्रवणतृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नातही ताकसुद्धा पहिले नाही पहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्थ होईल तशी माझी अवस्था झाली आहे.महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. आपण मला ऐकण्याची माझी इच्छा आहे. श्रीनृसिंहसरस्वतींंविषयी मला आणखी विस्तार सांगा. गुरुदेव नृसिंहसरस्वती प्रयागक्षेत्री असताना त्यांनी माधवसरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले.पण पुढे ते सांगण्याची कृपा करा."

नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला.त्यांनी नृसिंहसरस्वतींचे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले,"श्रीनृसिंहसरस्वतींनी प्रयागक्षेत्री माधव-सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ ते तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेकजण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव-सरस्वतींसह सात जणांना संन्यासदीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला.हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते. बाळसरस्वती, कृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्ध असे सात शिष्य होते. तय शिष्यांना बरोबर घेऊन श्रीनृसिंहसरस्वती दक्षिणयात्रेला निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी महणजे कारंजास आले. ते आपल्या आई-वडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. श्रीनृसिंहसरस्वती म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रेयच अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती.लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली.त्यांच्या आई-वडिलांनाही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. आईला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेली प्रदोषपूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, "मी गतजन्मी 'परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा' अशी मी श्रीपाद्श्रीवल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोषव्रत करण्यास सांगितले व 'तुझी इच्छा पूर्ण होईल' असा आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपादश्रीवल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला होता."

माधव व अंबा यांनी श्रीनृसिंहसरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली."तू आमचा उद्धार कर." त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्रीनृसिंहसरस्वती म्हणाले, "पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या बेचाळीस कुळांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रम्ह्लोकाची प्राप्ती होते.त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रम्ह्लोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रम्ह्लोकाची प्राप्ती होते.म्हणूनच मी संन्यास घेतला.तुम्हालासुद्धा ब्रम्ह्पदाची प्राप्ती होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील.तुम्हाला पुत्रपौत्र पहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशीक्षेत्री देह ठेवाल.काशीक्षेत्र मुक्तिस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका." माधव आणि अंबा यांना 'रत्नाई' नावाची कन्या होती. ती श्रीस्वामी नृसिंहसरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसारसागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्रीगुरूनृसिंह-सरस्वती म्हणाले,"स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी. त्यासाठी संसारत्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्रपुराणांनी हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर."

श्रीगुरुंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, "गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्यभूत सर्व काही जाणता,म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." रत्नाईने अशी विनवणी केली असता श्रीगुरू म्हणाले, "तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तुझा पती त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल.मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. मग तू दक्षिणेकडे भीमा-अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस कि तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील." रत्नाईला असा उपदेश करून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य फार मोठे आहे. पुराणांत ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक." असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदामाहात्म्य सांगू लागले.

"भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्याकाळी गौतमऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करीत असत.एकदा त्या सर्वांनी विचार केला.भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल. तयमुले सर्व लोकांचे कल्याण होईल; पण ती गंगा कोण आणू शकेल ? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतमऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत. महातपस्वी आहेत.त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत." असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय मिर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने तय काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप, ते गौतामांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, "तुम्ही गंगानदीला पृथ्वीवर आणा.तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणा नाही." गौतमऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर 'हवा असेल तो वर माग' असे म्हणाले.तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, "भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप क्षालनासाठी या त्र्यंबकक्षेत्री प्रकट कर." शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकक्षेत्री अवतीर्ण केली.गौतामांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात.गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो असे या नदीचे थोर माहात्म्य आहे.

माधवारण्य स्तवन करीत म्हणाले. "अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रैमूर्तींचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता.पण आपण खरोखर परमपुरुष जगत्ज्योती आहात.आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरणदर्शन झाले.मी खरोखरच कृतार्थ, धन्य झालो.माधवारण्यांनी केलेल्या स्तवनाने श्रीगुरू प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, "तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रम्ह्लोकाची प्राप्ती होईल.तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस, तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घडेल याबद्दल जराही शंका धरू नकोस."

माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्रीगुरूगंगातीरावरील वासरब्रम्हेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगास्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राम्हण नदीवर येउन गडबडा लोळू लागला.पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता.त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता.त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत.आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे.तो कधीतरी महिना-पंधरा दिवसांनी भोजन करीत असे.आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते.वेदना असह्य होत होत्या.त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, "आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन, असे म्हणतात.पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणे नकोच, आता मेलेले बरे." असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, "मी भूमीला भार झालो.

मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही. कुणालाही अन्नदान केले नाही. या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे मी फळ भोगतो आहे. मी ब्राम्हणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला. गोहत्या केली. कुणाचा तरी विश्वासघात केला.पुंज अर्धवट केली. गुरुंची निंदा केली. आई-वडिलांची अवज्ञा केली, म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राम्हणांचा अपमान केला असेल. दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल.कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल. आई-वडिलांचा त्याग केला असेल. या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे." अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्म्हत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला.

श्रीगुरुंनी त्या ब्राम्हणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राम्हणाला बोलावून घेतले. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस ? मला सगळे काही सांग ." त्या ब्राम्हणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकताच श्रीगुरू म्हणाले, "तू कसलीही चिंता करून नकोस. तुझे दुखणे गेलेच समज. मझ्याजवळ तय्च्यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही.कसलीही शंका धरू नकोस.घाबरू नकोस." हे ऐकताच त्या ब्राम्हणाला अगदी हायसे वाटले. याचवेळी तेथे एक ब्राम्हण आला. तो ग्रामाधिकारी होता. ती श्रीगुरुला वंदन करून म्हणाला,"आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो." श्रीगुरुंनी त्याची विचारपूस केली, तेव्हा तो म्हणाला, "मी कौंडिण्यगोत्री, आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण असून माझे नाव 'सायंदेव' आहे.मी कडगंची गावाचा रहिवासी असून पोटासाठी सेवाचाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करीत असून एक वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मांजन्मतरीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसारसागर तरुन जातो.गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो; परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात." सायंदेवाचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "सायंदेवा, 'हा ब्राम्हण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे.तो आत्महत्या करण्यास निघाला होता,पण मी त्याला थांबविले आहे.त्यल खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे' त्यावर सायंदेव म्हणाला, "महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रम्हहत्येचे पाप मला लागेल." श्रीगुरू म्हणाले, "तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस.मी सांगितले तसे कर.ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल."

सायंदेव म्हणाले, "स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे." श्रीगुरुंनी ते आनंदाने मान्य केले. मग सायंदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राम्हणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, त्याचवेळी आम्हीही तेथेच होतो.श्रीगुरू भिक्षेसाठी म्हणून निघाले.ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायंदेवाच्या घरी गेले.सायं देवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला.त्यांनी श्रीगुरुंचे स्वागत करून त्यांची यथासांग षोडोपचारे पूजा केली.त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी सायंदेवांना आशीर्वाद दिला. "तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल.तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील." या वरदानाने सायंदेवास व त्याची पत्नी जारवाई यांना अतिशय आनंद झाला.त्यांनी श्रीगुरुंना, तय्न्च्या सर्व शिष्यांना व त्या पोटदुखी असलेल्या ब्राम्हणाला सुग्रास भोजन दिले.

श्रीगुरुंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राम्हणही पोटभर जेवला आणि श्रीगुरुंच्या कृपाशीर्वादाने त्याचक्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का ? श्रीगुरुदत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहिलच कसे ? श्रीगुरूकृपा झाली असता मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात."

ग्रंथकार सरस्वतीगंगाधर श्रीगुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे. ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्रचित्ताने श्रवण करावे. जे कोणी हे श्रीगुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे त्रिवार सत्य.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरूंचे कारंजानगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण' नावाचा अध्याय तेरावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments