!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसरा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसरा अंबरीष आख्यान !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्ध्योग्यांनी सांगितलेले गुरुमाहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जयजयकार करीत म्हणाला,"अहो सिद्ध्मुनिवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमाहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता ? भोजन कोठे करता ? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो." नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले,"ज्या ज्या ठिकाणी श्रीगुरू राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्रीगुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो." असे सांगून त्यांनी नामधारकाला श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखविला. ते म्हणाले, या श्रीगुरुचरीत्राचे नित्य श्रवण-पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हि कथा श्रवण केली असता धन, धन्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतत. बंधनातून सुटका होते. या ग्रंथांचे श्रवण-पठण करणारा ज्ञानसंपन्न, शतायुषी होतो." सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला,"आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरूच भेटले आहेत. श्रीगुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे. तहानेने व्याकूळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहत. मला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगा."
सिद्ध्योगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले,"आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही, ते श्रीगुरुला बोल लावतात. श्रीगुरू काय देणार? असा विचार करतात, त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात, म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव. श्रीगुरू कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही. ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत. श्रीगुरु मेघदुतासारखे उदार आहेत.मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही. ते सखोल जागीच साचते. दृढभक्ती हि सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी मस्तकी वरद हस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देते; पण श्रीगुरू कल्पनेच्या पलीकडचेही देतात. म्हणून तू निःसंदेह होऊन एकाग्रचित्ताने, परमश्रद्धेने गुरुभक्ती कर." नामधारक म्हणाला,"हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात. कृपासागर आहत. माझे मन आता स्वछ झाले आहे. आता श्रीगुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रैमूर्ती श्रीगुरू मनुष्ययोनीत अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे."
नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले,"वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली. मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, परंतु श्रीगुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही."आम्हाला गुरुचरित्र सांगा" असे कोणीही म्हटले नाही. तूच पहिला मला भेटलास. तूच खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल.तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला हि सद्बुद्धी झाली. आता तू काय-वाचा-मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर. यामुळे तुला चारी मन एकाग्र करून श्रीगुरुचरित्र श्रवण कर, यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्रश्रवणाने धनधान्यादी, संपत्ती, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगात ब्रम्हा-विष्णू-महेश मनुष्य्रुरूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तेच श्रीगुरुदत्तात्रेय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात. आता पुढे ऐक,
प्रथम आदिवस्तु एकाच ब्रम्ह असून प्रपंचात तीन गुणांना (सत्व-रज-तम) अनुसरून तीन मूर्ती झाल्या. त्यात ब्रम्हा हा रजोगुणी. विष्णू सत्वगुणी व महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालन-पोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे तीन गुण अभिन्न आहेत. हि सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य. या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराणकथा आहे तीच मी तुला सांगतो. अंब ऋषींनी (त्यांना अंबरीष असेही म्हणतात.)" द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला. ती कथा ऐक, अंबरीष ऋषींनी द्वादशी व्रत सुरु केले होते. ते नित्य अतिथी-अभ्यान्गाताची पूजा करून सर्वकालं हरीचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्राज्ञा आहे. अंबरीषांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहित होती. त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीषाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे; पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीषांना मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होत. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परीस्थितीत अंबरीषांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नानसंध्यादि करण्यासाठी नदीवर गेले."लौकर परत या" असे अंबरीषांनी त्यानं सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आलॆ. दुर्वासांचा पत्ताच नाही. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीषांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पण वाढून ठेवले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समाजला. अंबरीषांकडे रागाने पाहून म्हणाले,"अरे दुरात्म्या, अतिथीने भोकण करण्या अगोदरच तू भोजन केलेस ? थांब मी तुला शाप देतो." हे शब्द ऐकताच अंबरीष घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भाग्वाब विश्नुनंचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली,"अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलेस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस. या अपराधाबद्दल तुला सर्व योनींत जन्म घ्यावा लागेल." ही शापवाणी ऐकताच अंबरीष दुःखाने रडू लागले. त्याचक्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले,"मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, पण मी त्याचे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन."
दुर्वास हे परमज्ञानी होते, ते ईश्वराचा अवतार होते, क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला. या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरीचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेइल. दृष्ट्दुर्जनांचा नाश करून संतसज्जनांचे रक्षण करील. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले,"हे श्रीहरी, तू पूर्णब्रम्ह, विश्वात्मा आहेस.तू परोपकारासाठी शाल भोगताना विविध स्तःनी, विविध वेळी, विविध योनींत असे दहा अवतार घे." भगवान विष्णुंनी ते मान्य केले.
त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य, कूर्म, वरहादि दहा अवतार घेतले. हे अवतार कार्यकारणापरत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात.फक्त ज्ञानी लोकांना हे समजते. हि कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले,"आता मी तुला एक गंमतीची कथा म्हणजे श्रीदत्तजन्माची कथा सांगतो. अनुसूया ही अत्रीऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती.तिच्या घरी ब्रम्हा-विष्णू-महेश हे त्रिदेव कपटवेष धारण करून आले, परंतु अनुसूयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले." हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला,"ते त्रिदेव कपटवेष धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते ? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रीऋषी पूर्वी कोण होते ? त्यांचा मूळ पुरुष कोण ? हे सगळे मला सविस्तर सांगा."
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'अंबरीष आख्यान' नावाचा अध्याय तिसरा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment