श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौदावा

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौदावा क्रूरयवन शासन - सायंदेव वरप्रदान !!🍀

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्ध्योग्यांना नमस्कार करून जयजयकार करून म्हणाला, "अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राम्हणावर श्रीगुरू प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. "नामधारकाने अशी विनंती केली असता, सिद्धयोगी म्हणाले, "बा शिष्य ऐक. श्रीगुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे.श्रीगुरुंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायंदेव ब्राम्हणावर ते प्रसन्न झाले. ते सायंदेवाला म्हणाले, "तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुज्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील." श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिअल असता सायंदेवाला अतिशय आनंद झाला. श्रीगुरुंच्या चरणांना पुनःपुन्हा वंदन केले. श्रीगुरूंचा जयजयकार करीत तो म्हणाला,"गुरुदेव, आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे माहात्म्य वेदांनाही समजत नाही.तुम्ही प्रत्यक्ष ब्रम्हा-विष्णू-महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेष धारण केला आहे. मी तुमचे माहात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो." अशी प्रार्थना करून सायंदेव म्हणाला,"गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवाचाकरी करतो. तो अत्यंत क्रूर, दृष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राम्हणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे.त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार ? सायंदेव असे म्हणाला असता श्रीगुरू त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, "तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील.तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील.तुझ्या कुळातील सर्वजन शतायुषी होतील." श्रीगुरुंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायंदेव त्या यवनाकडे गेला.

सायान्देवाने त्या यवनाकडे पहिले तो काय ? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायंदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्यला झोप आली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राम्हण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे." अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जग आली. तो धावतच घराबाहेर आला. तेथे भयभीत होऊन म्हणाला,"आपल्याला इकडे कोणी बोलाविले ? आपण कृपा करून परत जा." अशी विनंती करून त्या यवनाने सायंदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायंदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्रीगुरुंचे चिंतन करीत होता. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते.ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती असत नाही.

त्या यवनाने सायंदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायंदेव धावतच श्रीगुरुंना - म्हणजे श्रीनृसिंह-सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदीतीरावर सद्गुरु श्रीनृसिंह-सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते.सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवले.टायने श्रीगुरुंचे स्तवन करून त्यानं सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी "आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत." असे श्रीगुरुंनी सांगितले. हे ऐकताच सायंदेव हात जोडून म्हणाला, "गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली, त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता ? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच." असे म्हणून सायंदेवाने श्रीगुरुंच्या चरणांना मिठी मारली." सायंदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्याला समजावीत म्हणाले, "सायंदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ.आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्रकलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत." असे आश्वासन देऊन श्रीगुरुंनी सायंदेवाच्या मास्तावर वरदहस्त ठेवला.मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथक्षेत्री आले. तेथे ते गुप्तपणे राहिले.

ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले, "श्रीगुरू-नृसिंहसरस्वती वैजनाथक्षेत्री गुप्तपणे का राहिले ? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले ? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्रीगुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्रीगुरुनृसिंहसरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'क्रूरयवन शासन - सायंदेव वरप्रदान' नावाचा अध्याय चौदावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻

Comments