श्री गुरुचरित्र कथासार अध्याय नववा
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय नववा रजक वरप्रदान !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
सिद्धयोगी श्रीगुरुचरित्रमाहात्म्य सांगत होते.ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन विचारले, "महाराज, श्रीपादयती कुरवपुरात असताना पुढे झाले ? ती कथा मला सविस्तर सांगा." नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी पाहून सिद्धांनी श्रीगुरुचरित्र सांगा ." नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी श्रीगुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे.श्रीपादती नित्यनेमाने गंगेवर येउन, स्नान करून संध्यावंदन करीत असत, त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले कि तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी घडत असे.
एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, "अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर." श्रीगुरू श्रीपादवल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकुनगाठ मारली.तो म्हणाला, "श्रीगुरू हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत." त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने सोडून दिली. त्याने श्रीपादयतींची अनन्यभावाने सेवा सुरु केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. ही सगळी कामे तो अगदी मनापासून श्रीगुरूंची सेवा म्हणून भक्तीभावाने करीत असे. असे कित्येक दिवस .एक्द वसंतऋतू-वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पहिले. एक मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता.त्या राजस्त्रिया नटूनथटून राजैश्वरात जलविहार करीत होत्या. त्याची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते.शृंगारलेले हत्ती, घोडे होते. दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला.त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असले भोगले नाही. माझे जिणे पशुसमान आहे.या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य ! हा किती सुखात आहे ! याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल ? त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार."मला मात्र जन्मभर काडीमात्र सुख नाही. माझ जीवन एखाद्या पशुसारख."
त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्रीगुरुंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, "अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस?" तो म्हणाला,"हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना? मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते.पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येउन गेला." त्यावर श्रीपाद यती म्हणाले, "तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत. नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादि वासना शमविण्यासाठी तू मलेच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे."
श्रीगुरू श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, "कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका.तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्वज्ञान प्राप्त व्हावे." श्रीगुरू श्रीपाद म्हणाले,"तू वैदुरनगरात जन्म घेशील. त्यावेळी मी तेथे येईन.तुझा अंतःकाळ येईल तेव्हा तुझी-माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन." श्रीगुरुंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्रीगुरुंनी त्याला विचारले,"तुला या जन्मी राज्यभोग घ्यावयाचा आहे कि पुढील जन्मात ? " श्रीगुरू श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला,"आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते." "ठीक आहे" असे म्हणून श्रीपादांनी तय रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाला मृत्यू आला." रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, " त्या कथा मी नंतर सांगेन."
सिद्ध म्हणाले, "नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे माहात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपुर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे.श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यावयाचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी, मघा नक्षत्र, सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुणरुपात असल्याने कुणाला दिसत नाहीत; परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात, हे सत्य आहे. याभूमंडळात कुरवपुर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'रजक वरप्रदान' नावाचा अध्याय नववा समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment