श्रीरामरक्षास्तोत्राचा मराठीत अर्थ
श्रीरामरक्षास्तोत्राचा मराठीत अर्थ🌹*
🕉🕉🕉🕉🕉श्रीरामरक्षास्तोत्राचा अर्थ🌹* 🕉🕉🕉🕉
*श्रीराम रक्षास्तोत्रम*
*ॐ अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीताराम चन्द्रोदेवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्रजपे विनियोगः*
*ध्यानम्*
*ध्यायेदाजानुबाहुं धृतशर धनुषं बद्ध पद्मासनस्थं । पीतं वासोवसानं नवकमल दलस्पर्थि नेत्रं प्रसन्नम् । वामाङ्कारूढ सीतामुख कमल मिलल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कार दीप्तं दधतमुरु जटामण्डलं रामचन्द्रम् ।*
*स्तोत्रम् ।*
*चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम् ।*
*ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनम् । जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुट मण्डितम् ।*
*सासितूण धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकम् । स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम् ।*
*रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातुफालं दशरथात्मजः ।*
*कौसल्येयो दृशौपातु विश्वामित्र प्रियः शृती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।*
*जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरत वन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।*
*करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।*
*सुग्रीवेशः कटीपातु सक्थिनी हनुमत्-प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षकुल विनाशकृत् ।*
*जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौविभीषण श्रीदःपातु रामोஉखिलं वपुः ।*
*एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ।*
*पाताल भूतल व्योम चारिणश्-चद्म चारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।*
*रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्मरन् । नरो नलिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।*
*जगज्जैत्रैक मन्त्रेण रामनाम्नाभि रक्षितम् । यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्व सिद्धयः ।*
*वज्रपञ्जर नामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जय मङ्गलम् ।*
*आदिष्टवान् यथास्वप्ने राम रक्षा मिमां हरः । तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धौ बुधकौशिकः।*
*आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।अभिराम स्त्रिलोकानां रामः श्रीमान्सनः प्रभुः ।*
*तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णा जिनाम्बरौ ।*
*फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।*
*शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्टा सर्व धनुष्मतां ।रक्षःकुल निहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ।*
*आत्त सज्य धनुषा विषुस्पृशा वक्षयाशुग निषङ्ग सङ्गिनौ । रक्षणाय मम रामलक्षणावग्रतः पथिसदैव गच्छतां ।*
*सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा । गच्छन् मनोरथान्नश्च रामः पातु स लक्ष्मणः ।*
*रामो दाशरथि श्शूरो लक्ष्मणानुचरो बली ।काकुत्सः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ।*
*वेदान्त वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः ।जानकीवल्लभः श्रीमानप्रमेय पराक्रमः ।*
*इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेथाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति नसंशयः ।*
*रामं दूर्वादल श्यामं पद्माक्षं पीतावाससं । स्तुवन्ति नाभिर्-दिव्यैर्-नते संसारिणो नराः ।*
*रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं । काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं ।*
*राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं । वन्देलोकाभिरामं रघुकुल तिलकं राघवं रावणारिम् ।*
*रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेथसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ।*
*श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।*
*श्रीराम राम भरताग्रज राम राम ।*
*श्रीराम राम रणकर्कश राम राम ।*
*श्रीराम राम शरणं भव राम राम ।*
*श्रीराम चन्द्र चरणौ मनसा स्मरामि ।*
*श्रीराम चन्द्र चरणौ वचसा गृह्णामि ।*
*श्रीराम चन्द्र चरणौ शिरसा नमामि ।*
*श्रीराम चन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये ।*
*मातारामो मत्-पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्-सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः नान्यं जाने नैव न जाने ।*
*दक्षिणेलक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा । पुरतोमारुतिर्-यस्य तं वन्दे रघुवन्दनम् ।*
*लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं । कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरण्यं प्रपद्ये ।*
*मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्टं । वातात्मजं वानरयूध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।*
*कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरं । आरुह्यकविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम् ।*
*आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां । लोकाभिरामं श्रीरामं भूयोभूयो नमाम्यहं ।*
*भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां ।तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ।*
*रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।*
*श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने*
*इति श्रीबुधकौशिकमुनि विरचितं श्रीराम रक्षास्तोत्रं सम्पूर्णं ।*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
*।।🙏श्री रामरक्षा स्तोत्र🙏।।*
*श्रीगणेशाला माझा नमस्कार असो.* *या रामरक्षा स्तोत्ररुपी मंत्राचा द्रष्टा ॠषी बुधकौशिक हा आहे.* *या मंत्राची देवता श्रीसीताराम ही आहे.या मंत्राचा छन्द अनुष्टुप हा आहे. या मंत्राची शक्ति सीता ही आहे.* *श्रीमत् हनुमान ही या मंत्राची किल्ली आहे, म्हणजे प्रथम श्रीहनुमंताला नमस्कार करुन मी रामरक्षा स्तोत्रमंत्र म्हणत आहे.* *त्याचे फळ मला कृपा करुन मिळावे. या मंत्राचा जप श्रीरामचंद्र प्रसन्न व्हावे, या हेतूने मी करीत आहे.*
*🌹श्रीरामरक्षास्तोत्राचा अर्थ🌹*
*गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, धनुष्यबाण हातात धारण केलेल्या, बध्दपद्मासन घालून बसलेल्या, पिवळं वस्र ( पितांबर ) नेसलेल्या, ताज्या, टवटवीत कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर डोळे असलेल्या, प्रसन्न असलेल्या, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे दृष्टी लावलेल्या, श्यामलवर्णाच्या, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे कांती असलेल्या,* *अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असलेल्या,* *मोठं जटामंडल धारण केलेल्या अशा प्रभू श्रीरामचंद्रांचं मी ध्यान करतो.*
*श्रीरघुनाथाचे चरित्र हे शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे व त्यांतील एकेक अक्षरसुध्दा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे असे आहे.*
*नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमलासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत,* *ज्याच्या सन्निध सीता व लक्ष्मण आहे, जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे,* *ज्याच्या एका हाती खड्ग,* *पाठीला बाणांचा भाता व दुसर्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे,* *खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्यासाठी सहज लीलेने रामरुपाने अवतीर्ण झालेला आहे,* *अशा प्रभूचे ध्यान करून पातकांचा ना़श करणार्या व सर्व कामना पुरविणार्या या रामरक्षास्तोत्राचे सुज्ञ माणसाने पठण करावे.*
*सुविख्यात रघुराजाच्या वंशांत जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो.* *दशरथराजाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो.*
*कौसल्याराणीचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो.* *विश्वामित्र ॠषींचा आवडता शिष्य असा राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो.* *विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो.* *बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो.*
*सर्व विद्या धारण करणारा राम माझ्या जिभेचे रक्षण करो.* *भरताने ज्याला वंदन केले आहे, असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो.* *दिव्य अशी शस्रे ज्याच्यापाशी आहेत, असा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो.* *शिवधनुष्याचा ( सितास्वयंवर प्रसंगी ) ज्याने भंग केला आहे, असा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.*
*सीतेेचा पती राम माझ्या हातांचे रक्षण करो.* *परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो.* *खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो.* *जांबवानाला आश्रय देणारा राम माझ्या बेंबीचे म्हणजेच नाभिचे रक्षण करो.*
*सुग्रीवेचा स्वामी राम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभु राम माझ्या दोन्ही जंघांचे रक्षण करो.* *राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो.*
*समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो.* *दशमुखी रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पायांच्या पोटर्यांचे रक्षण करो.बिभीषणाला राजलक्ष्मी देणारा राम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो आणि सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो.*
*फलश्रुती - याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान मनुष्य पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्व कार्यांत विजय मिळविणारा आणि विनयसंपन्न असा होईल.*
*या रामनाथांनी रक्षण केलेल्या मनुष्याला पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकत नाहीत.*
*राम, रामभद्र, रामचंद्र अशा नावांनी श्रीरामांचे स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनेक सुखोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो.*
*सर्व जगाला जिंकणारा मुख्य मंत्र जो रामनाम, त्या मंत्राने अभिरक्षित, मंतरलेला पदार्थ ( ताईत ) इत्यादी जो आपल्या गळ्यात धारण करतो, त्याला सर्व सिध्दी सहज हस्तगत होतात.*
*इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक, तसे हे रामकवच, रामरक्षास्तोत्र असल्यामूळे यालाही वज्रपंजर असे नाव आहे.* *याचे जो स्मरण करतो, त्याची आज्ञा अबाधित, सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी जय मिळून नेहमी त्याचे कल्याण होते.*
*अशी ही रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ॠषिंना स्वप्नात जशी सांगीतली,तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेविली.*
*रामस्तुति- श्रीराम हा कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे.सर्व आपत्ती घालविणारा व त्रैलोक्यांत मनोहर असा तो राम आमचा प्रभू आहे.*
*वयाने तरुण, रुपवान,सुकुमार,अतिशय बलवान,*
*कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले,वल्कले आणि कृष्णाजिन हीच वस्रांप्रमाणे परिधान करणारे, कदमूल- फले भक्षण करणारे, जितेंद्रिय,तपस्वी,ब्रम्हचारी,सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे,सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षसांच्या कुलाचा संहार करणारे व रघुकुलातील प्रमुख असे दशरथाचे पुत्र राम - लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत.*
*सज्ज धनुष्ये हाती धारण करणारे,बाणांना हातस्पर्श करणारे व अक्षय्य बाणांचे भाते बाळगणारे राम -लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत.*
*निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच(चिलखत) घातलेला, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारा,आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय, असा लक्ष्मणासह गमन करणारा तरुण राम आमचे रक्षण करो.*
*आनंद देणारा, दशरथाचा पुत्र, शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा, बलवान,काकुत्स्थकुलोत्पन्न,महापुरुष, पूर्णब्रम्ह, कौसल्यातनय,रघूत्तम,वेदांतशास्राने ज्ञेय,यज्ञांचा स्वामी,पुराणपुरुषोत्तम, जानकीचा प्रिय,वैभवसंपन्न,अतुल पराक्रमी,अशा या नावाचा श्रध्दापूर्वक नेहमी जप करणार्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते,यात संशय नाही.(असे शंकराचे अभिवचन आहे.)*
*दूर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा, कमलनेत्र आणि पीतांबर परिधान करणारा अशा रामाची या दिव्य नावांनी जे मनुष्य स्तुती करितात,ते जन्म -मरणाच्या संसारातून सुटतात.*
*लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुलश्रेष्ठ, सीतेचा पती,सुंदर,काकुत्स्थकुलोत्पन्न,* *दयासागर,सद्गुणांचा निधी,ब्राम्हण ज्याला प्रिय आहेत असा,धार्मिक राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ दशरथपुत्र,सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ती,लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव श्रीराम,त्याला मी वंदन करतो.*
*राम,रामभद्र,रामचंद्र,वेधस्,रघुनाथ,नाथ,अशी ज्याची नावे आहेत,त्या सीतापतीला माझा नमस्कार असो.*
*हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा,हे रणांगणात कठोरपणा करणाऱ्या श्रीरामा, रामा, तू आमचा रक्षणकर्ता हो!*
*मी श्रीरामचंद्रांच्या चरणांचे मनाने स्मरण करतो.मी श्रीरामचंद्रांच्या चरणांचे वाणीने स्तवन करतो.मी श्रीरामचंद्रांच्या चरणांना मस्तकाने नमन करतो.मी श्रीरामचंद्रांच्या चरणी शरण आलो आहे.*
*माझी माता व माझा पिता रामचंद्र आहे. माझा स्वामी व माझा मित्र रामचंद्र आहे.फार काय, माझे सर्वस्वच हा दयाळू रामचंद्र आहे. दुसर्या कोणाला मी जाणत नाही,मुळीच जाणत नाही,अगदी जाणत नाही.*
*ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्यापुढे मारुती उभा आहे,त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.*
*लोकांना आनंद देणारा, रणांगणात धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशाचा अधिपती व दयेची मूर्ति असा जो करुणासागर श्रीरामचंद्र, त्याला मी शरण आलो आहे.*
* *मारुतिस्तुती- मनाप्रमाणे वेगळे गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान,आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुध्दिमंतांत श्रेष्ठ आणि वानरसमुदायाचा मुख्य अशा वायुपुत्र श्रीरामदूत हनुमंताला मी शरण आलो आहे.*
*वाल्मिकीवंदन- कवितेच्या फांदीवर बसून, " राम-राम " अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणार्या वाल्मिकीरुपी कोकिळेला मी वंदन करतो.*
*रामवंदन- आपत्तींचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा व लोकांना आनंद देणारा, असा जो श्रीराम त्याला मी पुन:पुन्हा नमस्कार करतो.*
*राम, राम अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे भर्जन करणारी ( भाजून टाकणारी ),सुखसंपत्तीचे अर्जन ( प्राप्ती ) करणारी, आणि यमाच्या दूतांना तर्जन ( भय ) करणारी अशी आहे.*
*राजश्रेष्ठ राम नेहमी विजय पावतो.त्या रमापती ( सीतापति ) रामास मी भजतो. रामाने राक्षसांची सेना मारली,त्या रामाला माझा नमस्कार असो.मला रामाहून दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही.मी रामाचा दास आहे.माझ्या चित्ताचा लय नेहमी रामाच्या ठायी होवो.हे रामा, माझा तु उध्दार कर!*
*शिव पार्वतीला सांगतात- हे सुवदने,राम,राम,राम,राम अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणार्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो.* *श्रीरामाचे नाव हे विष्णूच्या सहस्रनामाशी बरोबरी करणारे आहे.*
*याप्रमाणे बुधकौशिक ॠषिंनी रचिलेले श्रीरामरक्षास्तोत्र समाप्त झाले.
* *श्रीसीता-रामचंद्रांच्या चरणी अर्पण असो*
🙏🌹🙏🌹🙏
Comments
Post a Comment