!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
🙏🏻🌷 !! श्री गुरुचरित्र कथासार !! 🌷🙏🏻
-------------------------------------
🍀!! श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला मंगलाचरण !!🍀
।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।।
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नम: ।।
हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लम्बोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्याा साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते . संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.
हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरीब्र्म्हादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.
आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वतीमाते, मी तुला वंदन करतो. वेद शास्त्रेपुराणे तुझ्यााच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे.श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसुत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणून तू मला या ग्रंथलेखानासाठी प्रेरणा दे. मला स्फूर्ती दे. मला विद्यादान दे.
आता मी ब्रम्हा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख-चक्र-गदा-पद्मधारी त्या नरहरि विष्णूने गळ्यात वैजन्तीमाला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो.तो मोठा कृपाळू, दयाळू आहे. आता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जग्नमाता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो। ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले, त्या सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवाला मी वंदन कर्तो. सर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध्साध्य, सर्व ऋषीमुनी, पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो. माझ्या जवळ कवित्व नाही. ग्रंथरचना कशी करतात ते माहित नाहींअल मराठी भाषा नित येत नाही. मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी . माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी मदत करावी. अशाप्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई-वडिलांना-पूर्वजांना नमस्कार करतो.
आपस्तंभ शाखेचे, कौंडीण्य गोत्रात जन्मास आलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ. त्यांचा पुत्र देव्रो. देव्रवांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. आश्वलायन शाखेचे, कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या 'चंपा ' हि माझी आई. माझा पिता गंगाधर. ते सदैव श्रीगुरुंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून 'सरस्वती-गंगाधर' असे स्वतःचे नाव धारण केले.
श्रीगुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधूसंतांना संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार, मी या सर्वांना प्रार्थना करतो कि, मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. पूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केल. ते म्हणाले, "तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील" . गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्रीनृसिंहसरस्वती हे त्रयमुर्ती श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल? परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे. ज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्य श्रवण-पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण-पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वसत्वाय करिल. त्याला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. श्रीगुरुकृपेने त्याला रोग्रेची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्वप्रकारची बंधने नष्ट होतील. अशी हि परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे, श्रोते हो ! मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेव. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्यामाझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नक. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. उस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रोते हो ! आपण लक्षपूर्वक ऐका.
श्रीगुरू नृसिंहसरस्वती गाणगापुरक्षेत्री असतना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या क्षेत्री श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात,तेथे जाऊन श्री गुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात . चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. नामधारक अनावचानावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान-भूक विसरून गानागापुराकडे निघल.'आता एकतर श्रीगुरुंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करिन' असा निर्धार करून तो श्रीगुरुंचे स्मरण करीत जात होत. तो मनात श्रीगुरुंना आळवीत होता, "अहो गुरुदेव, लोखंडाला परीस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे. ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता, मला इते दु:ख का बरे भोगावे लागते? परिस्पर्शाने जर लोखान्धाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा? हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात.सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही? आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कुणाकडे जाऊ?" अशाप्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुनः पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता.
"अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच आहेत. ते कृपासिंधू आहेत. भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकरते आहेत. ते नृसिंहसरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील." असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दखव. हे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का? तुम्ही तर माझे मत, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजनपूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते. सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार? तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दुख तुम्हाला समजत नाही का? बाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का? घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्री रामावतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले? ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले? परशुरामाने तुम्ही सर्व पृथ्वी नि:क्षस्त्र करून ब्राम्हणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले? केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार? अहो आहात. साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता? आणि मी तरी काय देणार? लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय? मागते काहीच नाही. आधी देऊन मग देणाऱ्याला 'दाता' असे कसे म्हणता येईल? सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी आणेल वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेइन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागत? मी तुमचा दासानुदास आहे.
प्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही? मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही? आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ? तुम्ही अनाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाशालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुन का येत नाही?
त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रुने त्यांच्या चरणांना स्नान घतले. त्यांची आपल्या हृदयमंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केलि. त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले. अशाप्रकारे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो.
अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'मंगलाचरण'नावाचा अध्याय पहिला समाप्त.
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
🙏🏻🌺🙏🏻🌷🙏🏻🌸🙏🏻🌻🙏🏻
Comments
Post a Comment