!! तारकमंत्र !! श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र


    !! तारकमंत्र !!

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना 
अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्यही शक्यकरतील स्वामी......!!

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा काळही ना नेई त्याला परलोकीही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील
स्वामी.......!!

उगाची भीतोसी भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ति
कळू दे 
जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा 
नको घाबरू असे तू बाळ त्यांचा अशक्यही शक्य
करतील स्वामी......!!

खरा होई जागा श्रद्धे सहित 
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ 
नको डगमगू स्वामी देतील हात अशक्यही शक्य करतील स्वामी.......!!

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात हे तिर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेई हाती
अशक्यही शक्य करतील
स्वामी.....
नि:शंक होई रे मना निर्भय होई रे मना
तारकमंत्र ऐकताना त्यात असणार्या शक्तीची जाणीव होते ,पण कधी? 
जेव्हा मन  नि:शंक होते तेव्हाच! कारण शंकासहित असणारे मन सश्रद्ध होऊच शकत नाही,आणि जेव्हा ते सश्रद्ध नसते तर मग निर्भयता कोठून येणार? 

जेव्हा शंकारहित मन स्वामींना आळवते तेव्हाच स्वामींची प्रचिती येईल ना! आणि स्वामी पाठीशी आहेतच या खात्रीने निर्भयता येईल.
याचाच अर्थ स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात तेव्हा ते पाठीशी असतातच,पण मन जेव्हा शंभर टक्के त्यांच्या पाठीशी असण्यावर विश्वास ठेवते तेव्हाच त्याची प्रचिती येते.

Comments