vikas Lohagaonkar

एक भक्त पांडुरंगाला विचारतो,

"कंबरे वरचा हात काढून आभाळाला लाव तु,
सोन्या चांदीच दान नको मला, भिजव माझा गाव तु !"

पांडुरंग म्हणाला,
आभाळाला हात लावून
पडेल कसा पाउस ?
कुणी म्हणे काळ्या ढगावर क्लिक कर माउस !

आता म्हणतो नको मला
सोन्या चांदीच वाण
झाड़ सगळी तोडून निसर्गाचं
सांग कोणी वाजवलं पानदान ?

आता म्हणतो पांडुरंगा
पाउस फक्त पाड,
कशासाठी ? कुणासाठी ?
तु रान केल उजाड़ ?

भक्ता तुझी फक्त घेण्याची
वृत्ती आता सोड,
मनामध्ये रूजव आता
निसर्गाची ओढ़ !

हात जोडून मिटण्यापेक्षा
उघड आता डोळे,
आई वसुंधरा रड़तेय बाळा
काढ कानातले बोळे !

हे एकचं कर्तव्य
आत्ताच पार पाड़,
स्वत: पासुन सुरूवात कर
लाव एक तरी  झाड !

पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट,
दिसला पाहिजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट !

अठ्ठावीस युगांपासून
हाच संदेश देतोय,
पण भोळा भक्त माझा
फक्त प्रसादच घरी नेतोय..!"

आता वृक्ष हाच प्रसाद
अन् वृक्ष हेच तिर्थ
हा मंत्र जपला नाही
तर अनर्थचं अनर्थ

हिच तुझी तपश्चर्या
हेच तुझे तप
वृक्ष , पाणि , पर्यावरणाला
जिवापाड जप...
कर आपलाही विकास


Comments