श्रावण घेवडा लागवड !

🌱 *श्रावण घेवडा लागवड*

🎯 भारतात घेवड्याची लागवड सर्वत्र केली जाते. घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. घेवडयाच्‍या शेंगामध्‍ये अ आणि ब जीवनसत्‍व तसेच खनिजे, लोह आणि चुना तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

🌤 *जमिन व हवामान* : घेवडा हेक्‍टरी पिक हलक्‍या ते मध्‍यम जमिनीत पाण्‍याचा निचरा असणा-या जमिनीत उत्‍तम प्रकारे येते. हे पीक थंड हवामानात आणि पावसाळयात येणारे असून 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते.

📍 *पूर्व मशागत* : जमिनीची नांगरणी करून जमिन भूसभुशीत करावी. जमिनीत 40 ते 45 बैलगाडया हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे.

👉 *लागवड हंगाम* :
▪ महाराष्‍ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामात होते.
▪ खरीप हंगामासाठी जून, जूलै महिन्‍यात रब्‍बी हंगामासाठी सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात आणि उन्‍हाळी
▪ हंगामात जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात घेवडयाची लागवड करतात.

⚖ *बियाण्‍याचे प्रमाण :*
✅ प्रति हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते.
✅ टोकन पध्‍दतीने लागवड केल्‍यास हेक्‍टरी 25 ते 30 किलो बी लागते.

🎯 

Comments