black दोरा

-----------------------------------------------------
*हाताला किंवा पायाला काळा दोरा का बांधतात ?*
----------------------------------------------------



आपल्याकडे दृष्ट लागणं हा एक धोका मानला जातो, घरातील अथवा व्यवहारातील काही अशुभ घटनांमागे दृष्ट लागणं हे कारण मानलं जातं.

चांगल्या गोष्टी घडत असताना अचानक वाईट गोष्टी होण्यास सुरूवात होणे, सुखी कुटुंबात भांडणं होणं,
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीचा प्रभाव सर्वात चांगले असेल अश्या लोकांनी पायाला काळा दोरा बांधणे खूप लकी मानले जाते आणि तसेच पायाला काळा दोरा बांधल्यामुळे त्यांचे भाग्य उघडते आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते.

 ज्योतिषशास्त्रानुसार ज्या राशिच्या लोकांवर शनिचे चांगले प्रभाव सर्वाधिक असतात. ज्यामुळे या राशीच्या लोकांनी काळा दोरा पायाला बांधणे खूप लकी असते आणि काळा दोरा बांधल्याने त्यांचे नसीब उघडते आणि त्यांच्या जीवनावर सकारात्मक शक्तींचे प्रभाव पडते. इतकेच नाही काळा बांधल्याने त्यांच्या कार्य क्षेत्रातही त्यांना यश मिळते आणि घरातही सुख आणि शांती राहते.

म्हणून लोकांणी आपल्या हातात किंवा पायामध्ये काळा दोरा बांधले पाहिजे.

काळा रंगाचा दोरा बांधल्यामुळे त्यांच्या जीवनावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही.

त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धि येते आणि हे लोक एक यशस्वी मनुष्य बनतात.
इतकेच नाही तर प्रेमसंबंधित जर काही प्रकारचे संकट येत असेल तर या लोकांनि पायाला काळा दोरा बांधावे. यामुळे त्यांच्या प्रेम प्रकारणात कोणताही त्रास होणार नाही आणि आयुष्यही आनंदी होईल.

*ज्योतिषशास्त्राच्या नुसार जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी आपल्या डाव्या पायात दोरा बांधतात. तर यामुळे तुम्हाला धनाची किंवा पैशाची कधी कमी भासणार नाही आणि धनाशी निगडीत सर्व समस्या पण दूर होऊ लागेल. तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल.*

असे अनेक फायदे काळा दोरा पायात बांधल्याने तुम्हाला दिसून येतील.

*वैज्ञानिक कारण*

काळा दोरा बांधण्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील समोर आलं आहे. आपलं शरीर पंचतत्वापासून बनलं आहे. ज्यामध्ये पृथ्वी, वायु, अग्नि, जल आणि आकाश यांचा समावेश आहे. यातून मिळणारी ऊर्जा शरीराला शक्ती देते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते. तेव्हा या पंचतत्वापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत नाही पोहचत. यामुळे शरीरावर काळा दोरा बांधला जातो. काही लोकं काळ्या दोऱ्यात देवाचं लॉकेट देखील घालतात. ज्यामागे त्यांची भावना असते.

*पायामधे काळा दोरा बांधल्याने होतात हे फायदे…*

१) आपण अनेक लोक पोटदुखीने त्रस्त असल्याचे ऐकले असेल. खरतर त्यांना पोटदुखी तेव्हा होते जेव्हा त्यांची बेंबी फिरते आणि त्यांच्या पोटात असहनीय दुखणे सुरू होते. अशा लोकांना आपल्या पायाच्या अंगठ्यात काळा दोरा बांधल्याने या दुखण्यापासून सुटका मिळू शकते. म्हणून जेव्हा केव्हा आपल्या पोटात दुखायला लागेल तेव्हा आपल्या पायाच्या अंगठ्यात काळा दोरा बांधून घ्या.

२) जर आपण दिवसभर मशीन सारखे काम करत असाल तर आपले पाय दुखणे साहजिकच आहे. शरीर एका वेळेस उत्तर देत आणि त्यालाही आरामाची गरज असते. म्हणून जर अधिक काम केल्याने आपल्याला पाय दुखण्याचा त्रास होत असेल तर आपल्या पायात काळा दोरा बांधून घ्या. असे केल्याने आपले दुखणे सहजपणे दूर होईल आणि या गोष्टीचा शास्त्रातही उल्लेख केला आहे. म्हणून पाय दुखण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आजच आपल्या पायात काळा दोरा बांधून घ्या आणि पाय दुखण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवा.

३) कधी कधी पायाला जखम झाल्यावर ती लवकर बरी होत नाही, भलेही आपण जखम बरी व्हायला अनेक औषध किंवा उपाय करून घेतले असतील पण जिद्दी जखम लवकर बरी होण्याचं नाव घेत नाही. अशात आपण आपला पाय लवकर ठीक करण्यासाठी पायात काळा दोरा बांधून घ्यावा. कारण पायात काळा दोरा बांधल्याने जखम लवकर बरी होऊन जाईल.

४)विज्ञानामध्ये काळा रंग हा उष्णतारोधक आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे काळा दोरा हा वाईट नजर आणि दुषित ऊर्जेला आपल्या पासून दूर ठेवतो. त्यामुळे वाईट द्रुष्ट लागू नये,  म्हणून काळा दोरा बांधला जातो .
-----------------------------------------------

Comments