पीक विमा २०१९

🌾 *पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ*

*LetsUp । Update*

⚡ शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने वाढवली पीक विमा योजनेची व्याप्ती.

🎯 *योजना* : शेतकऱ्यांना नेहमीच बदलत्या हवामानाचा फटका बसतो. या काळात शेतकऱ्यांना पीकविमा योजना आधार ठरत, परंतु अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहतात.

यावर उपाय म्हणून सरकारने सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर 70 टक्के केला आहे. योजनेंतर्गत खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

📍 *कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक राहणार आहे*.

📅 ऑनलाइन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत.

💁‍♂ *या पिकांसाठी योजना लागू* : भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी योजना लागू असणार आहे.

🧐 *योजनेच्या अटी* - हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, आदींसाठी विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे.

🌐 

Comments