जांभुळ
जांभूळ.*
पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो.
‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. आशिया खंडात जांभळाचं मूळ आहे. हे झाड बहुगुणी आहे. याची पानं, लाकूड, फळ, बिया या सर्वाचा उपयोग होतो. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या आणणारी असते. इंग्रजीत याला ‘ब्लॅक प्लम’ म्हणून ओळखलं जातं. जांभळाच्या पानांची पावडर टूथपेस्ट, साबण इत्यादीसाठी वापरली जाते. याच्यापासून जॅम, सरबते व व्हिनेगर बनवितात. याचे मूळ, खोड, पाने, फळे, बिया सर्वांचा, खोकला, अतिसार, पोटदुखी, पुटकुळ्या, फोड हे आजार बरे करण्यासाठी केला जातो. अनेक विकारांत उपयोगी पडते, जांभळाच्या बीचे चुर्ण मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. याचे लाकूड टिकाऊ असते.
डहाळ्यांचा उपयोग टॅनिन व डाईग इण्डस्ट्रीत होतो. जांभूळ पित्तहारक, दाहनाशक, मूत्रगामी व ग्राही आहे. जांभळामध्ये ‘सी’ जीवनसत्व व ‘बी’ जीवनसत्व तसंच कॅल्शिअम, फॉस्फरस, फॉलिक असिड, कॅरोटीन, मॅग्नेशिअम, अँटीऑक्सिडंट्स व कॉलिनदेखील असतं. जांभळाच्या बीपासून पिवळसर तेल बनवतात. फळ हे थंड व कोरडय़ा गुणधर्माचं आहे.
पचनाच्या विकारांवर जांभूळ उपयुक्त आहे.
जांभळात लोह भरपूर असल्याने हे रक्तवर्धक आहे.
जांभळाच्या रसाच्या आसव व सरबताने पोटदुखी व जुनाट हगवण दूर होते.
प्लीहा व लिव्हरच्या विकारात जांभळं गुणकारी असतात.
पांडुरोग व कावीळ झालेल्या रुग्णांसाठी जांभळं हितावह असतात.
जांभूळ फळ व बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध मानलं जातं.
जांभूळ अतिसार, मुरडा, संग्रहणी, रक्तपित्त, मुतखडा, मुत्राशयाचा दाह आदी रोगांतही उपयोगी आहे.
जांभळाच्या सालीची राख तेलात घालून भाजलेल्या भागावर लावावी. तसंच या सालीच्या काढय़ाने गुळण्या केल्यास घशाच्या सुजेमध्ये फायदा होतो.
जांभळाच्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण ते वातकारक असल्याने जपून खावे.
उन्हाने उष्णतेचा त्रास होत असल्यास जांभूळ खाल्ल्यावर तरतरी येते.
रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी जांभूळफळाचा फायदा होतो.
जांभूळरस स्मृतीवर्धक आहे.
ल्युकोडर्मामध्येही जांभूळ हे फायदेशीर आहे.
हृदयरोगावरही जांभूळ उत्तम मानलं जातं.
गळू व काही त्वचारोगांवर जांभळाची बी उगाळून लावल्यास फायदा होतो.
जांभळाच्या झाडाच्या सालीची राख ही दातांसाठी चांगली असते.
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.
• जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब कमी होतो. त्यामध्ये असलेल्या फिनॉल अँण्टिऑक्सिडंटमध्ये रक्तदाब कमी करणारे घटक असतात.
• जखम, आतडय़ातील अल्सर किंवा इन्फेक्शन दूर करण्यासाठी जांभळाच्या बियांचा अर्क घ्यावा. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून 2-3 वेळा घ्यावी.
• जांभळात फ्लॅवोनॉइडस् भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील हानिकारक विषद्रव्ये बाहेर काढण्यास
• जांभूळ मदत करते. पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ बियांचं अर्क उपयुक्त आहे.
• जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा. ही पावडर दिवसातून तीन वेळा दूध किंवा पाण्यासोबत रिकाम्या पोटी घ्या. मधुमेहावर हा गुणकारी उपाय आहे. मधुमेहाचा शरीरावर होणारा परिणाम यामुळे कमी होतो.
•

Comments
Post a Comment