पिस्ताची शेती

🌾 *पिस्ता ची शेती*

*LetsUp । Agri*

🎯 भारतात विविध पदार्थांमध्ये सुका मेवा वापरला जातो. भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. तर जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात....

🌦 *हवामान आणि तापमान* : या पिकाला दिवसात कमाल 36 डिग्री सेंटीग्रेड तापमान चालू शकते.

🧐 *जमीन आणि माती* : या पकियाचे उत्पादन घेण्याआधी मातीची चाचणी आवश्यक
7.0 ते 7.8 सामू असलेली जमीन पिस्ता शेतीसाठी योग्य मानली जाते.

💁‍♂ *जमिनीची मशागत* : पिस्ता शेतीसाठी जमिनीची खोलगट नांगरणी करणे आवश्यक आहे. जमिनीच्या आत सहा ते सात फुटापर्यंत जर टणक भाग असेल तर तो तोडून जमीन समतल करावी. कारण पिस्ता ची मुळे जमिनीत खोलवर जातात.

🌱 *रोप व्यवस्थापन* रोप लावण्यासाठी खोल खड्डा खणावा, यामुळे मुळे योग्य रीतीने सामावली जातील.या पिकाला पाणी लागते तरी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.सिंचन व्यवस्था असलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 6 मीटर x 6 मीटर अंतर ठेवावे. विनासिंचन बागेसाठी रोपांमध्ये 8 मीटर x10 मीटर अंतर ठेवावे.

📍 *कापणी*
▪ पिस्ताच्या झाडाला उत्पादन सुरु होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागतो.
▪ कापणी करताना अविकसित फळांची कापणी होणार नाही याची काळजी घ्यावी.

👍 *उत्पादन*
▪ पिस्ताचे उत्पादन हवामान, जाती तसेच शेती व्यवस्थापनाचा दर्जा यावर अवलंबून आहे.
▪ रोप लागवडीच्या 10-12 वर्षानंतर प्रत्येक झाड 8 ते 10 किलो उप्तादन देतो

Comments