पोळी विकासाची भाकरी


 

आजची रेसिपी तुम्हाला अर्पण आदर्श गृहिणी .


 एका मुलाला मेथीची भाजी आवडत नसते म्हणून आई त्यांच्या साठी पर्यायी मेथीचे पराठे बनवायची आणि मेथीची पौष्टीकता त्याला देते .

 तसेच आज घडलं योगायोगाने .

 एका मुलाला कोणी कितीही लाडीगोडी लावली तरीही त्याने आज पर्यंत भाकरी खाल्ली नाही . 

खरंतर त्याच्या घरी शेतातील ज्वारी चे भांडार आहे तरीही नाही . 

एके दिवशी आज्जी ने त्यांच्यासाठी फक्त भाकरीच केली तर तो मुलगा उपाशी राहीला पण भाकरी खाल्ली नाही . 

शेवटी आज्जीलाच त्याची किव आली अन् तीनं भाकरी सोडून स्वयंपाक करून त्याला जेवु घातलं . 

असा होता तो हट्टी मुलगा .

आज त्या गोष्टीला खुप वर्षे झालीत.

 त्याचं भरलेलं घर आता हळूवारपणे रिकामं झालं .

 शेवटी त्याच्या आईच्या संस्कारांची शिदोरी त्याच्या हाती आली .

 अन् त्या हट्टी मुलाचा एकट्याचा संसार सुरू झाला . 


त्याचा एकटेपणा दुर करण्यासाठी त्याच्या जवळची मंडळी त्याच्या घरी आली . 

" हसत खेळत जात होते दिवस मजेत .

 काही हरवले दुःख दिसले रम्य सुख . 

गप्प असलेल्या घरात गप्पा गोष्टी पुन्हा कान्ही आल्या .

आस्था व्यस्त घरात वेवस्थितपणाची शिस्त आली .

 पडलेल्या माझ्या चेहऱ्यावर तेज आनलं .

घेतली मज्जा शेताची होऊनी रानपाखरं .

दिवस सरले होते ते मोजकेच .

घबराट झाली lockdownची .

झाली घाई गडबड निघण्याची .

जिथल्या तिथे वस्तू सोडून निघालोत .

तेथे राहीलो मनसोक्त लाडाने .

सोडोनीया आनंद परतोनीया आलो सुखाने ."


घरची मंडळी घरी गेल्यावर त्याच्या समोर पेच पडला होता की , बाकी सर्व उरलेल्या सामानाचा उपयोग करुं पण... आता परत बाकी आहेच . तो म्हणजे ज्वारीच्या पीठाचे काय करावे ?

त्यानं आईच्या शिदोरीतुन वरील प्रमाणे 'मेथीचा पराठा' चा उपयोग इथे लागु केला . 

काय बरं केलं असेल त्यानं ? 

कारण तो भाकरी खाऊच शकत नाही !

त्यानं केलेली भाकरी ...


रेसिपी :- गव्हाची कणीक -२वाट्या 

          ज्वारीचं पीठ १/२ अर्धी वाटी

          कणीक पीठ तिंबली की पोळ्या लाटून घ्या .

          अन् झाली 'भाकरीची पोळी '.


 त्याच्या भाकरीची पोळी ची चव .


" वरचा पापुद्रा आहे भाकरीचा .

 खालचा थर आहे पोळीचा .

चव आहे पोळीची .

स्वाद आहे भाकरीचा .

घास आहे जरी भाकरीचा.

तरीही नरमता आहे पोळीची .

दिसायला आहे पांढरीशुभ्र भाकरी .

काठाला आहे ती तशीच पोळी ."


 चला त्याला काही तरी नवीन करून ज्वारी चे पीठ संपवायचे आहे .

कारण उरलेलं टाकून देनं त्याच्या रक्तातच नाही .

बरं तुम्हाला काही नवीन करायचं असेल तर करून पहा ही त्याची रेसिपी .

पुन्हा भेटू त्याच्या हातच्या नव्या रेसिपीज मध्ये .

तोपर्यंत आदर्श गृहिणी ना नमस्कार .

शेवटी अगदी खरं सांगतो .

"अरे याला कोणी तरी चांगले शिकवा रे !"

कसा होईल याचा विकास !?!..

Comments