श्री प्रल्हाद महाराजांच्यासाठी केलेलं काव्य
हे काव्य माझ्या (कै.)आज्जी ने १९५२ मध्ये लिहिलेलं आहे .
प्रल्हाद महाराज जिंतूर मुक्कामी असताना . कारण माझी आज्जी ही जिंतूर चीच आहे .
हे काव्य तीला श्री प्रल्हाद महाराजांच्या जवळ ठेवता नाही आलं .
तरी आपणास विनंती आहे की हे काव्य संग्रहात न राहता आपल्या मार्फत सर्वांना वाचण्यासाठी देण्यात यावे नम्र विनंती .
काव्य :-
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्य रामानंद महाराजा !
रामानंदाचा शिष्योत्तम प्रल्हाद संता !!
जिंतूर मुक्कामी असता भक्ती मार्ग दाखविता !
तव गुण महीमा काय वर्णीता !!
बहुभक्तांनी भक्ती ने वर्णन करीता !!
अखंड राम नामाचा संचय असता !
हृदयातूनी ध्वनी श्री राम निघता !!
अधिक गोड मज कानी पडता !
सहज योग सद्गुरू चा घडता !!
सदा संत संगत घडो ही नम्रता !
माघते ही अंबिका द्या हो अखंड आशिर्वाद आता !!
श्री राम जय राम जय जय राम !
श्री राम जय राम जय जय राम !!
🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री प्रल्हाद महाराज की जय 🙏🏻🙏🏻 🙏🏻
लेखिका :- कै. अंबिका (अंबूताई) दिगांबरराव लोहगांवकर देशपांडे
शब्दांकन :- विकास रमेशराव लोहगांवकर देशपांडे ( परभणी )
Comments
Post a Comment