सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे
*सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे*
Lockdown मधील सुकलेल्या मेथीचे पराठे :-
आज आदर्श पुरुषांना सलाम .
हो हो आज गृहिणींना नाही तर आदर्श पुरुषांनाच प्रणाम .
"असं म्हणतात Lockdown न खुप काही शिकवलं .
नात्यात एकमेकांशी संवाद साधायल शिकवलं .
कोणाला आईची तर कोणाला ताईची तर कोणाला बायकोची घरात मदत करायला शिकवलं .
घर - स्वयंपाक घर हे केवळ गृहिणींचीच जबाबदारी नाही हे शिकवलं .
काहींना तर नवं नविन पदार्थ करायला न लाजता शिकवलं ."
हे मागच्या वर्षी झालं . आता काय परत तेच झालं .
दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांच lockdown लागलं .
गृहिणींच काय त्यांना जाणीव आणि काळजी असते . काय आहे काय लागणार आहे त्याची .
पुरुषांच काय सदैव त्याचाच निष्काळजीपणा त्यांना भोवतो .
अन् तेच झालं माझ्या सोबत .
बाहेर Lockdown कडक अन् घरात एक टोमॅटो आणि सुकलेली मेथी . मी एकटा आणि हे दोघेच आणि वेळ दोन दिवस .
एक दिवस टमाट्याचे वरण पुरवलं .
आता मात्र 'त्या' सुकलेल्या मेथीचं काय कसं बरं करावं .
त्या साठीच " *सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे* ".
*सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे*
साहित्य :- निवडलेली मेथीची भाजी
ज्वारी चे पीठ :- १ वाटी
बेसन पीठ :- १/२ अर्धी वाटी
गव्हाची कणीक :-४वाट्या (किंवा कणीक मळूस्तर)
जिरं , ओवा , तिखट , मीठ चवीनुसार
कृती:- प्रथम सुकलेली मेथी अर्धा तास आधीच पाण्यात भिजत घालून ठेवावी . असं केल्याने सुकलेली मेथी ताजी टवटवीत होईल .
नंतर ती मेथी पाण्यातून काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या .
कणीक , ज्वारी चे पीठ , बेसन एकत्र करून घ्या .
नंतर त्यात वाटलेली मेथी घालून ती मळून घ्या .
नंतर त्यात धनेपूड , ओवा तिखट मीठ चवीनुसार घालून ती कणीक तिंबवुन घ्या .
नंतर लाटून तव्यावर तेल किंवा तूप घालून तो पराठा भाजून घ्या .
आता तयार झाले तुमचे *सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे* .
*सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे*या सोबत शेंगदाणे चटणी , लोणचे , टोमॅटो सॉस खायला घ्या .
मला आशा आहे की हे तुम्हीही करून पाहणार आहातच .
माझे टाकाऊतून टिकाऊ पौष्टीक पदार्थ :- १) पोळी विकासाची भाकरी .
२) साबुदाणा रताळीचा विकासी पराठा
३) *सुकलेल्या मेथीचे पराठे पौष्टीक विकासाचे*
हे पदार्थ lockdown मध्ये करायला काहीच अवघड नाही .
आदर्श गृहिणींना हे सर्व माहिती आहेच .
हे मी तुम्हाला सांगतोय Lockdown मधले आदर्श पुरुषांना होय तुम्हालाच .
पुन्हा एकदा आदर्श गृहिणींना आणि आदर्श पुरुषांना मानाचा सलाम .
मी आता घेतो या रेसिपी मध्ये पुर्ण विराम .
आणि पुन्हा एकदा शेवटी अगदी खरं सांगतो .
"अरे याला कोणी तरी चांगले शिकवा रे !"
कसा होईल याचा विकास !?!
Comments
Post a Comment