साबुदाणा रताळीचा विकासी पराठा
*साबुदाणा रताळीचा विकासी पराठा*
सुगरण गृहिणी ना आदरपूर्वक नमस्कार . 🙏🏻🙏🏻🙏🏻
परवा महाशिवरात्र , काल शुक्रवार उपवासाचा आणि आजही अमावस्या उपवासाची .
उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी , भगर , उपवास भाजणी , बटाटे , रताळी आणि भरपुर फळं हे समीकरण जनू ठरलेलंच असतं .
" फक्त नावानं उपवास !
पोटभर खाल्लं झक्कास !!
उपाशी राहण्याचा आहे त्रास !
असं केल्यानं कसा होईल शारीरिक तब्येतीचा विकास !! "
हे असा आहे आमचा उपवास म्हणजे एवढं मोठं भिजवायचं आणि करायचं .
बरं खायला करायला कसला हा त्रास . एवढं तर करावच लागतं आणि उपवासाच्या दिवशी हा अंदाज हमखास चुकतो .
मग उरलेल्या भिजवलेल्याचं काय बरं करावं ? हा मोठा प्रश्नच पडतो .
उपवास उपवासाचं खाऊन कंटाळा येतो . हं एक दिवस खूप छान वाटतं , पण नेहमी साठी नाही हं !
उपवासाचे पदार्थ जेवणात वापरावे कसें ?
म्हणुनच तर हा '" साबुदाणा रताळीचा विकासी पराठा "' .
*साबुदाणा रताळीचा विकासी पराठा*
साहित्य :- साबुदाणा - १वाटी
रताळ्याचा किस -२वाटी
शेंगदाण्याचा कुट - २-३चमचे
बेसन पीठ -१/२आर्धी वाटी
गव्हाची कणीक -३वाट्या/ ( कणीक मळूस्तर )
मिरची आणि आद्रक पेस्ट - मीठ - जिरं - ओवा - चवीनुसार
कृती :- प्रथम भिजवलेला साबुदाणा , रताळीचा किस , शेंगदाण्याचा कुट , बेसन घालून ते मिश्रण मळून घ्या .
नंतर त्यात मीठ , जिरं , ओवा आणि मिरची - आद्रक पेस्ट घालून पुन्हा एकदा मळून घ्या .
आता यात कणीक पीठ मळून तिंबवुन घ्या .
* टिप * :- साबुदाणा रताळीचा किस हा आधीच ओला असल्याने त्यात कणीकेसाठी पाणी घालू नये .
तिंबवलेल्या कणीकीचे पराठे लाटून तव्यावर थोडे तेल / तुप घालून भाजून घ्या .
आता आपला "साबुदाणा रताळीचा विकासी पराठा " तयार झाला .
"साबुदाणा रताळीचा विकासी पराठा" सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा आंब्याचं / लिंबाचं लोणचं खा .
"' झालं नं मस्त !
मग करून टाका फस्त !!
करुयात पदार्थ झक्कास !
काळजी नको तुमच्या सोबत आहे हा विकास !! "'
मला खात्री आहे की , तुम्हीही ही रेसिपी करणार आहातच .
कारण तुम्ही त्याची " *पोळी विकासाची भाकरी*
https://vikaslohagaonkar.blogspot.com/2021/03/blog-post_8.html
" ही रेसिपी केली आहे . अशी माझी आशा आहे .
बरं पुन्हा भेटू त्याच्या हातच्या नव्या रेसिपीज मध्ये .
तोपर्यंत सुगरण गृहिणी ना आदरपूर्वक नमस्कार .
पुन्हा एकदा शेवटी अगदी खरं सांगतो .
"अरे याला कोणी तरी चांगले शिकवा रे!"
कसा होईल याचा विकास !?!
Comments
Post a Comment