श्री सरस्वती माता प्रसन्न


 ....ही देवी आहे वॉशिंग्टन मध्ये. अमेरिकेत! तिच्या पायाशी बसून ३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सरस्वतीच्या पायाशी बसलेला एक मुलगा आहे - बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष, धर्माने ख्रिश्चन. 


लहानपणी इंडोनेशिया मधील शाळेत शिकलेला हा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर, इंडोनेशियाने ही सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह! 


'सुसंस्कृत' पणा म्हणतात तो हा. जे सुसंस्कृत असतात त्यांना विद्येचे, विद्येच्या देवतेचे महत्व. विद्येच्या देवतेची पूजा करायला - देव, धर्म, देश, वंश, पदवी, वर्ण ... काहीही आड येत नाहीत.

       😏😏😏....एका कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर ह्यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे, उच्च शिक्षित झाले की आपल्याकडे असले प्रकार होतात ... आपल्या लोकांना नेमकं कुठं दुखत आहे समजत नाही 

...

Comments