तिलार्पण नमस्तु

 तिळा तिळा ने दिवस वाढत आहेत .

 बाबा तुम्हाला जाऊन आता सात महिने होत आहेत .

 बाबा जेव्हा तिळ तिळ तुटत होता तुमचा माझ्यासाठी .

 तेव्हा जाणीव नाही झाली तुमच्या काळजीची . 

आता मात्र 'त्या' वागण्याचा विचार करून माझ्या अंगाचा तिळपापड होतो .

 आता जरी तिळ तिळ तुटला तुमच्यासाठी माझा . 

तरीही तुमच्या सारखा गोडवा जिवनात येणार नाही माझ्या . 

जेवढे तिळ शरीराला ऊर्जा आणतात .

 तेवढेच मोक्षगती साठी महत्त्वाचे असतात .

 बाबा खरं तर तुम्हीच होतात ऊर्जा माझी . 

तुमच्या विना नाही कोणत्याही क्षेत्रात गती माझी .

 बाबा तुम्ही म्हणायचात की 'आमचे तिळ सांडू नका अन् आमच्याशी कधी भांडू नका .' 

 बाबा आता मात्र क्षमा करा तुमचेच तिळ मी सांडत आहे अन् म्हणत आहे तुम्हाला ' तिलार्पण नमस्तु .'

🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments