फक्त चार दिवस असतात पाहुण्यांच्या घरचे .

 असो कितीही आलीशान सुखसोईयुक्त पाहुण्यांचे घर ते.

त्याला आपल्या साध्या घराची सर नसते .

कितीही काळजी घेणारी असतील पाहुणे मंडळी .

तिथं आपल्या इच्छेला जागाच नसते .

कितीही विचारांची प्रगल्भता त्यांच्या कडे असे .

पण तिथं आपल्या विचारांची प्रगतीच नसे .

आनंदाने-उत्साहाने-आरामाणे दिवस जातात पाहुण्यांच्या घरचे .

फक्त चार दिवस असतात पाहुण्यांच्या घरचे .

बाकीचे दिवस असतात आपल्याच घरचे .

Comments