भ्रष्टाचारावील औषध म्हणजे समाधानी वृत्ती #२६ जानेवारी #15 August #corrup...
*🇮🇳माहिती असावे असे काही..*
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय असतो??
*🇮🇳१५ ऑगस्ट* या स्वातंत्र्यदिनी झेंड्याला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणी त्यानंतर उघडून झेंडा फडकवला जातो.. याला 'ध्वजारोहण' ( Flag Hoisting) असे म्हटले जाते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून 'ध्वजारोहण' करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात..
*🇮🇳२६ जानेवारी* प्रजासत्ताक दिनी झेंडा हा वरच बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (Flag Unfurling) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात...
लढले जे देशासाठी, दिली आहुति प्राणांची…
करू स्मरण तयांचे, प्रेरणा त्यांच्या विचारांची!
*🇮🇳जय हिंद..!*
Comments
Post a Comment