होतं माझ्या पण हाताला काम
होते काम माझ्या पण हाताला .
मी ही होतो एका महत्त्वाच्या कंपनीत कामाला .
चालत होतं कंपनीत manufacturing अजोड नात्याची .
होते जे products ते सारे manufacturing करून delivered झाली पण एकच product थोडं problematical राहीलं कंपनीची .
चालू होता कधी profit तर कधी loss कंपनीत .
पण सारं काही असुन ही कंपनी होती आनंदात .
एकदा अचानक अघटीत घडले .
कंपनीच्या मालकीणीला दवाखान्यात दाखल केले .
प्रथम वाटला साध्य रोग झाला .
नंतर काय असाध्य आजार जडला.
थोडी कंपनी बिथरलेल्या अवस्थेत आली .
Market मधली profit ची range थोडीसी खालावली .
मग काय कंपनीच्या मालकांनी परभणी सारी पालथी घातली .
मग तर औरंगाबाद ची पण वारी केली .
आता कंपनीच्या मालकीची तब्येत ठीक वाटली .
आणि अचानक पुन्हा कंपनी हादरली .
कंपनीच्या मालकीणीच्या दुखण्याने परत डोकं वर काढलं .
आता औरंगाबादला मालक मालकांनी सोबत मला पण जावं लागलं .
आता तर मोठी पंचाईतच झाली .
औरंगाबाद मधुन थेट मुंबई गाठायला लागली .
साधं औरंगाबाद काय परभणीच निट न पाहिलेला मी .
काय निभाव लागणार आहे मुंबईत माझा .
तरीही मी ती जबाबदारी घेतली .
कंपनीच्या मालकांनी-मालकीणीनी मला विश्वास दिला की , " हे काम तु नक्किच पार पाडशील ."
विश्वासाणे माझा केला विकास .
आता cancerवर लढा हाच होता ध्यास .
Doctorरांनीही मला निर्भय करूनी अश्वस्त केले .
रोगांवर शस्त्राधार करूनी लहरी कंपन क्रिया ही केली तद नंतरी औषध प्रयोग केले.
रोग होता तो cancer सारखाच चिकटलेला .
तसंच होता तो करून पाहिले प्रयोग तरी अजुनही आर्धवट राहीलेला .
मुंबई झाली आता नाशिक वारी केली.
तरीही मात्रा कमी नव्हती झाली .
शेवटी मालकीणीच्या सांगण्या वरुन आणलं परभणीला .
अन् कॅन्सर ने धोका दिला .
होता अनंत चतुर्दशीच्या दुसरा दिवस .
ठरला कंपनीच्या मालकीनीचा शेवटचा दिवस .
कंपनीचा मालक स्वतःतच हरपला.
कंपनी सारी बिथरलेल्या अवस्थेत सापडली.
कंपनीची थोडी जबाबदारी घेतली मी माझ्या वर .
आणि काही दिली कंपनीच्या मालकांनी माझ्या वर .
चालत होती कंपनी आता रूळावर .
तेव्हढ्यात एक brake दिला नियतीने मालकांच्या ह्र्दयावर .
आणि पुन्हा एकदा critical problemने कंपनी बंद पडली.
मालिकांसाठी कर्मचारी एकजुटीने साहेबांना बरं करण्यासाठी कामाला लागली.
केले उपचार नाशिक मध्ये .
मग पुणं ही उणं केले मालकांनी .
हट्ट काय एकची नादचं केला, 'मला घरी जायचं' म्हणुन मालकांनी .
तरीही तब्येत ठीक राही ना परभणी मध्ये .
मग काय परत कंपनीचे head office नाशिकला shift झालं .
नंतर त्यात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास असं झालं .
त्यात भर पडली lock down ची .
मग तर फक्त work from home ची .
त्यातच कंपनीच्या मालकांची अचानक तब्येत बिघडली ना .
आता कोणता वैद्य आणि कोणता Doctor बाहेर तर फक्त करोना .
उपचाराथी तब्येत सुधारत चालली .
पण जेवणाची परीस्थिती ना सुधारली .
होतं सारं जग जेव्हा आपल्या घरात .
कंपनी पण होती lock down म्हणून आम्ही पण होतो कंपनी मालकां सोबत घरात .
मालकांचे जेवण औषध वगैरे झाले .
तेव्हा अचानक कंपनीचे मालक ही देवाघरी गेले .
आता मात्र कंपनी आहे तशीच lock down पण बंद झालं .
पण आता माझ्या हातचं कामंच गेलं .
महत्त्वाची कंपनी म्हणजेच घर माझे .
कंपनीचे मालक आणि मालकीण म्हणजेच आई-बाबा माझे .
Great
ReplyDelete